DNA Live24 2015

कांदा उत्पादकांवर 'संक्रांत'..!


नगर| मान्सूनचा पाऊस यंदा जोरदार झाल्याने राज्यभरात ओल्या दुष्काळ सदृश्य स्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. याच स्थितीमुळे आता खरिपासह रब्बी हंगामावरही संकट कोसळले आहे. शेतात तयार असलेला कांदा किंवा नव्यानेच लागवड केलेला मीड खरिपाचा कांदा जागेवरच सडत असल्याचे पाहणे यंदा शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. परिणामी ऐन दिवाळीत राज्यभरातील शेतकऱ्यांवर 'संक्रांत कोसळली' आहे.
कांद्याला मागणी असतानाच पुरवठा कमी झाल्याने बाजारात दर वाढत आहेत. त्यातच कर्नाटकातील कांद्याचेही उत्पादन घटण्याचा अंदाज राष्ट्रीय फलोत्पादन मिशनने वर्तविला आहे. त्यामुळेच या ओल्या दुष्काळाचा फटका देशभरातील शेतक-यांनाच बसणार असल्याचे चित्र आहे. सध्या उन्हाळ कांद्याला २३०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. हेच भाव पुढील काळात सुमारे १००० रुपये क्विंटलपर्यंत वाढण्याची शक्यता व्यापा-यांनी वर्तविली आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget