DNA Live24 2015

विणकरांसाठी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजना


अहमदनगर :  महाराष्‍ट्र राज्‍यात शेतीनंतर रोजगार देणारा व्‍यवसाय हा वस्‍त्रोद्योग आहे. राज्‍यात हातमागावर काम करणा-या विणकरांसाठी राज्‍य शासन व केंद्र शासन विविध कल्‍याणकारी योजना राबवत आहे.  केंद्र शासनाचे हातमाग विणकरांचे हित जोपासण्‍यासाठी  व त्‍यांना सर्वोतपरी मदत करण्‍यासाठी  तसेच शासकीय योजनांची  सर्वंकष महिती देण्‍यासाठी बुनकर मित्र  या नावाने हेल्‍प लाईन क्र. 18002089988  अशी सुरु केली आहे. ही सेवा मोफत देण्‍यात येत आहे.
            राज्‍यात हातमाग विणकराने विणलेला माल थेट ग्राहकांपर्यत पोहचून जास्‍तीत जास्‍त नफा प्रत्‍यक्ष विणकरास मिळण्‍यासाठी केंद्र शासनाने www.indiahandmadebazaar.com  या नावाने स्‍वतंत्र पोर्टल सुरु केले आहे.  सदर पोर्टलद्वारे  हातमाग विणकर त्‍यांचे उत्‍पादनाचा तपशील उत्‍पादनाचा फोटो इत्‍यादी माहिती अपलोड करुन नवनवीन बाजारपेठ काबिज करु शकतो.
            प्रादेशिक उपसंचालक, वस्‍त्रोउद्योग मुंबर्इ हे राज्‍य शासनाचे कार्यालयामार्फत  तमाम हातमाग विणकरांनी  याचा लाभ घेण्‍याचे आवाहन केलेंडर आहे.  अधिक माहितीसाठी  प्रादेशिक उपसंचालक वस्‍त्रोद्योग मुंबई 7 वा मजला,  चरई टेलिफोन एक्‍स्‍चेंज  बिल्‍डींग मावळी मंडळ रोड ठाणे (पश्चिम) 400601  येथे संपर्क साधावा .

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget