DNA Live24 2015

मोदी सरकार शेतकरीविरोधी : अण्णा हजारे



नगर : प्रतिनिधी
उद्योगपतींवर करोडो रुपयांची खैरात करणारे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीच्या रामलिला मैदानावर ‘करेंगे या मरेंगे’च्या माध्यमातून आवाज उठविणार असल्याचा पुनरुच्चार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला.

पाथर्डी येथील निऱ्हाळी नाट्यगृहात बर्ड संस्थेच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनानिमीत्त आयोजित ‘प्रेरणा २०१८’ कार्यक्रमात हजारे बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, डॉ. दीपक देशमुख, डॉ. शिरीष जोशी, डॉ. भाऊसाहेब लांडे, अमोल बडे, राजेश काळे, मनोज गोल्हार हे उपस्थित होते.

या वेळी अण्णा हजारे म्हणाले, व्हिएतनाम व जपान हे देश युवकांच्या योगदानामुळे प्रगतीच्या दिशेने गेले. आपली युवाशक्ती जागृत झाली पाहिजे. समाजाच्या चौकटीत कसं वागावं व कसं जगावं हे समजाणारे संस्कार झालेली ही पिढी देशाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हा लढा सुरू आहे. सरकारी अधिकारी व नोकराने त्यांची चल-अचल सपंत्ती जाहीर करण्याचा कायदा कमकुवत करण्यासाठी मोदींनी २७ जलै २०१६ रोजी एक विधेयक लोकसभेत आणले. २८ जुलै रोजी राज्यसभेत गेले व २९ जुलै रोजी राष्ट्रवतींनी त्यावर सही केली. कोणतीही चर्चा झाली नाही हे बरे नाही. माझा संघर्ष सुरू झाला आहे. शेतीमालाला भाव मिळावा व शेतकऱ्यांना पाच हजार रुपये महिना पेन्शन मिळावी, यासाठी लढा उभारणार आहे. विरोधी पक्षाचाही प्रभाव पडत नाही. ते बोलायला लागले की तुमचं मागचं बाहेर काढू असे सत्ताधारी सांगतात व लगेच सर्व बंद होते. मात्र, आम्ही याविरोधात आवाज उठवून शेतक-यांना न्याय मिळवून देणार आहोत.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget