DNA Live24 2015

शिर्डी विमानतळाचे लोकार्पण


शिर्डी : राष्‍ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्‍या हस्‍ते शिर्डी आंतरराष्‍ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्‍यात आले. राष्‍ट्रपती महोदयांनी शिर्डी-मुंबई विमानसेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
सकाळी 10 वाजता विमानतळावर श्री. कोविंद यांचे आगमन झाल्‍यानंतर राज्‍यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्‍यांचे स्‍वागत केले. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपति राजू, पालकमंत्री प्रा.राम शिंदे,विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे-पाटील, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शालिनी विखे-
पाटील, महाराष्‍ट्र विमान प्राधिकरणाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक सुरेश काकाणी, विभागीय आयुक्‍त महेश झगडे, जिल्‍हाधिकारी अभय महाजन आदी उपस्थित होते. राष्‍ट्रपती कोविंद यांच्‍या हस्‍ते कोनशिलेचे अनावरण करण्‍यात आले. त्‍यांनी विमातनळ इमारत परिसराची पाहणी केली. उद्घाटनंतरच्‍या पहिल्‍या शिर्डी-मुंबई विमानाने १२ प्रवाशांनी मुंबई प्रवास केला.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget