DNA Live24 2015

तणनाशके आणि कीडनाशके वापरताना काळजी घ्या : कृषी विभाग

नगर तणनाशक आणि कीडनाशक वापरताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. शक्यतो,
उन्हामध्ये फवारणी करणे टाळावे आणि मान्यताप्राप्त तणनाशक आणि कीडनाशकांचाच वापर करावा, असे
आवाहन पुणे विभागाचे कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी केले आहे.
यवतमाळ येथील तणनाशक फवारताना झालेल्या विषबाधेच्या घटनेच्या अनुषंगाने अहमदनगर
जिल्ह्यात जनजागृती कऱण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री. इंगळे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
पंडित लोणारे यांनी हे आवाहन केले आहे. कृषी यंत्रणेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यशाळा
आयोजित करुन शेतकऱ्यांपर्यंत जनजागृती कशा पद्धतीने करावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे.
तालुकास्तरावर कृषी सेवा केंद्र चालकांनाही सूचना देण्यात आल्या असून बंदी घालण्यात आलेली कीडनाशके
आणि तणनाशके विक्री करताना आढळल्यास कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची हाताळणी काळजीपूर्वक करावी, कीटकनाशकाच्या पॅकेटसोबत दिलेल्या
सूचनांचे पालन करावे, शिफारशीप्रमाणेच कीटकनाशकांची मात्रा वापरावी, फवारणी पंप गळत नसल्याची खात्री
करावी, फवारणी करताना डोळ्यांना अपाय होऊ नये म्हणून चष्मा वापरावा, नाकाला रुमाल बांधावा असे
आवाहन त्यांनी केले आहे.
फवारणी करताना धुम्रपान करु नये, शक्यतो सकाळच्या वेळीच फवारणी करावी तसेच फवारणीनंतर
अंघोळ करण्याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन श्री. इंगळे आणि श्री. लोणारे यांनी केले आहे.
पूर्वकाळजी घेऊनही कीटकनाशके अथवा तणनाशके फवारणी करताना त्रास जाणवल्यास तात्काळ
डॉक्टरांशी संपर्क साधावा. कृषी सेवा केंद्र चालकांनी बिगर नोंदणीकृत पीक वाढ संजीवके आणि इतर
उत्पादनांची विक्री परवानाधारक दुकानामधून करु नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
फवारणी करताना पूर्वकाळजी म्हणून शेतकऱ्यांनी सुरक्षिक कीट वापरावे यासाठी जिल्ह्यात असे कीट
काही प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सर्व कंपन्यांना सांगण्यात आले आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना तशा
स्वरुपाची काळजी घेणे शक्य होईल, असे श्री. इंगळे यांनी सांगितले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget