DNA Live24 2015

सुंसस्कृतपणा शिकविणारे शिक्षण द्यायला हवे : पोपटराव पवार

नगर : प्रतिनिधी 
शिक्षणातून साक्षरता निर्माण झाली, तरी सुसंस्कृतपणा आला नाही, असे सांगतानाच पंचायत राज व्यवस्थेमुळे गावागावांतील गुरुजींचा आदरयुक्त दबदबा कमी झाला, अशी खंत आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.

दि. प्रोग्रोसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्यावतीने प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनील पंडित यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माऊली संकुलात मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दि. ना. जोशी होते. यावेळी प्रमुख म्हणून आमदार ना. गो. गाणार, आ. भगवान साळुंखे, माजी आमदार संजीवनी रायकर, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, साहित्यिक संजय कळमकर, शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू, बाबासाहेब काळे, नरेंद्र वातकर, पूजाताई चौधरी, के. बाल. राजू, अप्पासाहेब शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. 
पवार म्हणाले की, पूर्वीच्या काळी प्राथमिक शाळेतील गुरुजींच्या आधारावर गावगाडा चालायचा. लहानांपासून वडिलधार्‍यांना त्यांचा आधार वाटायचा. गावपातळीवर निर्णय गुरुजींना विश्‍वासात घेऊन घेतले जायचे. पंचायत राज व्यवस्था आल्यापासून गुरुजींचे महत्त्व कमी झाले. या व्यवस्थेमुळे गावात गटतट निर्माण होऊन गुरुजीच अंधातरी झाले.संघटनांचा आधार शोधण्याची त्यांच्यावर वेळ आली. आज मुलांची बौद्धिक पातळी वाढली असली तरी शारीरिक व अध्यात्मिक क्षमता वाढलेली नाही. ती वाढविण्यावर भर द्यायला हवा.सरकारी व्यवस्था व समाजव्यवस्था बरोबरीने चालायला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शहरात बगीचा, खेळाचे मैदानासाठी जागा आरक्षित ठेवली जाते. त्याच धर्तीवर ग्रामपंचायतींनीसुद्धा यासाठी जागा राखून ठेवल्या पाहिजेत. खेड्यांचा विकास झाला पाहिजे त्यासाठी शास्वत विकास व शाश्‍वत आनंद ही  योजना राबविणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने प्रतिकूल परिस्थितीत संस्कार आणि नैतिकतेची जपवणुक केली. त्यामुळेच ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात भरभराटीला आल्याचे नमूद करतानाच संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी भरीव सहकार्य करण्याचे आश्‍वासन पवार यांनी यावेळी दिले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget