DNA Live24 2015

सोसायटी सभासदत्व दिलेच पाहिजे : पणन मंत्री

नगर : जिल्ह्यातील सर्वच खातेदारांना विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सभासदत्व दिले पाहिजे. त्यासाठी सहकार विभागाने मोठी मोहीम हाती घ्यावी. तलाठ्यांकडून खातेदारांची नावे घेऊन त्यांना विकास संस्थेचे सभासदत्व घेण्यासाठी आग्रही राहिले पाहिजे, असे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.
सध्या एकूण 11 लाख 84 हजार 380 खातेदारांपैकी 8 लाख 95 हजार 575 पात्र खातेदार आहेत. आतापर्यंत यातील बहुतांश जणांना सभासदत्व दिले असले तरी ते शंभर टक्के होईल, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील काष्टी विकास संस्थेने सहकार क्षेत्रात चांगले काम केल्याचे सांगून अशाप्रकारे इतर संस्थांनीही पुढे आले पाहिजे. नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विविध संस्थांनी जिल्ह्यात चांगले काम केल्याचे सांगून श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यात चांगल्या पद्धतीने उपक्रम सुरु झाल्याचे त्यांनी नमूद केले.
विकास संस्थांच्या बैठकांना सहायक निबंधकांनी हजेरी लावलीच पाहिजे. सहकार विभागाच्या विविध योजनांची माहिती या बैठकांतून देणे आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे, असे सांगून सहकारमंत्री देशमुख यांनी विकास संस्थेच्या लेखापरीक्षणाबाबतही सूचना केल्या. प्रत्येक विकास संस्था त्यांच्या लेखापरीक्षकामार्फत कामकाजाचे लेखापरीक्षण करीत असले तरी विशेष लेखा परीक्षकांनी प्रत्येक तालुक्यातील किमान पाच संस्थांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करावे, जेणेकरुन वस्तुस्थिती लक्षात येईल आणि चुकीचे काही घडत असेल, तर त्याला थांबवता येईल, असे निर्देश दिले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget