DNA Live24 2015

एेन दिवाळीतच शेतकऱ्यांवर संक्रांत..!


नगर | मान्सूनच्या पावसाने यंदा खरिपाची पिके शेतातच सडली आहेत. त्यातही प्रामुख्याने कांदा पिकाचे भरमसाठ नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात कांद्याचे भाव वाढले आहेत. असे असुनही या भाववाढीचा शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळणे अशक्य आहे. कारण नगरसह नाशिक व पुणे पट्ट्यातील कांदा जादा पावसामुळे सडलेला आहे.परिणामी ऐन दिवाळीत कांदा उत्पादकांवर संक्रात कोसळली आहे.

हातातोंडाशी आलेले कांद्याचे पीक शेतातच मातीमोल झाल्याचे आता शेतकऱ्यांना पहावे लागत आहे. त्यातच पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्याही लांबल्या आहेत. सरकारने शेतकरी कर्जमाफीचा विचका केल्यानंतरही कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा करण्यास चालढकल केली आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे. सर्व बाजुंनी यंदा मराठी शेतक-यांची कोंडी झाली आहे. या स्थितीत ऐन दिवाळीतच शेतकऱ्यांना संक्रांतीचा सामना करावा लागत आहे.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget