DNA Live24 2015

प्रधानमंत्री पीक विमा योजना: शेतकऱ्यांची माहिती 14 ऑक्टोबरपर्यंत अपलोड करावी

मुंबई : खरीप हंगाम 2017 साठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत महाराष्ट्रातील सुमारे
75 लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सहभागी शेतकऱ्यांची
माहिती संबंधित बँकांनी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर 14 ऑक्टोबरपर्यंत अपलोड करावे, असे आवाहन
कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
सदर संकेतस्थळ हे 14 ऑक्टोबरपर्यंतच सुरु राहणार असून त्यानंतर शेतकरी सहभागाची माहिती
अपलोड करता येणार नाही. संकेतस्थळावर अपलोड झालेल्या शेतकरी सहभागाची माहिती फक्त केंद्र व
राज्य शासनाचे विमा हप्ता अनुदान अदा करण्यास ग्राह्य धरली जाणार आहे.
याबाबत बँकाकडून दिरंगाई झाल्यास व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नुकसान
भरपाई देय झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी बँकेची राहणार आहे. याच अनुषंगाने कृषी विमा पोर्टलवर
अपलोड केलेली यादी बँकांनी विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे माहितीसाठी
प्रदर्शित करावी जेणे करुन शेतकऱ्यांना यादीमध्ये नावाची खात्री करता येईल.
*या योजनेअंतर्गत खरीप 2017 मध्ये केंद्रीय विमा पोर्टलवर अपलोड झालेल्या शेतकऱ्यांची
जिल्हानिहाय आकडेवारी अशी : बीड 12 लाख 127, नांदेड 9 लाख 67 हजार 305, उस्मानाबाद 8 लाख
57 हजार 438, जालना 8 लाख 37 हजार 75, लातूर 7 लाख 57 हजार 924, परभणी 6 लाख 87
हजार 467, औरंगाबाद 3 लाख 91 हजार 908, हिंगोली 2 लाख 52 हजार 837, सोलापूर 2 लाख 46
हजार 193, बुलडाणा 1 लाख 50 हजार 43, अकोला 1 लाख 40 हजार 813, सांगली 1 लाख 23
हजार 134, वाशिम 1 लाख 16 हजार 308, अहमदनगर 1 लाख 7 हजार 721, अमरावती 1 लाख 7
हजार 574, यवतमाळ 90 हजार 664, सातारा 69 हजार 355, भंडारा 66 हजार 230, नागपूर 44
हजार 615, धुळे 43 हजार 40, जळगाव 40 हजार 936, गोंदिया 38 हजार 191, पुणे 34 हजार
585, वर्धा 31 हजार 660, नाशिक 19 हजार 354, गडचिरोली 19 हजार 94, पालघर 16 हजार
112, चंद्रपूर 15 हजार 139, ठाणे 13 हजार 315, नंदुरबार 11 हजार 682, रायगड 3 हजार 608,
रत्नागिरी 1 हजार 463, सिंधुदूर्ग 679, कोल्हापूर 600.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget