DNA Live24 2015

धन्य भाग हमारा... जो मिला 'सुपर सीएम' का सहारा..!

सोशल मीडियातून प्रतिमा संवर्धनाच्या नादात स्वत:ला 'सुपरमैन' म्हणवून घेणा-या देवेंद्रभाऊंना काय म्हणावं हेच समजत नाही. त्यातच नोटीसा व कारवाईची भीती असल्यानं लिहावं की नाही, हेही समजेनात. पण लिहावचं लागेल, कारण "धन्य भाग हमारा... जो मिला 'सुपर सीएम' का सहारा..!"

कर्जमाफी देण्याचं कर्तव्य पार पाडतानाही कसा बडेजाव मिरवू नये, याचंच उदाहरण भाजपानं आपल्याला घालून दिलयं. सरकारनेच जाणीवपूर्वक शेतक-यांची दुर्दशा करून ठेवलीय. कृषी-पणन कायद्यातील एकतर्फी जाचक जाचक अटींमुळे स्वातंत्र्याच्या सत्तरीतही शेतकरी पारतंत्र्यात आहे. बाजारपेठेतील हस्तक्षेपाने शेतकरी बेजार झालाय. अशावेळी कर्जमाफीचा डोस देऊनही शेतकरी सक्षम होईलचं याची १ टक्काही शाश्वती नाही. तरीही या किरकोळ उपाययोजनेचा 'इव्हेंट' उद्या माझा महाराष्ट्र पाहणार आहे.

ही भावना समस्त शेतकरी भावा-बहिणींचीच आहे. मात्र, लोकशाही लोप पावत चाललेल्या या काळात सगळेच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. अन् तरीही भाजपाचा सोशल मीडिया सेल 'सुपर सीएम'चे बिरूद मिरवण्यात धुंद आहे. राजकीय भाषेत याला सत्तेची मस्ती नाही, तर काय म्हणणार..?

काँग्रेस आघाडीसह धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणा-यांनी वाट लावल्याने देशभरात मोठ्या उत्साहाने 'बदला'चे वारे वाहिले. पण आता स्तुतिपाठकांच्या (भाट) फौजांपुढे शेतकरीही मेटाकुटीला आलाय. मिळतयं ते पदरात पाडून घेण्याच्या भावनेने व किती मुद्यांवर लढायचं, या विचारांनी शेतकरी शांत आहेत. अशावेळी जर "धन्य भाग हमारा... जो मिला 'सुपर सीएम' का सहारा..!" टाईपच्या जाहिराती पाहण्याची वेळ आमच्यावर येत असेल, तर हे राज्य कर्तव्यधर्म विसरले आहे, हेच उद्वेगाने म्हणावे लागेल. बाकी शहाण्यांना चार शब्दच पुरे.....

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget