DNA Live24 2015

कृषी अधिकाऱ्यांची 'अर्थ'पूर्ण पळापळ..!


नगर | विदर्भ आणि खानदेशातील शेतकऱ्यांचे कीटकनाशक फवारणीदरम्यान बळी गेल्यानंतर राज्यभर काहीतरी ठोस कारवाई करण्याची उपरती कृषी विभागाला सुचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशामुळे राज्यभर बैठकांना उत आला आहे. मात्र, याच दरम्यान दिवाळीची हवा जोरात असल्याने शेतकरी बळींच्या नावे सुरू असलेल्या याच बैठकांत आर्थिक संकलन करून 'दिवाळी' साजरी करण्यासाठीच खरी पळापळ सुरू असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील अंतर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. कृषी अधिकारी शेतकरी सेवार्थ विभागाऐवजी आता 'कंपनी सेवार्थ' कार्यात मग्न असल्याचीच चर्चा वर्षानुवर्षे सुरू आहे. कीटकनाशक फवारणी बळीद्वारे यावरच शिक्कामोर्तब झाल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून नगरसह राज्यभर सुरू असलेल्या बैठकांत काही तालुक्यांत कृषी विभागाची 'दिवाळी' झाल्याच्या बातम्या येत आहेत. कृषी निविष्ठा उत्पादक कंपनी, वितरक आणि कृषी सेवा केंद्र चालक यांच्याकडून या बैठकीत 'मेवा' संकलीत झाल्याची नगर जिल्ह्यात चर्चा आहे. मात्र, हे काही 'इन केमेरा' नसल्याने यास पुरावा देऊन संबंधित अधिकारी मंडळींना गुंतवता येत नसल्याने, वितरक आणि कृषी सेवा केंद्र चालक गुमाने हा 'अर्थ'पूर्ण व्यवहार करण्यात मग्न आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget