DNA Live24 2015

'राष्ट्रवादी'वर कुरघोडीसाठी विखे सज्ज ?


नगर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीला अवघे दीड वर्षे बाकी असतानाच जिल्ह्यामध्ये शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी करण्यासाठी विखे कुटुंबिय सज्ज झाले आहे
त. या डावातून कोणाची 'युती' होऊन, कोणाची 'आघाडी' शाबीत राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सत्ता कोणाचीही असो पवार साहेब विरुद्ध माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे असाच सामना नगर जिल्ह्याने अनुभवला आहे. आता विखेंची तिसरी पिढी अशाच राजकीय लढाईसाठी पवार साहेबांशी दोन हात करण्याला तयार असल्याचेच चित्र जिल्ह्यात आहे. यास निमित्त ठरले आहे, आगामी लोकसभा निवडणुकीचे. कारण नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादीकडे असुनही 'विखे हाच पक्ष' असा नारा देत युवा नेते सुजय विखे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर, भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनीही त्यांना पक्षात येऊन उमेदवारी करण्याची ऑफर दिली आहे. या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सूचक मौन बाळगले आहे. तर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील यांनी या जागेवर पक्षाचाच हक्क सांगत कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा संदेश दिला आहे. या जागेसाठी भाजपातर्फे खासदार दिलीप गांधी पुढच्या निवडणुकीसाठी विशेष उत्सुक नाहीत. त्यामुळेत त्यांच्याऐवजी कोणाला उमेदवारी द्यावी, याची चाचपणी पक्षाने सुरू केली आहे. तसेच शिवसेनेने युतीचा काडीमोड घेऊन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांना रिंगणात उतरविण्याची घोषणा केली आहे. तर, कर्डिले यांनी राष्ट्रवादीने उमेदवारी ऑफर केल्याचे सांगून गोंधळात भर टाकली आहे.

अशा राजकीय त्रांगड्यात लोकसभेसाठी नेमका उमेदवार कोण राहणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र, विखे यांनी यानिमित्ताने वेगळीच 'आघाडी' करण्याचे सूचित करून राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याताच प्रयत्न केल्याची नागरिकांत चर्चा आहे.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget