DNA Live24 2015

सरपंचपदावरही मोदींचीच छाप..!

नगर : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा करिश्मा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकींतही दिसल्याचे स्पष्ट झाले आहे. 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' या पेजनंतर आता दस्तुरखुद्द मोदी साहेबांनीच सरपंच पदामध्ये भाजपाने बाजी मारल्याबद्दल महाराष्ट्र भाजपाचे 'व्टिटर'वर अभिनंदन केले आहे. मोदींच्या या व्टिटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भाजपा ही राजकीय पार्टी कोणत्याही मुद्यांवर 'पार्टी' करू शकत असल्याची टीका होत असते. कोणतेही काम 'ऐतिहासिक' करून दाखविण्याचा चंग बांधलेल्या याच पार्टीच्या पंतप्रधानांनी सरपंच पदासारख्या पक्ष म्हणून बिगर राजकीय निवडणुकांबाबत तीन वेगवेगळे व्टिट करून याचाच प्रत्यय पुन्हा एकदा दिला आहे. कशाबद्दलही श्रेयवादाचे व इव्हेटबाजीचे राजकारण करण्यात आपण मागे नसल्याचाच संदेश या पक्षाने पुन्हा एकदा दिल्याची नेटक-यांची भावना सोशल मीडियावर दिसत आहे. आता यावर नेटकरी कोणत्या पद्धतीने व्यक्त होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget