DNA Live24 2015

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस शानदार प्रारंभ


अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस कर्जत येथे आज शानदार प्रारंभ झाला. सहभागी खेळाडूंचे शिस्तबद्ध संचलनभान हरपायला लावणारे नायगावच्या ढोलपथकांचे ढोलवादन आणि कर्जतकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात या स्पर्धेस प्रारंभ झाला. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी 16 संघांचे साडेतीनशेहून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून त्यांचा खेळ पाहण्याची उत्सुकता कर्जतकर आणि जिल्हावासियांमध्ये आहे. राज्याचे जलसंधारण  तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी या स्पर्धेसाठीचे ध्वजारोहण करुन आणि  ज्योत प्रज्वलीत करुन शानदार उद्घाटन केले. यावेळी आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.

 कर्जतकरांमध्ये या स्पर्धेविषयी प्रचंड उत्सुकता असल्याचे चित्र संचलनावेळी पाहायला मिळाले. फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमध्ये पालकमंत्री प्रा. शिंदे विराजमान झाले होते. त्यानंतर शहराचे प्रथम नागरिक नामदेव राऊत आणि इतर मान्यवर सजवलेल्या ट्रौलीमध्ये सहभागी झाले. सुरुवातीला विविध वेशभूषेत असलेली शालेय मुलेत्यानंतर महिलांचे ढोल-ताशा पथकाने वेधून घेतलेले लक्षलेझीम पथकांच्या तालावर कर्जतकरांनी धरलेला ताल आणि एकापाठोपाठ एक महिला आणि पुरुषांच्या संघांच्या आगमनावेळी टाळ्यांच्या कडकडाटात झालेले स्वागत याने सारेच वातावरण कबड्डीमय होऊन गेले. त्यातच पोलीसांच्या बैन्डने वातावरणात नवा जोष संचारला.
शहराच्या विविध भागातून हे संचलन होत असताना शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे नोंदवलेला सहभाग हे या संचलनाचे वैशिष्ट्य ठरले.
 श्री सदगुरु गोदड महाराज क्रीडानगरी अक्षरश: क्रीडाप्रेमींनी फुलून गेली. सायंकाळी प्रकाश झोतात सामने होणार असले तरी दुपारपासूनच क्रीडाप्रेमींची पावले स्पर्धास्थळाकडे वळत होती. संपूर्ण प्रेक्षक गॅलरी खचाखच भरली होती. शालेय मुलांपासून ते युवा वर्ग आणि महिलांचा लक्षणीय सहभाग जाणवत होता. अतिशय उल्हासपूर्ण वातावरणात या खऱ्या अर्थाने क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली.
 आमदार भीमराव धोंडेजिल्हाधिकारी अभय महाजनअपर  जिल्हाधिकारी भानुदास पालवेनगराध्यक्ष नामदेव राऊतसभापती पुष्पाताई शेळकेमहाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी दत्ताभाऊ पाथ्रीकरसंभाजीराव पाटीलबाबूराव चांदेरेपुंडलीक शेजवळसुनील जाधवराजेंद्र फाळके,  शांताराम जाधवमोहन भावसारविजय पाथ्रीकररमेश भेंडगिरीभारत गाढवेक्रीडा उपसंचालक विजय संतानआस्वाद पाटीलउपविभागीय अधिकारी अर्चना नष्टेराजेंद्र फाळकेशिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठानचे सुभाष तनपुरेजिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशीप्रसाद ढोकरीकरअशोक खेडकर,क्रीडा अधिकारी श्री. खुरंगेयांच्यासह विविध मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget