DNA Live24 2015

शनिवारपासून डाळिंब संघाचे अधिवेशन आणि प्रदर्शन

पुणे : पुण्यातील बाजार समिती परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी दहा वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते डाळिंब संघाचे अधिवेशन आणि प्रदर्शनाचे उद्‍घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर असतील. त्याशिवाय अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जैन इरिगेशन सिस्टिमचे अध्यक्ष अशोक जैन आणि ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ कॅथल डेन्स हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी (ता. ६) आणि रविवारी (ता. ७) दोनदिवसीय वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने ‘अडचणीच्या काळातील शाश्‍वत डाळिंब शेती’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक यांनी दिली. या परिसंवादात सहभागासाठी संघाच्या सभासदांना ५०० रुपये शुल्क असून, अन्य शेतकऱ्यांसाठी १००० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी व्यवस्थापक मारुती बोराटे - ७५८८५९२८९१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget