DNA Live24 2015

जपानच्या पसोना समुहाची शहरी शेती...बेटांचा देश असलेल्या जपानला निसर्गाने अत्यल्प शेतजमीन दिली. राजधानी असलेल्या टोकीयोत तर  निसर्गच दिसत नाही. काच व सिमेंटच्या जंगलाने वेढलेल्या टोकीयोत , पसोना उद्योग समुहाने त्यांचे मुख्यालय थाटले. मुख्यालयातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला अवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ पुरवले जाते.  याच पसोना समुहाच्या मुख्यालयाची इमारत सध्या संबध जगाचे लक्ष वेधत आहे.

 निसर्गासोबत सहजीवन या धर्तीवर मुख्यालयाच्या इमारतीचे निर्माण केले आहे. मुख्यालयाच्या इमारतीमध्ये चक्क शेती केली जाते. पसोना समुहाच्या निमित्ताने शहरी शेतीचे अद्यावत मॉडेल जपान मध्ये निर्माण झाले आहे.

मुख्यालयात प्रवेश केल्यानंतर लॉबीतच भाताची लागवड पहायला मिळते. याच भातपिकाची वर्षातून तीन वेळा काढणी केली जाते. भातपिकाच्या वाढीसाठी एल.ई.डी लाईट व सोडीयम लाईटचा वापर केला आहे. लाईटमुळे भातपिकांना अवश्यक  असलेला प्रकाश मिळतो. भात पिकाला अवश्यक असणारे वारे नियंत्रित करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा समुहाने बसवली  आहे.

लॉबीतुन मुख्यालयात प्रवेश केल्यानंतर उपलबद्ध जागेत भेंडीची लागवड पाहता येते. भेंडीचे किफायतशीर उत्पादन होण्यासाठी एल.ई.डी व सोडीयम लाईटच्या वर फॉगर्स बसवले आहेत. फॉगर्स मुळे आद्रतेवर नियंत्रण मिळवता येते.

मुख्यालयाच्या गेस्टरुमला टोमॅटो गेस्ट रुम नाव देण्यात आले आहे. गेस्ट रुमचे छप्पर लोखंडाच्या चौकोनी जाळीने व्यापले आहे. त्यावर हॅगींग पद्धतीने टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. टोमॅटोला पाणी व खते देण्यासाठी हायड्रोपॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

टोमॅटो गेस्ट रुमला लागुनच समुहाची रिसेप्शन रुम आहे. रिसेप्शनरुमच्या छपरावर देखील हॅंगीग पद्धतीने भोपळा व कोबीची लागवड करण्यात समुहाला यश आले आहे.

पहील्या मजल्यावर हायड्रोपोनिक पद्धतीचा वापर करत ,  लेट्यूसची लागवड केली आहे. लागवडीनंतर ४० दिवसांनी लेट्युसची काढणी केली जाते.

दुसऱ्या मजल्यावर कामगारांसाठी मिटींग हॉल आहे. मिटींग हॉल मध्ये विविध प्रकारच्या भाज्यांसोबत ब्ल्यु बेरीची लागवड केली आहे.

तिसऱ्या मजल्यावर पसोना समुहाचे उपहारगृह आहे. उपहार गृहात चक्क संत्र्याची लागवड केली आहे. कामगार संत्र्याला हात सुद्धा लावत नाहीत. पुर्ण इमारतीमध्ये लागवड केलेल्या पिकांपासून खाद्यन्नाची निर्मिती केली जाते.

इमारतीच्या बाहेरील बाजुच्या काचेच्या भिंतीवर गडद वेल चढविण्यात आले आहेत. हिवाळ्यात वेलाची पाने गळून पडतात. व स्वच्छ सुर्यप्रकाश आत येतो. उन्हाळ्यात मात्र वेल हिरवाईने भरुन जातो. त्यामुळे थंड हवा कार्यालयात येते. वेलांमुळे कंपनीत एयर कंडीशनर अथवा हीटर लावण्याची गरज भासत नाही. परिणामी वीजेची बचत होते.

पसोना समुहाच्या वतीने, उत्पादीत केलेल्या शेतमलाची कोठेही विक्री केली जात नाही. कामगारांसाठीच या पिकांचा उपयोग केला जातो. प्रदुषीत वातावरणात काम करणाऱ्या तरुणांना कायम स्वच्छ ऑक्सिजन मिळण्यासाठी,  समुहाने मुख्यालयातच शहरी शेतीचे अद्यावत मॉडेल थाटले आहे. टोकीयोतील अनेक समुहाने पसोना समुहासारखी शहरी शेती करण्यास सुरवात केली आहे.  समुहाचे अनुकरण नक्कीच जगभर विस्तारेल यात शंका नाही.

लेखक :
विशाल केदारी
मो. क्र : ०७७१९८६००५८

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget