DNA Live24 2015

सुरतकरांनी 'विकास'ला वाढवलं..!गुजरातमधील आर्थिक केंद्र म्हणजे सुरत, पोरबंदर, बडोदा आणि अहमदाबाद. त्यापैकी सुरत हे केंद्र ऐतिहासिक अर्थाने महत्त्वाचं. त्याच सुरतच्या गल्लोगल्ली विकास वाढल्याचा खुणा दिसतात. त्या पाहून तरुण भारतीय भाजपा आणि मोदी यांचा भक्त होऊन जातो. परंतु, या शहराच्या भागात फिरताना आणि सुरताकरांशी चर्चा करताना ऐतिहासिक सुरतचे महत्त्व पटते. या शहराच्या विकासात कोणा एका संघटना किंवा राजकीय पक्षाचे स्थान नसल्याचेच ध्यानात येते. हजार वर्षांची विकासाची परंपरा जपणारे आणि प्रेमाने वाढविणारे हे शहर असल्याचीच खात्री पटते.

मराठी माणूस म्हणून विचार करा की, आपल्या शिवाजी राजांच्या स्वराज्याला आर्थिक चणचण जाणवल्यावर त्यांनी कुठे स्वारी करून व्यापाऱ्यांकडून निधी आणला होता..? ते ठिकाण होते सुरत. म्हणजेच सुरत आत्ता विकसित झालेले नाही. त्यांचा विकास ऐतिहासिक आहे. अशा शहराच्या विकासाला सुरताकरांनी जोपासले आणि प्रेमाने वाढवले. त्यात कोणा एकाचा वाटा नगण्य आहे. सुरतकराही याचे भान राखून आहेत. त्यामुळेच गुजरातमध्ये मोदींच्या पार्टीला बहुमत मिळेल, असे सांगणारे शहराच्या इतिहासाबद्दल बोलताना यावरही भरभरून सांगतात. सुरत शहरात सापडलेला विकास काँग्रेस किंवा भाजपा यांच्याकडून झालेला नसून त्याचे संपूर्ण श्रेय सुरतमधील व्यापारी व कष्टकरी बांधवांचे आहे...
चला, आज दिवसभर फिरून कळवितो गुजरातच्या निवडणुकीच्या वातावरणावर...

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget