DNA Live24 2015

कीटकनाशकप्रकरणी शेतकरी संघटना आक्रमक


नगर | विदर्भासह खानदेश भागात आतापर्यंत सुमारे 35 शेतकऱ्यांच्या बळी गेल्यानंतरही राज्य सरकार व कृषी विभाग निद्रिस्त असल्याच्या निषेधार्थ राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळेच दिवाळीपूर्वी सरकारला या प्रकरणाची धग जाणवणार आहे.

35 शेतकऱ्यांची बळी गेल्यानंतरही कृषी विभागाने धडक कारवाई करण्याचे टाळले आहे. त्यामुळेच या विभागाच्या धुरिणांवरच संशय व्यक्त केला जात आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी याबद्दल स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. तरीही कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले नाही. या प्रकरणी नेमक्या कोणत्या कंपन्यांवर कारवाई होणार, याबाबतही सरकारने स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळेच या प्रकरणाची झळ कृषी विभागातील अधिकाऱ्यांना बसणार असल्याची शंका शेतकऱ्यांना आहे. या शंकेचं निरसन करण्यात सरकारला यश न आल्याने आता कीटकनाशक फवारणीप्रकरणी सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह शेतकरी संघटनांनी केली आहे. त्याची पुढील दिशा याच आठवड्यात स्पष्ट होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget