DNA Live24 2015

शेतकरी संघटनेकडून कृषिमंत्र्यांची झाडाझाडाती !


अकोला : प्रतिनिधी
शेतकरी समस्यांवर ठोस कार्यवाहीऐवजी 'अच्छे दिन'ची जुमलेबाजी करीत असल्याचा आरोप करीत अकोला जिल्ह्यातील तेल्हार तालुक्यातील शेतक-यांनी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची झाडाझाडती घेतली.

उडीदाची नाफेडमार्फत खरेदी बंद का केली, शेतकरी शेती पंपावरील वाढीव वीजबिल दुरुस्ती केव्हा करणार  यासह विविध प्रश्नांचा जाब विचारत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांवर सरबत्ती केली. तेल्हारा येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यास कृषिमंत्री आले होते. यावेळी शेतकरी संघटना तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, युवा आघाडी निलेश नेमाडे, अकोट युवा आघाडी विक्रांत बोन्द्रे, दिनेश गिर्हे, सुरेश सोनोने, जाफर खा आमद खा, दादा भाऊ टोहरे, रोशन गायगोल, गणेश इंगळे, गोपाळ गेबड, मोहन पोटदुखे, सुरेंद्र सोनटक्के, मयूर गावंडे, देवेंद्र गावंडे, अरुण फसाळे, विजय रेवतकर, किशोर वानखडे, शरद सोनटक्के, अविनाश बायस्कर, निलेश हिंगणकर, बाळू रेवस्कर यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget