DNA Live24 2015

डाळिंबाला ‘अच्छे दिन’; पावसामुळे फळे खराब झाल्यासह MP-UP तून वाढली मागणी

पुणे (श्री. सचिन चोभे) : भाव कमी झाल्याने सोन्यासारखे डाळिंब मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र, आता सलगच्या पावसासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि दिल्लीतून मागणी वाढल्याने याच फळाला पुन्हा एकदा ‘अच्छे दिन’ आले आहेत. डाळिंबाला सध्या प्रतीकीलोसाठी सरासरी ६०, तर चांगल्या मालाला ८० रुपये दर मिळत आहेत.

आज संगमनेर (जि. अहमदनगर) येथे चांगल्या मालाला सर्वाधिक ९५ रुपये प्रती किलो भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. याच बाजार समितीत सध्या डाळिंबाचे सरासरी भाव ७०-७५ प्रती किलो अशा पद्धतीने स्थिरावले आहेत.
आजचे विविध बाजार समितीमधील या फळाचे भाव असे (भाव प्रती किलो रुपयांमध्ये व कंसात सरासरीचा दर) : मुंबई ९० (७४), नाशिक ८५ (७८), पुणे ९० (७०), सोलापूर ७० (५३), पंढरपूर ७२ (६०), बंगळूर १०० (८७), दिल्ली १०० (९०), जयपूर ९५ (९०) आदि.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget