DNA Live24 2015

रुईछत्‍तीसी येथे राष्ट्रीय आरोग्‍य जनजागृती अभियानाचे आयोजन


अहमदनगर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य व महिला बालकल्याण विभाग तसेच नगर तालुक्‍यातील ग्रामपंचायत रुईछत्‍तीसीच्‍या वतीने दिनांक 29 व 30 डिसेंबर 2017 रोजी रुईछत्‍तीसी येथे राष्ट्रीयआरोग्‍य  जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
जनतेला आरोग्याची तसेच सरकारच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती व्हावी यासाठी मिशन इंद्रधनुष्‍य ( बाळाचे संपूर्ण लसीकरण ) क्षयरोग व कुष्‍ठरोग निदान व परिवार कल्‍याण या विषयी माहिती देवून मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
दिनांक 30 डिसेंबर 2017 रोजी मुख्‍य  कार्यक्रमाचे उदघाटन  मा. खासदार श्री दिलीप गांधी यांच्‍या हस्‍ते सकाळी 10 वाजता होणार आहे.  यावेळी विविध पदाधिकारी तसेच जिल्‍हा परिषदेचे आरोग्‍य, महिला बालकल्‍याण, स्‍वच्‍छता विभागाचे अधिकारी तसेच राज्‍य शासनाच्‍या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक 29 डिसेंबर 2017 रोजी रुईछत्‍तीसी येथे महिला बालकल्याण विभाग तसेच शाळा महाविद्यालयाच्या वतीने रांगोळी स्पर्धा, सकस आहार स्पर्धा तसेच सुद्दढ बालक स्पर्धा घेण्यात येईल.
दिनांक 30 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 9 वाजता रुईछत्‍तीसी गावात आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत पदधिकारी, अधिकारी तसेच ग्रामस्थ, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी मुख्य कार्यक्रमाद्वारे मिशन इंद्रधनुष्‍य ( बाळाचे संपूर्ण लसीकरण ) क्षयरोग व कुष्‍ठरोग निदान व परिवार कल्‍याण, आई-बाळाचे आरोग्य, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, स्वच्छ भारत अभियान या विषयांवर विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा  मान्यवरांच्या हस्ते  पारितोषिके देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी आरोग्‍य विभाग, महिला बालकल्‍याण तसेच जिल्‍हा कृष्‍ठरोग आणि क्षयरोग कार्यालयातर्फेस्टॉल्स लावण्यात येणार आहेत. तसेच मनोरंजनाच्या माध्यमातूनही आरोग्याची माहिती देण्यात येणार आहे. सायंकाळी विविध जनजागृतीचे लघु चित्रपटही दाखविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील जनतेने घ्‍यावा, असे आवाहन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या अहमदनगर येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले आहे.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget