DNA Live24 2015

कृषि क्षेत्रात भविष्य : पद्मभूषण डॉ. विजय भटकर

राहुरी : प्रतिनिधी
जगाच्या वेगवान आणि बदलत्या संस्कृतीत भविष्यात आपल्यासमोर बरेच आव्हाने येणार आहेतया आव्हाणांना सामोरे जाण्यासाठी नविन संशोधन आणि कल्पकता हे शिक्षणाचा अविभाज्य भाग होणे गरजेचे आहेया वेगवान बदलत्या युगात कृषिला माहिती तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहेहवामान बदलांच्या आव्हाणांना सामोरे जाऊन देखील आपल्या देशाने कृषि उत्पादनात विविध विक्रम केले आहेतरुणांनी कृषि किंवा कृषि पुरक क्षेत्रात पुढे यावे या पुढे कृषि क्षेत्रालाच भविष्य आहे असे प्रतिपादन अविष्कार-2017 उद्घाटन प्रसंगी पद्मभूषण डॉविजय भटकर यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठराहुरी येथे राज्यस्तरिय 12 वी महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ संशोधन स्पर्धा आविष्कार-2017 चे उद्घाटन उत्साहत संपन्न झालेउद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बिहार येथील नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉविजय पीभटकर बोलत होते.  अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.के.पीविश्वनाथा उपस्थित होतेयावेळी व्यासपीठावर गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉचंद्रशेखर भुसारीसंचालक विस्तार शिक्षण डॉ.किरण कोकाटेअधिष्ठाता डॉअशोक फरांदेसंचालक संशोधन डॉशरद गडाख,अविष्कारचे समन्वयक निरीक्षक डॉप्रमोद पाबरेकरवित्त समिती समन्वयक श्री.विवेक साठेसहयोगी अधिष्ठाता (पमडॉ.जगन्नाथ पाटीलनियंत्रक श्रीविजय कोते,कुलसचिव डॉदिलीप पवारविद्यापीठ अभियंता श्रीमिलिंद ढोके उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शन करतांना डॉविजय भटकर पुढे म्हणालेमी कोण आहेमाझ्या जीवनाचे प्रयोजन कायदेशासाठी मी काय करणारहे प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याने या वेगवान बदलत्या संस्कृतीमध्ये स्वतःला विचारणे गरजेचे आहेआपली संस्कृती ज्ञानावर आधारीत आहेनवनविन तंत्रज्ञान विकसीत करण्यावर भर द्यातरुणांना पुढे मोठे आव्हानांना सामोरे जायचे आहे.कृत्रीम बुध्दीचे मशीन मानवाची जागा घेत आहेयामुळे नोकर्यांच्या संधी दिवसें-दिवस कमी होत आहेपुढे काही वर्षांनी सुपर संगणक तुमच्या खिशात असेल.देशाचे भविष्य तरुणांच्या संशोधनावर अवलंबुन आहेअविष्कार सारखा उपक्रम तरुणांच्या संशोधन बुध्दीला चालना देईल.महात्मा फुले कृषि विद्यापीठाने 50 वर्षात कृषि संशोधनशिक्षणात मोठे योगदान दिले आहेया विद्यापीठाने अव्वल दर्जाचे काम केलेले आहे.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉके.पीविश्वनाथा म्हणालेहे विद्यापीठ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत आहेआत्तापर्यंत विद्यापीठाने एक लाख कृषि पदवीधर दिले आहेतविविध पिकांचे 257 वाण विकसीत केलेले आहेतदेशातील डाळिंबाखालील 90टक्के क्षेत्र हे या विद्यापीठान विकसीत केलेल्या फुले भगवा वाणाखाली आहे.विद्यापीठाने विकसीत केलेल्या ऊसाचा फुले 265 या वाणाने राज्याला 7000करोड मिळून दिले आहेविद्यापीठाच्या संशोधनाने शेतकर्यांचा कायापालट केलेला आहेभारत देश हा त्याच्या संस्कृतीसाठी ओळखला जातो यामध्ये कृषि संस्कृती ही सर्वं संस्कृतीची जनक आहेया कृषि क्षेत्रात तरुणांनी जास्तीत जास्त संशोधन करावे असे कुलगुरुंनी आवाहन केलेयावेळी राजभवनातील कार्यक्रम समन्वयक निरीक्षक डॉप्रमोद पाब्रेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉकिरण कोकाटे यांनी करुन दिलीकार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि स्वागत डॉअशोक फरांदे यांनी केले.
            याप्रसंगी अविष्कार-2017माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आलेयावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संशोधन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलेअविष्कार-2017 संशोधन स्पर्धेमध्ये राज्यातील कृषि व अकृषि असे एकुण 20 विद्यापीठांचे 600 विद्यार्थ्यांनी विविध संशोधन प्रकल्प सादर केलेत.स्पर्धेतील संशोधन प्रकल्पांचे मुल्यमापन परराज्यातून 36 तज्ञ परीवेक्षक करत आहेतया संशोधन स्पर्धेमध्ये विविध विभागात विद्यार्थी त्यांचे संधोधन प्रकल्प सादर केलेयामध्ये पहिला विभाग मानवताभाषा आणि कलादुसरा विभाग वाणिज्यव्यवस्थापन आणि विधीतिसरा विभाग विज्ञानचौथा विभाग कृषि व पशुसंवर्धनपाचवा विभाग अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानसहावा विभाग औषधे आणि फार्मसी या सहा विभागातून पदवी,पद्युत्तरपी.एच.डीआणि शिक्षक आपले संशोधन  प्रकल्प सादर केले.
            या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.प्रेमराज चव्हाण यांनी केले तर आभार कुलसचिव डॉदिलीप पवार यांनी मानले.याप्रसंगी राजभवनातील निरीक्षक श्री.ईश्वर मोहरलेश्रीप्रशांत गावंडेसौ.अनिता रविकुमारश्रीश्रीकांत पाटील,सर्वं कृषि महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाताविभाग प्रमुखशास्त्रज्ञ,कर्मचारीविद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget