DNA Live24 2015

लोकराज्यचा ‘संकल्प ते सिद्धी’ विशेषांक प्रकाशित


मुंबई : लोकराज्य ऑक्टोबर चा अंक ‘संकल्प ते सिद्धी’ या विषयावर आधारित आहे. 100
पृष्ठांचा हा अंक 10 रूपयांचा असून तो राज्यातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
या विशेषांकात प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘संकल्प से सिद्धी’ या
आभियानाच्या विविध पैलूंचा विस्तृत आढावा घेणारे मान्यवरांचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.
यामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी, रमेश पतंगे, अनिल बलूनी यांचा
समावेश आहे.
मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या भ्रष्टाचार मुक्ती, करजंजाळातून मुक्ती,
अस्वच्छतेपासून मुक्ती, दुष्काळापासून मुक्ती, बिल्डरांच्या मनमानीपासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून
मुक्ती या सप्तमुक्तीच्या अनुषंगाने राज्यात राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना, धोरणे, निर्णय यांचीही
माहिती देण्यात आली आहे.
राज्य शासनाला या ऑक्टोबरअखेर तीन वर्षे पूर्ण होत असून या अंकाच्या माध्यमातून सर्व
मंत्रीमहोदयांनी आपल्या विभागांतर्गत झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला आहे. राज्य शासनाचे
लोकाभिमुख निर्णय, धोरणं, योजना आणि त्याच्या अंमलबजावणीबाबतची माहिती या अंकात आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget