DNA Live24 2015

गोदाम बांधकामासाठी निधी : पणन मंत्री सुभाष देशमुख

मुंबई : शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने शेतमाल तारण कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविता यावी यासाठी बाजार समित्यांकडे चांगल्या क्षमतेची गोदामे उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासाठी बाजार समित्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तारण ठेवलेल्या मालाच्या बदल्यात त्यांना द्यावयाच्या कर्जासाठीचा निधीही राज्य कृषी पणन मंडळामार्फत बाजार समित्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. वार्षिक फक्त ३ टक्के इतक्या कमी व्याजदरात बाजारसमित्यांना हा निधी देण्यात येत आहे. या योजनेतून बाजार समित्यांचेही सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरीत बाजार समित्यांनीही या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे.
योजनेत अकोला जिल्ह्यातील ५, अमरावती जिल्ह्यातील १०, बुलढाणा जिल्ह्यातील ४, यवतमाळ जिल्ह्यातील १३,वाशिम जिल्ह्यातील ६, औरंगाबाद जिल्ह्यातील ५, जालना जिल्ह्यातील ७, परभणी जिल्ह्यातील २, हिंगोली जिल्ह्यातील ३,सांगली जिल्ह्यातील १, गडचिरोली जिल्ह्यातील २, गोंदीया जिल्ह्यातील २, चंद्रपूर जिल्ह्यातील ५, नागपूर जिल्ह्यातील २,भंडारा जिल्ह्यातील २, वर्धा जिल्ह्यातील ४, अहमदनगर जिल्ह्यातील ३, नाशिक जिल्ह्यातील २, पुणे जिल्ह्यातील १, सोलापूर जिल्ह्यातील १०, उस्मानाबाद जिल्ह्यातील ३, नांदेड जिल्ह्यातील ३, बीड जिल्ह्यातील २ तर लातूर जिल्ह्यातील ६ बाजार समित्यांनी या योजनेत सहभाग घेऊन शेतकऱ्यांना लाभ देण्यास सुरुवात केली आहे.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget