DNA Live24 2015

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्‍या ठिकाणी अनुज्ञप्‍त्‍या बंद ठेवण्‍याचे आदेश

अहमदनगर : जिल्‍हयातील  ग्रामपंचायतीच्‍या मुदत संपणा-या निवडणूका  माहे नोव्‍हेंबर व डिसेंबर 2017  मध्‍ये होणार आहेत.  जिल्‍हयातील  ग्रामपंचायतीच्‍या निवडणुका या निर्भमुक्‍त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीने तसेच निवडणुकीचे कालावधीत शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहण्‍यासाठी  जिल्‍हाधिकारी  अभय महाजन यांना  मुंबई  दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 मध्‍ये प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करुन  ग्रामपंचायत निवडणूकीच्‍या दिवशी अनुज्ञप्‍त्‍या बंद ठेवण्‍याचे आदेश जारी केले आहेत.
सदरचा आदेश दिनांक 6 ऑक्‍टोबर 2017 रोजी मतदानाचे एक दिवस अगोदर संपूर्ण दिवस, दिनांक 7 ऑक्‍टोबर 2017 रेाजी मतदानाचे दिवशी संपेपर्यत व दिनांक 9 ऑक्‍टोबर 2017 रेाजी मतमोजणीचे ठिकाणी मतमोजणी संपेपर्यत. निवडणूका असलेल्‍या ग्रामपंचायतीच्‍या सीमेलगतच्‍या गावातील असणारे सर्व देशी  विदेशी मद्य विक्री दुकाने व परवानाकक्ष अनुज्ञप्‍ती  एफएल बीआर2 अनुज्ञप्‍त्‍या , ताडी  विक्री अनुज्ञप्‍त्‍या बंद ठेवण्‍यांचे आदेश दिले आहेत.  सदरच्‍या दिवशी अनुज्ञप्‍त्‍या उघडया असल्‍याचे आढळल्‍यास संबंधित अनुज्ञप्‍तीधारकांवर कडक कारवाई करण्‍यात येईल असे कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget