DNA Live24 2015

अनुकूल मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्हावे : जिल्हाधिकारी महाजन

अहमदनगर : प्रतिनिधी
स्थानिक हवामान आणि परिस्थिती पाहून शेतकरी शेतात कोणते पीक घ्यावे, हे ठरवतो. अशावेळी देशभरातील विविध कृषी संशोधन केंद्रांतील शास्त्रज्ञांचे त्याला मार्गदर्शन आवश्यक असते. त्यामुळे कृषी विभाग अथवा आत्माने शेतकरी सहली किंवा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करताना अशा स्थानिक परिस्थितीचा विचार करुन अधिकाधिक संख्येने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होईल, यासाठी नियोजन करण्याच्य़ा सूचना जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिल्या.
           अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. प्रत्यक्ष कृषी प्रक्षेत्र भेट, विविध कृषी संशोधन केंद्रांना भेटी, शेतीशाळा, कृषी प्रदर्शनांना भेटी असे उपक्रम राबविले जातात. जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांची निवड यासाठी केली जाते. याशिवाय, कार्यशाळा आयोजित करुन संबंधित संस्थांतील तज्ज्ञांना जिल्ह्यात निमंत्रित केले जाते. मात्र, जिल्ह्यातील पीक परिस्थिती. जमीनीचा पोत, पाणीवापर, उपलब्ध पाणी नैसर्गिक परिस्थिती आदींचा विचार करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, आत्माचे प्रकल्प संचालक श्री.बराटे,  कृषी, सहकार, पशुसंवर्धन, ग्रामविकास यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            जिल्ह्यात आत्माच्यावतीने सन 2017-18 मध्ये उन्हाळी तीळ प्रात्यक्षिक कार्यक्रम, शास्त्रीय पद्धतीने आणि व्यावसायिक पद्धतीने चंदन लागवड चर्चासत्र, पारंपरिक बियाणे कार्यशाळा, जमीन आरोग्य व्यवस्थापन कार्यशाळा, घास पीकावरील स्पोडोप्टेरा अळीचे व्यवस्थापनासंदर्भात कार्यशाळा, यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक कार्यक्रम, देशी आंब्याच्या झाडावर कलम करण्याचे प्रशिक्षण, डाळींब उत्पादक कार्यशाळा, फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षण, शेतकरी गट प्रवर्तकांसाठी परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती योजना) असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
            जिल्ह्यात स्थानिक परिस्थितीला अनुकूल असे प्रयोग होणे गरजेचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. महाजन यांनी, शेतकऱ्यांना या परिस्थितीत अधिक चांगले उत्पादन ते कसे घेऊ शकतात, त्यासाठी काय करावे लागेल, याची माहिती मिळणे अपेक्षित असते. आत्माच्या माध्यमातून ही माहिती त्यांच्यापर्यंत विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून मिळाली पाहिजे. त्यासाठी विविध कृषी संशोधन केंद्रातील संशोधक तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संशोधक-तंत्रज्ञ  यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना थेटपणे मिळाले पाहिजे.  कृषी प्रदर्शनासाठी शेतकरी पाठवितानाही जिल्ह्याच्या दृष्टीने काय आवश्यक आहे, त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत दिली गेली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget