DNA Live24 2015

विषारी कीटकनाशकांचे बाधीत हजारांवर..! (स्त्रोत : द हिंदू)

एक निष्पक्ष आणि निर्भीड दैनिक म्हणून ‘द हिंदू’ या वृत्तपत्राने आपले मनाचे स्थान टिकवून ठेवले आहे. याच वृत्तपत्राच्या www.thehindu.com या पोर्टलवरील श्री. पवन दहत (pavan.dahat@thehindu.co.in) यांनी मांडलेले विचार खास ‘कृषीरंग’च्या वाचकांसाठी...कापूस पिकावर कीटकनाशके फवारणी केल्यानंतर जुलैपासून पूर्व महाराष्ट्रातील यवतमाळसह इतर काही जिल्ह्यातील सुमारे 1000 शेतकर्यांना विषारी रासायनिक कीटकनाशक प्रसाराला सामोरे जावे लागले आहे. यात सुमारे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

हे प्रकरण कसे घडले?
यवतमाळमधील शेतकरी बहुधा जनुकीय सुधारित 'बीटी कापूस' लागवड करतात. हे वाण कीटक-प्रतिरोधक मानले जाते. परंतु, यंदा कापूस यावर्षी 6 फूटापर्यंत विलक्षणरित्या वाढल्याने पिकांकडे कीटक आकर्षित झाले. डोक्याच्याही वर असलेल्या झाडाच्या शेंड्यावर कीटकनाशक फवारणी करताना काही विषारी कण श्वासात घेतले गेल्याने शेतकऱ्यांना विषबाधा झाली, असे मत मनोली गावातील शेतकरी रामदास वडाई यांनी व्यक्त केले.याबद्दल काही शेतकऱ्यांनी सांगितले की, या वर्षी पावसाची कमतरता कापूस वनस्पतींच्या वाढीसाठी उपयोगी ठरली आहे. कारण त्यास अधिक खत मिळाले. तसेच असमाधानकारकपणे आलेल्या दमट हवामान आणि कापसाच्या पिकाच्या उच्च घनतेमुळे कीटकनाशके फवारणी करताना शेतक-यांना रासायनिक संपर्कात येण्याची संधी मिळाली. त्याने रुग्णांना त्रास झाल्यामुळे रुग्णान्ना दवाखान्यात दाखल करणे गरजेचे होते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला, बेलोरोटा गावातील 35 वर्षांच्या मारूती बरबतने वसंतराव नाईक सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वार्ड क्रमांक 12 मध्ये एका बेडवर औषधोपचार सुरू केले होते. आता त्यांची तब्बेत बरी आहे. तर, काहींना फवारणीनंतर  दिसायलाही कमी झाल्याचे अनुभव आहेत. मात्र, त्यांना आता पुन्हा दिसायला लागले आहे. ऑर्थोफोस्फोरस हे कीटकनाशकांमध्ये वापरले जाणारे रासायनिक संयुगे श्वासाद्वारे घेतले, ज्यामुळे श्वसनास अडथळा आल्याने अनेकजण अत्यवस्थ झाल्याचे आढळून आले आहे. 
यात चूक काय होते?
बहुतेक शेतकरी फवारणी करताना त्यांचे तोंड आणि नाक क्वचितच झाकून टाकतात. याबद्दल समजावून सांगितले असता, वर्षानुवर्षे आम्ही फवारणी करतोय, याने काहीच होत नाही असेच उत्तर शेतकरी कृषी विभागाचे अधिकारी किंवा तज्ञांना देतात. त्यातही यापूर्वी अशा घटना उघडकीस न आल्याने शेतकरी फवारणीदरम्यान विशेष काळजी घेत नाहीत. घाटंजी शहरातील कृषी उत्पादनांचे डिस्ट्रीब्युटर जलाराम कृषि केंद्रांचे मालक भावेश गंधेचा यांनी दावा केला की, कीटकनाशकांमध्ये वापरल्या जाणार्या घटकांमध्ये काही फरक नसतो. ते म्हणाले की, "आम्ही समान उत्पादने विकतो आणि आपल्या दुकानासमोर मोठे बोर्ड लावून फवारणीदरम्यान काळजी घेण्याचेही आवाहन करतो. आम्ही काही शेतकऱ्यांचे वैरी नाहीत. मात्र, आता सरकारी विभागाच्या आदेशांमुळे आम्हाला मनात थोडी धाकधूक आहेच.”

यावर कधी पडला प्रकाश? 
जिल्ह्यासह राज्यभरात विविध भागांमध्ये जुलैच्या सुरूवातीपासून या भागाचे शेतकरी फवारणी करीत होते. त्यातून काही शेतकरी यापूर्वीच दवाखान्यातून उपचार घेऊन बरे झाले हाते. परंतु, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही समस्या उजेडात आली. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन (व्हीएनएसएसएम) यांच्या टास्क फोर्सने आता यावर विशेष लक्ष ठेवले आहे.
 
सरकारची प्रतिक्रिया काय होती? 
सुरुवातीला याची तीव्रता कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, प्रसारमाध्यमांनी या शेतकरी आणि मजुरांच्या बळींची बातमी लाऊन धरली. तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांनी हा मुद्दा उपस्थित करणे सुरू केल्यानंतरच मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस सरकारने कारवाई केली. या प्रकरणी संबंधितांवर कारवाईसाठी राज्य सरकारने सात सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आणि मृतांच्या कुटुंबांना त्यांना 2 लाख रुपयांचे नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. एसआयटीला आपला अहवाल सादर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने कृषी केंद्र मालकांना अनधिकृत कीटकनाशके न विकण्यास सांगितले आणि सावधानतेविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठीही निर्देश पत्र जिल्हा कृषी अधिकारी यांनी पाठविले. त्यानुसार मग राज्यभरात याप्रकरणी हलचाली सरू झाल्या. यावर तज्ञांनी सांगितले की, ही कृती खूपच उशीराने करण्यात आली. तर, कृषी विषयांवर सरकारचे सल्लागार असलेले ‘व्हीएनएसएसएम’चे प्रमुख श्री. किशोर तिवारी यांनी राज्य व कीटकनाशक कंपन्यांना या मृत्यू प्रकरणी दोष दिला. यवतमाळ जिल्ह्याने 2001 पासून 3920 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे रेकॉर्ड केले आहे आणि कुप्रसिद्धपणे "भारताची शेतकरी आत्महत्या राजधानी" असे बिरूद चिकटवून घेतले आहे. त्यातच कीटकनाशक विषबाधा प्रकरनामुळे आता हा जिल्हा आणि विदर्भ पुन्हा एकदा कृषी संकटाला जोडण्यात आला आहे. 
पुढे काय
शेतीमध्ये विषारी रसायनांचा वापर करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आता सरकारला याचा ठोस विचार करून कीटकनाशक विक्री आणि वापर याचे नियमन करावे लागेल. कृषी विस्तार सेवेत सरकार, कृषी विभाग, वितरक, कृषी सेवा केंद्र चालक यांना मोठी जबाबदारी घेऊन कृषी निविस्था वापराबद्दल शेतकऱ्यांत जागृती करण्याची गरज आहे. 


(स्वैर अनुवाद : श्री. सचिन मोहन चोभे, संपादक)

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget