DNA Live24 2015

अप्रमाणित व शिफारस नसलेले किटकनाशक पुरविणाऱ्या कंपनी आणि वितरकांवर फौजदारी गुन्हा

मुंबई यवतमाळ येथील किटकनाशकाच्या विषबाधेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे बीटी  बियाणे उत्पादक कंपन्या आणि किटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनीधींची समवेत स्वतंत्र बैठका घेतल्या. विषबाधेच्या या घटनेमुळे शेतकऱ्यांना हकनाक आपला जीव गमवावा लागला असून शिफारस नसताना आणि गरज नसतानाही यवतमाळ सारख्या भागात घातक विषारी किटकनाशकांची विक्री झाली. यामुळे किटकनाशक कंपनी आणि वितरकावर कायद्यानुसार फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येत असून शासकीय यंत्रणेतील दोषींवर देखील कारवाई केली जाईलअसे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
 बियाणे आणि किटनाशक उत्पादक कंपन्यांनी केवळ नफा कमविणे हा न उद्देश ठेवता शेतकऱ्यांप्रति सामाजिक बांधिलकी दाखवावीअसे आवाहन त्यांनी केले. यावेळी कृषिमंत्री आणि सचिवांनी कंपन्यांचे प्रतिनीधी आणि कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
 आपण उत्पादीत केलेल्या किटकनाशकामुळे शेतकरीशेतमजूर मोठ्या प्रमाणावर दवाखान्यात दाखल होताहेत याबाबत माहिती घेण्याचीही गरज भासली नाहीअसा संतप्त सवाल कृषिमंत्र्यांनी यावेळी केला. फक्त आपला माल विकला गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करता शेतकऱ्यांशी समाजिक बांधिलकीतून संवाद साधत त्यांना किटकनाशकांच्या वापराबाबत मार्गदर्शन करणेही तितकेच आवश्यक आहे. ज्या किटकनाशकामुळे शेतकरी बांधवांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची त्यांचे सांत्वन करण्याची आवश्यकता कंपनीला भासली नाही. फक्त व्यवसाय डोळ्यासमोर ठेवू नका समाजिक भान देखील जपले पाहिजेअशा शब्दात श्री. फुंडकर यांनी कंपन्यांच्या प्रतिनीधींची कानउघाडणी केली.
 ज्या भागात शिफारस आणि आवश्यकता नसताना अप्रमाणित किटकनाशकांची विक्री केली जाते ती तातडीने बंद झाली पाहिजे. वितरकाला आमिषे दाखवून चुकीची माहिती देऊन किटकनाशक विक्रीस भाग पाडले जाते. त्यामुळे शेतकऱ्याची हानी  होते. कृषि सेवा केंद्रकृषी विभागातील कर्मचारी यांच्या संगनमताने अप्रमाणीत किटकनाशकांची विक्री केली जात असेल तर नुसता दंडात्मक नव्हे तर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
 गरज नसताना ज्या भागात गरजेपेक्षा जास्त किटकनाशकांची विक्री झाली त्याची आता चौकशी करण्यात आहे. किटकनाशक उत्पादक कंपन्यांनी वेळीच दखल घेऊन प्रशासनाशी संवाद साधला असता आरोग्ययंत्रणेला विषबाधेवर प्रतिकारक औषधाबाबत माहिती दिली गेली असती तर शेतकरी बांधवांचा जीव वाचवण्यात यश आले असतेअसे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
सप्टेंबरमध्ये बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांबरोबर झालेल्या बैठकीत प्रत्येक तालुक्यात बियाण्यांची माहितीत्याचा वापरकिटकनाशकांची फवारणी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिनीधी नेमणार होते मात्र अशा प्रकारची कुठलीही नियुक्ती बियाणे कंपन्यांकडून झाली नाही. बियाणे कंपन्यांनी किती ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या याची माहिती शासनाला सादर करावीअसे निर्देश कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीत कृषिमंत्र्यांनी दिलेले निर्देश असे :किटकनाशकांच्या किंमतींवर नियंत्रणासाठी कायदा करणार किटकनाशक उत्पादक कंपन्यांच्या संघटनेने जाणिवजागृतीपर मेळावे आयोजित करावेफवारणी करणाऱ्या मजुराची मोफत आरोग्य तपासणी करून त्याला सुरक्षा किट द्यावे व त्याबाबत त्याला मार्गदर्शन करावेयवतमाळ जिल्ह्यातील 1400 गावांमधील डॉक्टर्सआरोग्य कर्मचारी यांना किटकनाशक व त्यात वापरलेले रसायन व त्यावरील प्रतिकारक औषध याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे.ग्रामपंचायतपंचायत समिती येथे फलक लावून फवारणीबाबत जाणीवजागृती करावीजिल्हा शल्यचिकित्सकांना भेटून किटकनाशकात वापरलेल्या मोल्युक्युल बाबत माहिती द्यावी.कंपन्यांनी राज्यभर जिल्हानिहाय जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget