DNA Live24 2015

अडीच लाखांच्या म्हशीचा सगळीकडेच बोलबाला..!

नगर : प्रतिनिधी
घोडेगाव (ता. नेवासा) येथील जनावरांच्या बाजारात विकल्या गेलेल्या अडीच लाख रुपये किमतीच्या म्हशीचा सोशल मिडीयावर जोरात बोलबाला आहे. या म्हशीची सर्वच प्रमुख वृत्तपत्रांनी दाखल घेतली आहे. सध्या याचीच चर्चा आहे.

घोडेगावच्या म्हशीच्या बाजारात जातिवंत म्हशींची खरेदी व विक्री होते. बैल, म्हशी, विविध प्रकारच्या गायी तसेच कांदा बाजार असा व्यापार घोडेगावात होतो. बाजारात म्हसाण, मुऱ्हा, जाफराबादी, गावरान, पंढरपुरी अशा म्हशींच्या जाती खरेदी-विक्रीसाठी येतात. या वर्षी शुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीचा खरेदी-विक्रीचा उच्चांक मोडला गेला.

जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे शुक्रवारी आठवडे बाजारात म्हसाण जातीच्या जोडीने खरेदीचा विक्रम मोडला. तब्बल २ लाख ४१ हजारांना ही जोडी विकली गेली. या दोन म्हशी औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव येथील बागायतदार एकनाथ साळे यांनी खरेदी केल्या आहेत. म्हशी बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.बाजारातील अलीकडील हा विक्रम समजला जातो.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget