DNA Live24 2015

उद्या किती जणांना मिळणार शेतकरी कर्जमाफीचा लाभ; राज्यभर संभ्रम

नगर | शेतकरी कर्जमाफी घेण्याचा दिवस काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाही राज्यभरात याबद्दल अनेक प्रश्न कायम असल्याचेच चित्र आहे. किती शेतकऱ्यांना आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात उद्या (दि. १८ ऑक्टोबर) या कर्जमाफीचा लाभ मिळून सरकारी दिवाळी भेट मिळणार, याबद्दल उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज्यभरातील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा पहिल्या टप्प्यातील लाभ मिळणार आहे. त्यामुळेच ही सरकारी दिवाळी भेट स्वीकारण्यासाठी गरीब शेतकरी पाण्यात देव बुडवून तयार आहे. मात्र, याबद्दल माहिती घेतली असता नगर जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटींवर सांगितले की, राज्यातील तुलनेने लहान जिल्ह्यांची छाननी पूर्ण झाली आहे. तर, नगरसह पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड आदी तुलनेने मोठ्या जिल्ह्यांत अजूनही ही छाननी प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळेच या जिल्ह्यांतील किती आणि कोणते शेतकरी या पहिल्या टप्प्यात लाभार्थी म्हणून निवडले जातील याबाबत साशंकता आहे. मात्र, आजच्याच दिवसात अधिकाधिक छाननी पूर्ण करण्याचे आदेश असल्याने त्यानुसार वेगाने काम सुरू आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget