DNA Live24 2015

हिवरे बाजार गाव इतर गावाना प्रकाश देणारे गाव आहे : जिल्हाधिकारी श्री.अभय महाजन

नगर : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये ३१ डिसेंबर ग्रामसभेच्या रूपाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नागरिक हरिभाऊ ठाणगे सर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधिकारी अभय महाजन होते.

दरवषी प्रमाणे सुरवातीस मागील वर्षाचा आढावा व नवीन वर्षाच्या कामाचे नियोजन ग्रामसभेत केले. सुरवातीस मागील ३१ डिसेंबर २०१६च्या ग्रामसभेत मंजूर झालेले विषय व त्या कामांचा आढावा श्री.पादीर एस.टी.सर यांनी घेतला. मागील एकूण २३ विषयांपैकी २२ विषय पूर्ण झाले. तसेच पुढील वर्षासाठी प्रस्तावित कामांचा आराखडा ग्रामसेवक श्री.सचिन थोरात यांनी ग्रामस्थांपुढे चर्चेस मांडला.मागील वर्षी झालेल्या कामांचा आढावा व संपूर्ण कामाचा हिशोब रोहिदास पादीर गुरुजी तसेच सौ.अनिता बांगर, सौ.विजया निमसे,ग्रामसेवक थोरात व सरपंच पोपटराव पवार यांनी सादर केला. ग्रामसभेतील आढावा व प्रस्तावित विषयांवर विस्तृतपणे चर्चा झाली. चर्चेमध्ये सर्व ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला व विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.

एन वेळी येणा-या विषयांमध्ये जेष्ठ नागरिक रावसाहेब पवार यांनी रानडुकरांपासून शेतीचे होणारे नुकसान व त्यावत उपाय म्हणून संपूर्ण शिवारालाच सामुदायिक कंपाउंड करण्याबाबतची सुचना मांडली त्यावर सविस्तर चर्चा झाली व येत्या काळात सर्वानुमते निर्णय घेण्याचे ठरले. शाश्वत विकास शाश्वत आनंद नुसार विषमुक्त शेती थांबवून नैसर्गिक शेती करून आरोग्याच्या दृष्टीने सामुहीक प्रयत्न करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. चालू वर्षीच्या पाण्याच्या ताळेबंदानुसार उन्हाळी पिकांचे नियोजन करण्याचे ठरले.विविध हंगामामध्ये उत्पादित धान्य मोहत्सव हिवरे बाजार ब्रॅडने विक्रीस उपलब्ध करणे. संपूर्ण ग्रामसभेचे अवलोकन जिल्हा अधिकारी साहेब तसेच उपस्थित सर्व अधिका-यांनी केले. मागील वर्षी विविध कामांमध्ये मोलाचे सहकार्य करणा-या अधिकारी , पदाधिकारी, पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी यांचा हिवरे बाजार परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.मा.सरपंच पोपटराव पवार यांनी पुढील वर्षी करावयाच्या विकास नियोजनासंदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामसभेच्या समारोप प्रसंगी जिल्हा अधिकारी श्री.अभय महाजन यांनी ग्रामसभेला संबोधीत करताना म्हणाले हिवरे बाजार मध्ये गेल्या २८ वर्षात जी वेगवेगळ्या प्रकारची कामे व योजना सक्षमतेने राबविल्या त्यामुळेच हिवरे बाजारच्या रूपाने नगर जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर गेले. हिवरे बाजारच्या यशाचे गमक येथील लोकसहभाग व पोपटरावांसारख्या नेतृत्वात आहे म्हणूनच आज हिवरे बाजारचे अनुकरण करण्याच्या दृष्टीने जगभरातील विविध क्षेत्रातील माणसे येथे सातत्याने भेट देत असतात.स्वत:साठी काम करणारे खूप आहेत परंतु तुम्ही गावकरी इतर गावांसाठी प्रकाश देण्याचे फार मोठे काम करत आहात. सातत्य हे या गावाचे आणखी एक वैशिष्ठ्य आहे. काही तरी नाविन्यपूर्ण करण्याची सवय व ताकद या गावात आहे. प्रशासनात खूप चांगल्या गोष्टी व चांगले अधिकारी आहेत त्याचा उपयोग या गावाप्रमाणे इतरही गावांनी करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पोपटरावसहित येथील ग्रामस्थ सदैव कार्यरत आहेत.

        ग्रामसभेनंतर संपूर्ण गावाला लापशी,सांबर-भात जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ग्रामस्थांनी नवीन वर्षाचे स्वागत फटाके वाजवून केले. या विशेष ग्रामसभेसाठी मा.श्री.गुंजाळ साहेब दुय्यम निबंधक , मा.श्री.सतीश भागवत उपअभियंता सा. बा. उपविभाग नगर, मा.श्री.ऋषिराज गोसकी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल विकास यंत्रणा,मा.श्री.सुधीर पाटील तहसीलदार नगर,मा.श्री.किशोर परदेशी सहाय्यक पोलीस निरीक्षक नगर तालुका पोलीस स्टेशन ,मा.श्री.एम.डी.झावरे शाखा अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग नगर ,मा.श्री.निलेश शिंदे कनिष्ठ अभियंता महावितरण कंपनी,मा.श्री.भास्कर शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग नगर,मा.श्री.पोकळे साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण,मा.श्री.राकेश पांगत जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड,मा.श्री.गव्हाणे तालुका बचत गट समन्वयक पंचायत समिती नगर,मा.सौ.उषाताई ठाणगे नगरसेविका अहमदनगर,उद्योजक शिवाशेठ बोरकर, बांधकाम व्यावसायिक सुभाषशेठ पादीर, बांधकाम व्यावसायिक हानिफभाई शेख,सौ.लिलाबाई रोहकले सरपंच भाळवणी,सौ.आश्विनी केदार सरपंच दैठणे गुंजाळ,श्री.साहेबराव गुंजाळ उपसरपंच दैठणे गुंजाळ,सौ.संगीता कुलट सरपंच खातगाव,श्री.ज्ञानेश्वर पठारे उपसरपंच खातगाव. 
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget