DNA Live24 2015

सोयाबीन खरेदी १८ ऑक्टोबर पासून

पुणे : शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदीसाठी पणन महामंडळाकडून राज्यातील २३ जिल्ह्यांतील सुमारे सव्वाशे केंद्रांवर सोयाबीन खरेदी करण्याचा प्रस्ताव नाफेडकडे देण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून १८ ऑक्टोबरपासून किमान आधारभूत किंमतीने सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे तर, मूग आणि उडिदाची खरेदी १६ ऑक्टोबरपासून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पणन महामंडळाकडून सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव नाफेडकडे पाठविण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत ही केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांकडून २२४० रुपये प्रतिक्विंटल या हमिभावाच्या दराने जवळपास ३५ लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी अपेक्षित आहे.

मूग आणि उडीदच्या खरेदीसाठी गेल्या ३ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. याच केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठीही नोंदणी करण्यात येणार आहे. ज्याठिकाणी अशी केंद्रे उपलब्ध नाहीत, त्याठिकाणी दोन दिवसात म्हणजे ११ ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी नवीन केंद्रे सुरू करण्यात येतील. मूग आणि उडिदाची खरेदी १६ ऑक्टोबरपासून तर सोयाबीनची खरेदी 18 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी केंद्रावर आपल्या शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करुन घेण्याचे शासनाकडून कळविण्यात आले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget