DNA Live24 2015

‘शेतमाल तारण कर्ज योजने'चा लाभ घ्या : पणन मंत्री सुभाष देशमुख

मुंबई : शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने शेतमाल तारण कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. शेतमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतमालाला गोदाम तसेच अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या या योजनेत आतापर्यंत १०३ बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. या योजनेंतर्गत चालू वर्षी ८६ हजार १६६ क्विंटल शेतमाल बाजारसमित्यांनी तारण ठेवला असून शेतकऱ्यांना मागील फक्त 4महिन्यात सुमारे १६ कोटी रुपयांचे तारण कर्ज देण्यात आले आहे, अशी माहिती सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
विशेषत: सुगीच्या काळात बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल दाखल होतो व त्यावेळी त्याचे भाव पडतात, अशा वेळी शेतकऱ्यांच्या मालाला तारण देणारी ही महत्वाकांक्षी अशी योजना असून यात उर्वरीत बाजार समित्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही मंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे. शेतकऱ्यांनीही कमी भावाच्या काळात या योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले आहे.
या योजनेतून तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, भरडधान्य आदीला लाभ दिला जातो. शेतकरी कमी भावाच्या काळात ही उत्पादने बाजार समित्यांकडे तारण ठेवू शकतात. यासाठी त्यांना बाजारसमितीमार्फत मोफत गोदाम उपलब्ध करुन दिले जाते. तसेच फक्त ६ टक्के इतक्या कमी व्याजदरात शेतकऱ्यास शेतमालाच्या त्यावेळी असलेल्या भावाच्या ७५ टक्के रकमेइतके कर्ज लगेच उपलब्ध करुन दिले जाते. त्यानंतर वाढीव भावाच्या काळात शेतकरी आपला माल विकू शकतो व कर्जाची परतफेड करुन वाढीव रक्कम त्याला परत मिळते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोफत गोदाम, गरजेच्या वेळी कर्ज आणि शेतमालास चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे. या योजनेत आतापर्यंत १०3 बाजारसमित्यांनी सहभाग घेतला आहे. २०१३ मध्ये ही संख्या फक्त ३३ इतकी होती. राज्यातील उर्वरीत बाजार समित्यांनीही या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे. राज्यात एकूण ३०७ इतक्या बाजार समित्या आहेत.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget