DNA Live24 2015

'कृषीरंग दीपोत्सव'चे बुधवारी प्रकाशन


नगर | 'कृषीरंग दीपोत्सव' या दिवाळी अंकातून बळीराजाचा व्यथा अन् वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच अंकाचे प्रकाशन बुधवारी (दि. १८) सायंकाळी ६ वाजता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. अनिल घनवट यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रकाशक सौ. माधुरी चोभे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, शेतकरी व कष्टक-यांचे मुखपत्र म्हणुनच पुढील काळात कृषीरंग ही माध्यम संस्था काम करणार आहे. जागतिकीकरणाच्या झपाट्यात या दोन्ही घटकांची दुर्दशा झाली आहे. माध्यमांचाही तोंडवळा शहरी आणि श्रीमंत व मध्यमवर्गीय विचारांचा झालेला आहे. अशावेळी बातम्यांमध्ये ग्रामीण भागातील समस्या व शेतीविषयक प्रश्नांना दुय्यम स्थान मिळत आहे. मूठभर शहरवासियांचाच आवाज सरकारपर्यंत पोहचत असल्यानेच कृषीरंग ही संस्था यापुढे राज्यातील कष्टकरी शेतक-यांचा आवाज बनणार आहे. या दिवाळीनिमित्त बळीचे राज्य आणण्यासाठीचा विचार घेऊनच आम्ही 'कृषीरंग दीपोत्सव' हा अंक प्रकाशित करीत आहोत. तसेच यावेळी www.krushirang.com या ऑनलाईन पोर्टलचेही लोकार्पण केले जाईल. श्री. घनवट यांच्यासह संपादक श्री. सचिन चोभे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. बापुराव आढाव, श्री. संतोष शिंदे, श्री. महादेव गवळी, श्री. उद्धव काळापहाड, श्री. संदीप गेरंगे आदींसह शेतकरी व कष्टकरी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget