DNA Live24 2015

KRUSHIRANG

Latest Post

अहमदनगर :
महापालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणी कोतकर गटाने भाजपशी हातमिळवणी केल्याचा जबरदस्त धक्का काँगेस पक्षाला बसला आहे. या खेळीचे बीज सोधा राजकारणात असून या खेळीमुळे आमदार शिवाजी कर्डीले विखे पाटील गटास भारी ठरल्याची चर्चा नगर शहरात आहे.

केडगाव येथील तीन प्रभागात कोतकर गटाची ताकद असल्याचे मानले जाते. त्यामुळेच स्वबळावर नगरची सत्ता ताब्यात घेताना भाजपने माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे शहरातील काँग्रेस खिळखिळी होणार आहे. हा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा झटका मनाला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या सुजय विखे पाटील यांनी महापालिका निवडणुकीत व्यक्तिगत लक्ष घातले होते. त्यांना तर या झटक्याने मोठाच धक्का बसल्याचे मानले जाते. आमदार कर्डीले आणि सुजय विखे पाटील यांची मैत्री जगजाहीर आहे. मात्र, या खेळीत कर्डीले हे विखे गटावर भारी ठरल्याचे चित्र आहे, असे बोलले जात आहे.

त्याचवेळी यातही काहीतरी समझोता एक्सप्रेस असून पुढील काळात आणखी काहीजण भाजपमध्ये जाऊन पावन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही खेळी जोरात असतानाच यामुळे नगर शिवसेना या पक्षाबद्दल पुन्हा एकदा मतदारांना आस्था वाटू लागली आहे. त्यामुळेच केडगावचा धक्का भाजपच्या कितपत पचनी पडणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अहमदनगर :
महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात वेगवान घडामोडींतून अखेर केडगाव येथील कोतकर गट भाजपच्या गोटात सहभागी झाला आहे. केडगावमधील तीन प्रभागात त्यामुळे भाजपची लाट आली असून इतर पक्षांची यात वाट लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अहमदनगर महापालिका निवडणूक यंदा प्रथमच तिरंगी होत आहे. शिवसेना व भाजप स्वतंत्र लढत असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कायम आहे. काँगेस पक्षाची माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या जीवावर केडगाव भागात मोठी ताकद होती. तीच ताकद आता भाजपला साथ देणार आहे. 15, 16 व 17 अशा तीन प्रभागात केडगावचे मतदान विभागले आहे. त्यात शिवसेनेने मुसंडी मारली होती. मात्र, आता भाजपच्या गोटात कोतकर गट सहभागी झाल्याने येथील निवडणूक यंदा जोरदार चुरशीची होणार आहे.

मुंबई :
आरक्षणाची मर्यादा वाढवणेे गरजेचे आहे. जर ती वाढवली नाही तर मराठा आरक्षण टिकणार नाही. केंद्र व राज्य  सरकारने याचा विचार करायला हवा. आणि आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे  असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

केंद्रात व राज्यात आरक्षण वेगळी ठेवणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आता सुटला आहे अशी अफवा सरकारने पसरवली आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. एकंदरीत राज्य सरकारची भुमिका या सर्व प्रकरणात महत्वाची ठरणार आहे.

मुळ आरक्षण 50% असावे असा निकाल यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तरी महाराष्ट्रात 52% आरक्षण लागू आहे. अशावेळी 16-17% आरक्षण मराठा समाजाला कसे देणार असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला.
त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना आरक्षण मर्यादा 70% करावी अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

अहमदनगर :
काँगेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जात असलेल्या केडगाव भागातील प्रभागांत आश्चर्यकारक पद्धतीने भाजपची लाट आली आहे. काँग्रेस पक्षाकडील सर्व इच्छुक भाजपच्या गोटात सहभागी झाल्याची चर्चा सध्या जोरात आहे. मात्र, भाजप किंवा स्थानिक गटाकडून याबद्दल अधिकृतपणे अजूनही कोणतीच घोषणा झालेली नाही.

प्रभाग 15, 16 व 17 मध्ये केडगावचा भाग येतो. यावर माजी महापौर संदीप कोतकर आणि त्यांचे वडील भानुदास कोतकर यांचाच वरचष्मा आहे. येथे शिवसेना ही काँग्रेस पक्षाची कट्टर विरोधक आहे. तर, भाजप या राष्ट्रीय पक्षाला उमेदवारांची वणवा आहे. मात्र, सोमवारी रात्रीत घडलेल्या वरिष्ठस्तरीय घडामोडींतून काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य इच्छुक थेट भाजपच्या कळपात सहभागी झाल्याचे समजते. याबद्दल केडगाव भागात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. मात्र, अजूनही अधिकृत बातमी नसल्याने नेमके काय शिजतेय आणि कोणी शिजविलेले आहे, याबद्दल कंड्या पिकविल्या जात आहेत. येथील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते यामुळे सैरभैर झाल्याचे चित्र आहे.

पोट निवडणुकीत दुहेरी खुनाच्या प्रकरणामुळे केडगाव हा भाग राज्यात चर्चेत आहे. शिवसेना पक्षाने याचाच राजकीय लाभ उठवीत नगर शहरातील आपला खुंटा बळकट केला. त्यामुळे या भागात शिवसेना विजयाच्या थाटात वावरत होती. मात्र, आता काँग्रेस पक्षाच्या एका प्रबळ गटाने थेट भाजपच्या हातात हात दिल्याने नगरची निवडणूक वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे. ही उंची नेमकी कोणाला तरणार आणि कोणाला बाधक ठरणार हे येथील मतदार आता ठरविणार आहेत.


भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी काळ, एक परदेशाहून आलेल्या एका पाहुणीने या छोट्या मुलीसाठी सुंदर कपडे आणले होते परंतु आम्ही फक्त खादि वापरतो असे सांगत या छोट्या मुलीच्या आईने परदेशी कपडे घेण्यास साफ नकार दिला.मग ती पाहुनी या मुलीकडे वळली कि तुला खरोखरच नको आहेत का कपडे तर या छोट्या मुलीने देखील नकार दिला मग तया पाहुणीने म्हटले कि तुझी आवडीची बाहुली सुद्धा प्रदेशातून बनवलेली आहे , ती सुद्धा तू वापरतेस कि,
त्या नंतर या मुलीने ती बाहुली जिन्यावर नेउन जाळून टाकली. सुरुवातीच्या काळात “गुंगी गुडिया” अशी ओळख असणारी मुलगी द ओन्ली मॅन इन द कॅबिनेट  म्हणून ओळखली जाऊ लागली आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान “इंदिरा गांधी” अशी त्यांची जगभर ओळख.
१९ नोव्हेंबर १९१७ ला त्यांचा जन्म  झाला. इंदिराजी या जवाहरलाल आणि कमला नेहरू यांचे एकमेव अपत्य. आज जे घर जवाहरलाल नेहरू ट्रस्ट वापरते त्या घरात इंदिराजींचे बालपण गेले, त्यावेळी त्याचे नाव आनंदभवन होते, नंतर त्याचे नामांतर स्वराजभवन असे केले गेले.स्वातंत्र्यासाठी केलेल्या लढाया, घरी चालणार्या चर्चा यामुळे देशप्रेमाचे बाळकडू त्यांना आपसूकच मिळत गेले. पुढे देशासाठी कॉंग्रेसने कितीतरी आंदोलने केली त्यावेळी इंदिराजींनी वानरसेनेची स्थापना केली स्थापनेवेळी त्यांचे वय अवघे ११ होते.या वानरसेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला, अनेक निदर्शने केली .
त्यांचे सुरुवातीचे शिक्षण अलाहाबाद मधील रोमन कॅथ्लिक शाळेत झाले.तर पुढील शिक्षण पुण्यातील चिल्ड्रन्स ओंस स्कूल मध्ये झाले.पुढे मॅट्रीक झाल्यावर त्या शान्तिनिकेतनला गेल्या याच काळात त्यांनी संगीताची आवड जपली आणि त्यांचे अनेक कलांशी नाते जुळले. टेनिसनची “इन मेमोरीयम” हि त्यांची आवडती कविता होती.त्यांच्या घरात बहुतांशी टेनिसनच्या कविता वाचल्या जायच्या.
पुढील शिक्षणसाठी त्या युरोपात गेल्या आणि तिकडे असताना त्या फिरोज गांधी या तरुणाशी त्यांची चांगली मैत्री जमली आणि मग पुढे याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन त्यांनी विवाह सुद्धा केला.या विवाहाला त्यावेळी नेहरुजींचा विरोध होता त्याचे कारण म्हणजे वयाच्या मानाने लग्न फार लवकर होते आहे म्हणून. त्यांना पुढे राजीव आणि संजय अशी दोन मुले झाली.फिरोज गांधी आणि इंदिराजी या दोघांना १९४२ च्या लढ्यात अटक झाली होती.पुढे फिरोज गांधी हे खासदार झाले.दिल्लीत गेल्यानंतर अनेक मुलींसोबत त्यांचे नाव जोडले जाऊ लागले त्यामुळे इंदिराजींनी घटस्पोट घेण्याचा निर्णय घेतला. पुढे  हृदयविकाराच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचा राजकीय प्रवेश वयाच्या  २१ व्या वर्षी झाला.१९५९ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या काळात त्यांनी माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून काम केले.लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्युनंतर त्या भारताच्या ५ व्या पंतप्रधान झाल्या.पंतप्रधान पदासाठी मात्र त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला कारण त्यांना पंतप्रधान पदासाठी पक्षाअंतर्गत विरोध होता. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांना सत्ता टिकवण्यासाठी इतर पक्षाचे पाठबळ घ्यावे लागले कारण इंदिराजी पंतप्रधान झाल्यानंतर कॉंग्रेसमध्ये फुट पडण्यास सुरुवात झालेली होती. देशात आणीबाणी लागू केल्या नंतर त्यांचा पुढील निवडणुकीत पराभव झाला परंतु पुन्हा १९८० च्या निवडणुकांमध्ये तया विजयी झालय आणि दुसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान बनल्या. त्यांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री आणि माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून मंत्रिमंडळात वाखाणण्याजोगे काम केले.इंदिराजींना “भारताची आयर्न लेडी” हि ओळख याच काळात प्राप्त झाली.
इंदिराजींवर अनेक पुस्तके लिहिण्यात आली,त्यात किती खर्या आणि किती खोट्या गोष्टी छापल्या गेल्या.त्यावरून आजही वाद होतात ,डॉम मोराइस यानी इंदिराजींवर लिहिलेले पुस्तक तर इंदिराजींनी हातात घ्यायला पण नकार दिला होता.
इंदिराजी लहानपणापासून अगदी मृत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मनात एक द्वंद्व घेऊन जगत होत्या. कारण लहानपणी त्यांच्या वाट्याला वडील जास्त आले नाहीत, आईचा मृत्यू, पतीचा आणि वडिलांचा मृत्यू,वैवाहिक जीवनातील अस्वस्थता,राजकीय निर्णय, स्वताच्या इच्छेला घातलेली मुरड. अश्या बर्याच घटनांचा उल्लेख त्यांनी अमेरिकन मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात आणि इतर जवळच्या व्यक्तींकडे केला आहे.
इंदिराजींचा उमेदीचा बर्यापैकी काळ जवाहरलाल नेहरूंच्या सेवेतच गेला. यावेळी त्यांनी आपल्या मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात इंदिराजी म्हणतात कि त्यांचे परदेशातील शिक्षक त्यांना म्हणाले होते कि आयुष्यात जर काही बनायचे असेल तर आतपासून जगायला सुरुवात कर.परंतु वडिलांची सेवा कि स्वताचे जीवन यातील सुवर्णमध्य त्यांना कधीच गाठता आला नाही  त्यामुळे त्यांनी वडिलांची सेवा निवडली.
इंदिराजींच्या स्वभावाबद्दल आणि कार्याबद्दल अनेक वाद आहेत, देशाच्या घडण्यात आणि बिघडण्यात त्यांचा मोठा हात आहे अशी म्हणले जाते. या सगळ्या गोष्टीमागे एक छोटी गोष्ट आहे ती म्हणजे देशाच्या सर्वात उच्च अशा पदावर असताना आणि आयुष्याच्या अशा टप्प्यावर जिथे कलाटणी मिळू शकणार होती अशा वेळी  त्या एकट्या होत्या. ऐन तारुण्यात (म्हणजेच आई गेल्यानंतर) त्या एकाकी पडल्या. वडील आणि नवरा या दोघांच्या मृत्युनंतर मात्र त्या खूपच एकाकी झाल्या.त्याचाच परिणाम म्हणजे इंदिराजी सहकार्यांवर जास्त विश्वास ठेवत नसत.त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बर्याच घटनांचा परिणाम त्त्यांच्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यावर मोठ्या प्रमाणात झाला.
इंदिराजींच्या आयुष्यात ५ खूप महत्वपूर्ण घटना होत्या.ज्यातील घटनातील काही निर्णय देशाला पुढे नेणारे ठरले तर काही निर्णयांमुळे त्यांना सत्ता सोडावी लागली.

१- १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण
२- पहिली अणुचाचणी
३- त्या कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा असताना त्यांचे पतीचा कॉंग्रेस विरोध आणि तणावग्रस्त संबंध
४- देशासाठी घेतला गेलेला आणीबाणीचा निर्णय
५- शेवटचा निर्णय म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार ज्यामुळे त्यांना स्वताचे प्राण गमवावे लागले.(शीख समाजातील दोन अंगरक्षकांनी इंदिराजींची हत्या केली.)
शेवटच्या काळात त्या नातवंडासोबत जास्त वेळ व्यतीत करत असायच्या.  इंदिराजींचे आयुष्य हे फक्त राजकारणापुरते मर्यादित नव्हते तर देशासाठी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांची हत्या होणे हि सर्वात वाईट गोष्ट होती.
त्यांच्या राजकारणाचे दाखले आजही दिले जातात.भारतीय राजकारणातील त्या एक झंझावती “वादळ” होत्या.


- विनोदकुमार सुर्यवंशी

कोल्हापूर :
कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग येथे रविवारी मध्यरात्री पाऊस झाला. साधारणपणे मध्यरात्री अडीचच्या सुमारास पाऊस झाल्यामुळे दुसर्या दिवशी(सोमवार) पासून उसतोड कमी झाली आहे. तसेच बहुतांश भागात वीज पुरवठाहि खंडित झालेला आहे. अशा अवेळी पावसाने अनेकदा शेतीचे नुकसान केले आहे.

तसेच रविवारी झालेल्या पावसाचा मारा हा जोरदार असल्यामुळे अजूनही चिखल तसाच आहे त्यामुळे अजूनही उसतोडी करणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांकडून कळले. तसेच जो उस तोडला आहे तो बैलगाडी, ट्रॅक्तर किंवा इतर वाहनाचा वापर करत वाहून नेणे अशक्य आहे. कारण चिखलात गाडी रुतल्यावर अडकून पडते त्यापेक्षा उस नंतर वाहिलेला कधीही चांगले अशा प्रतिक्रिया वाहन चालकांनी दिल्या. 

या पावसाचा परिणाम गुऱ्हाळघरांवरही झालेला आहे. कारण जळणासाठी जे लाकूड लागते ते ओले झालेले आहे. सलग आठ दिवस गुऱ्हाळघरे बंद राहण्याची शक्यता आहे.

अहमदनगर :
नगदी पीक म्हणून मान्यता पावलेल्या कांद्याला निवडणुकीच्या राजकारणात 'अच्छे दिन'चा फटका बसला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झटका बसण्याच्या शक्यतेने या पिकाच्या उत्पादकांना दिवळीपूर्वीच 'बुरे दिन' आलेत. परिणामी उत्पादक शेतकरी कांदा पिकातून विकतचा तोटा घेत आहेत.

सरकारी अनास्था आणि धरसोड धोरणातून आघाडी सरकारच्या कार्यकाळात कांदा उत्पादक व शेतकरी संकटांत सापडले होते. परिणामी 'अच्छे दिन' येण्याच्या अपेक्षेने शेतकरी व ग्रामीण भागाने भाजपला कौल दिला. मात्र, त्याचाच झटका आता त्यांना बसत आहे. 25 रुपयांवर दिवळीपूर्वीच गेलेला कांदा आता 9 रुपये किलो दराने विकण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. उत्पादकांना किलोमागे 13 रुपये खर्च येतो. अशावेळी शेतकऱ्यांना प्रतिकिलो 4-8 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget