DNA Live24 2015

सुरतमध्ये सापडला 'विकास'..!


'कृषीरंग' या साप्ताहिकाच्या नियमित प्रकाशनापूर्वी पोर्टल सुरू करून या माध्यम समूहाचे काम सुरू केले आहे. त्यानुसार आत्ता गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही 'मोदींच्या गुजरातचे वास्तव' मांडण्याच्या उद्देशाने पहिली स्वारी सुरतेवर केली आहे.

मराठी माणूस म्हणून आपल्या सर्वांनाच सुरत शहर चांगलं माहिती आहे. मग इतिहासातील छत्रपती शिवरायांच्या स्वारीचे प्रकरण असो की, कापड उद्योगामुळे आपल्या हजारो मराठी कुटुंबियांच्या पोटाला आधार देणारे शहर म्हणून हे आपल्याला परिचित आहेच. सुरतेसह नवसारी, बार्डोली आणि महाराष्ट्रालाच जिल्ह्यांत मराठी माणूस अजुनही मोठ्या प्रमाणात आहे. त्या शहरांच्या विकासात गुजराती धनिकांप्रमानेच याच राज्यातील बहुजनांसह मराठी माणसाचा तितकाच वाटा आहे. सुरतेत फिरताना हे सगळं पावलोपावली दिसतं. त्याचाच आढावा वाचकांसमोर मांडण्यासह गुजरात मॉडेल व मोदींच्या विकासावर प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न...


गुजरात म्हटले की, भारतीयांना मोदी आठवतात. सुरतमध्ये याचेच पोस्टर रस्तोरस्ती दिसतात. महापालिकेनेही मोदी यांनाच वंदनीय म्हणून सगळीकडे त्यांनाच याचे फुलं क्रेडिट दिलेले आहे. सुरतमधील स्वच्छतागृह आणि रस्ते आपल्या पुण्यातील रस्त्यांपेक्षा स्वच्छ नक्कीच आहेत. मराठी मुलखात असणाऱ्या मार्केट यार्डातील बजारापेक्षा इथल्या समित्या नक्कीच बेस्ट आहेत. अशा पद्धतीने भाजपाच्या राज्यातील सुरत पुणेकरांना नक्कीच उजवे वाटेल. तर, रेस्ट ऑफ महाराष्ट्र वाल्यांना गुजरात म्हणजे युरोप नाही पण चीन नक्कीच वाटेल. अशा पद्धतीने सुरतमध्ये पहिल्यांदा फिरताना आपल्याला मोदी आणि भाजपा यांचा परम आदर वाटू लागतो. तशा पद्धतीचं चित्र नक्कीच दक्षिण गुजरातच्या या शहरात आहे. पण इथला माणूस याचे १०० टक्के श्रेय आताच्या सत्ताधाऱ्यांना देण्यास तयार नाही. नव्याने पाहणाऱ्यांना किंवा तरुणांना भाजपा हाच दक्षिण गुजरातचा तारणहार वाटतो. तर, जुन्या मंडळींचे म्हणणे असते की, काँग्रेसच्या राज्यातही हा भाग सौराष्ट्र व इतर भागांच्या तुलनेत सधन व संपन्न होताच. अशा पद्धतीने येथे समिश्र वातावरण असून काटे की टक्कर होण्यावर सुमारे ६० टक्के ठाम आहेत.

हे सगळं पाहून, ऐकून आणि अनुभवून मलाही प्रश्न पडलाय की, सुरतेच्या विकासात मोलाचा वाटा नेमका कोणाचा? मतदारांचा, भाजपचा की कॉंग्रेसचा..?

त्याबद्दलचे मत मांडतो पुढच्या लेखात...

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget