DNA Live24 2015

अँड थिस क्रेडिट गोझ् टू ओन्ली खा. गांधी (साहेब)...


नगराचा स्वप्नातील उड्डाणपूल पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याच्या बातम्या येत आहेत. त्यानिमित्ताने नगर शहर आणि जिल्हा म्हणून मला नगरकरांसमोर व्यक्त होण्याची संधी देणार्या खा. दिलीप गांधी यांचे जाहीर आभार. अशा पद्धतीने नकारात्मक शब्दांनी व्यथा व्यक्त करण्याचा मला आणि वाचक म्हणून तुम्हालाही कंटाळा येणे शक्यच नाही. कारण आपल्या (बे)जबाबदार लोकप्रतिनिधी 'साहेबां'नी हेच बाळकडू आपल्याला पाजलेय. त्यामुळेच पुन्हा एकदा मोठ्या जोमाने मी व्यथा कथन करीत आहे.
'अँड क्रेडिट गोझ् टू सोशल मीडिया...' ही पोस्ट दि. २६ सप्टेंबर रोजी मी मोठ्या उत्साहाने केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हाच उत्साह शिळोप्याच्या गप्पांत विरला आहे. सोशल मिडीयावर जोरात मागणी सुरू झाल्याने खा. गांधी यांनी पहिल्याच फटक्यात दि. १४ ऑक्टोबर रोजी उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्याची घोषणा राणा भीमदेवी थाटात केली. त्याने नगरकरांना आनंद झाला आणि नकारात्मक चर्चा संपून आपला उड्डाणपूल कसा असेल यावर स्वप्नरंजन सुरू झाले होते. पण कालपासून पुन्हा एकदा वृत्तपत्रे आणि सोशल मिडीयातून 'कधी होणार नगरचा उड्डाणपूल..!' असे प्रश्न विचाराने सुरू झाले आहे. आपले खासदार कोणत्या पक्षाचे आहेत, यावर बोलण्याची मला गरज वाटत नाही कारण, आपल्याकडील सगळ्याच पक्षातील पुढारी एकजात सारखेच वाटतात. एकाला दाखवावे आणि एकाला झाकवावे, अशी स्थिती नाहीच मुळी. पण तरीही भाजपा या अंतरराष्ट्रीय 'घोषणाबाज' पक्षाचे खासदार आपल्याला लाभलेत, याचा आनंद आहेच. कारण त्यामुळे किमान आपण पंधरा दिवस तरी 'कसा असेल नगरचा उड्डाणपूल..' याच स्वप्नात 'अच्छे दिन'ची अनुभूती आपण सगळे घेऊ शकलोच की...
हेही नसे थोडके...!
#मी_नागरी #अहमदनगर
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget