DNA Live24 2015

'माध्यम मार्गीं'ना रडवणार कांदा..!

नगर (सचिन चोभे) | ओल्या दुष्काळामुळे कांदा पिक वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडलेले असतानाच बाजारात कांद्याचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळेंच आता ऐन दिवाळीत मध्यम वर्ग म्हणवून घेणार्या 'माध्यम मार्गीं'ना कांदा रडवणारअसेच चित्र आहे.
कांद्यासह पिकांचे भाव वधारले की, ओरड करणा-या मध्यमवर्गीयांसह मीडियालाही चेव येतो. मग शेतमालाचे भाव पाडण्यासाठी सरकारही आसुरी पद्धतीने पुढाकार घेते. आता पावसाने खरिप हंगामाची वाट लागल्याने कांदा पिक शेतातच सडत आहे. अशावेळी मागणी व पुरवठ्याचे गणित बिघडून कांद्याचे भाव वधारणार आहेत. ऐन दिवाळीत मग मध्यम वर्ग म्हणवून घेणा-यांना भाववाढीचा फटका बसणार आहे. पिज्झा-बर्गर व मल्टिप्लेक्सवर खर्च करण्याचे वांधे झाल्यास कांद्याचे भाव पाडण्याचे कर्तव्य सरकार बजावणार आहे.याबद्दल आताच चर्चा सुरू झाल्याने कांद्याची भाववाढ 'माध्यम मार्गीं'ना रडविणार की उत्पादक शेतक-यांचीच यातूनही माती होणार, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget