DNA Live24 2015

९ हजार गावांवर सुल्तानी !


मुंबई : प्रतिनिधी
केंद्र सरकारने दुष्काळासह संबंधित गावांना मदत करण्याचे निकष बदलले आहेत. त्याचाच फटका महाराष्ट्रातील सुमारे ९ हजार गावांतील शेतकरी व कष्टकरी बांधवांना बसणार आहे. याबद्दलही ग्रामीण भागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राज्यात नऊ हजार गावातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. मात्र, केंद्र सरकारने दुष्काळाचे निकष बदलल्याने या गावातील शेतकर्‍यांना कोणतीही सरकारी मदत मिळणार नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. केंद्र सरकारच्या नव्या निकषांमुळे शेतकऱ्यांना मदत मिळणे दुरापास्त झालं आहे. केंद्र सरकारच्या सुधारित दुष्काळी मॅन्यूअलनुसार आणेवारीचे निकष कालबाह्य ठरवण्यात आले आहेत.
नव्या निकषांमुळे आणेवारी कमी असलेल्या गावातील शेतकऱ्यांना शासनाची कोणतीही मदत मदत मिळणार नाही. केंद्राच्या दुष्काळी मॅन्यूअलमधील निकषानुसार शेतकर्‍यांना अडचणीत मदत करणे शक्य नसल्याचे राज्य सरकारचेही मत आहे. निकषात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार केंद्राला विनंती करणार आहे. केंद्राला पाठवण्याचा प्रस्ताव हा मदत व पुनर्वसन विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget