DNA Live24 2015

‘लोकशाही, निवडणुक व सुशासन’ विषयावर नाशिक येथे परिषद

नाशिक : राज्यघटनेच्या 73 व 74 व्या घटनादुरूस्ती रौप्यवर्षानिमित्त  राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार 5 जानेवारी 2018 रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे ‘लोकशाही, निवडणुक व सुशासन विषयावर विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेस आजी-माजी महापौर, जि.प.अध्यक्ष, पं.स.सभापती, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्रात ‘स्थानिक स्वराज्य संस्था व शासन-परस्पर संबंध’ या विषयावर महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार, ॲड. अभय आगरकर नगरसेवक, अहमदनगर, यशदा येथील प्राध्यापक अजय सावरीकर, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक विरेंद्र जाधवराव आदि मान्यवर चर्चा करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात ‘स्थानिक स्वराज्य संस्थाकडुन सर्व समावेशक प्रशासन (प्रामुख्याने महिला व दुर्बल घटकांसाठी)’ या विषयावर चर्चा करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे, स्मिता वाघ, पाणी फाऊंडेशनचे सल्लागार नामदेव ननावरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपुर, प्राध्यापक जितेंद्र वासनिक आदी उपस्थित राहणार आहेत.
तिसऱ्या सत्रात ‘निवडणुक सुधारणा’ या विषयावर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुटेपाटील, पुणे महानगरपालिका उपायुक्त सतिश कुलकर्णी, मालेगाव महानगरपालिका उपमहापौर युनूस ईसा, धुळे उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील आदि मान्यवर चर्चा करणार आहेत.
चौथ्या सत्रात खुली चर्चा होणार असुन विभागीय आयुक्त महेश झगडे तसेच वरील तीनही सत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. परिषदेतील चर्चासत्राच्या आधारे अहवाल तयार करून निवडणूक आयोग आणि शासनास सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या ycmou.ac.in या संकेतस्थळावर आणि www.facebook.com/ycmouniversity  या फेसबुक पेजवर करण्यात येणार आहेअधिकाधीक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावाअसे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget