DNA Live24 2015
March 2018

अहमदनगर : प्रतिनिधी
कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणेच्या मार्फत कृषी महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांना किमान महिनाभर तयारी करण्याचा वेळ न देताच एका आठवड्यात असा महत्वाचा कार्यक्रम जाहीर करून कृषी विभागाने याचा पोरखेळ केला आहे. फ़क़्त निधी खर्ची दाखविण्याच्या नादात ही सरकारी निधीची उधळपट्टी केली जात आहे. त्याची दाखल घेऊन संबंधित बेजाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मराठा महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख आणि शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, मागील वर्षी असा कार्यक्रम निधी उपलब्ध नसल्याच्या कारणाने कृषी विभागाने घेतला नव्हता. यंदा राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर असा कार्यक्रम घेण्याची सद्बुद्धी जिल्हा कृषी विभागाला सुचली आहे. प्रचार-प्रसिद्धीच्या नावाखाली पत्रके छापल्याचे भासवून हा विभाग प्रतिवर्षी मोठा निधी उधळपट्टी करीत असतो. आताही असेच बेजाबदार धोरण ठेऊन कृषी महोत्सव कार्यक्रम आयोजित केला जात आहे. शेतकऱ्यांना एक महिनाभर आधीच किमान याबद्दल माहिती देणे गरजेचे होते. मग शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी नियोजन करू शकला असता. मात्र, याचे भान न ठेवता अधिकाऱ्यांनी आपल्या सोयीनेच असा कार्यक्रम जाहीर करून सरकारी पैशांची उधळपट्टी केली आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांच्या सोयीने कार्यक्रम घेण्याऐवजी जर या विभागाने शेतकऱ्यांची सोय लक्षात घेतली असती तर हा लाखोंचा खर्च सत्कारणी लागला असता. मात्र, आता एक सरकारी इव्हेंट असेच या महोत्सवाचे स्वरूप राहिले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांचे लक्ष वेधणार आहोत. मात्र, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी अशा प्रकरणी लक्ष घालून शेतकरी हिताकडे आपण लक्ष देत असल्याचे दाखवून द्यावे. जिल्ह्याचा कृषी विभाग मागील काही वर्षांपासून सुस्तावला आहे. परिणामी शेतकरी हवालदिल होऊन फ़क़्त चकरा मारून समाधान करून घेत आहे. शेतमालाला भाव नसल्याने त्यांना काहीअंशी या महोत्सवाचा आधार होता. मात्र, त्याचाही खर्च कृषी विभागाच्या नियोजनाच्या अभावाने पाण्यात गेला आहे.


नांदेड : प्रतिनिधी
कुत्र्याला दुस-याच्या पळण्याची गती कधीच आवडत नाही त्याला आपल्याच गतीवर अभिमान असतो.मानवाला तसाच अहंकार आसतो त्याला दुस-या माणसाची झालेली किंभहूना होणारी प्रगती आवडतच नाही तो त्याची तंगडी धरून मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतो.आणि संत महात्म्यांना मात्र समाजाची होणारी अधोगती मुळीच आवडत नाही.संत महात्मे सतत आपल्या प्रवचन व हरि किर्तनाच्या माध्यमातून अधोगती कडे वाटचाल करणा-या समाजाला सत्संगाकडे वळवून त्यांच्या मनातील वाईट विचार नाहीसे करण्याकरीता हितोपदेश करीत असतात.असे समाजपयोगी उद्गार ह भ प भागवताचार्य दिपक महाराज जोशी पांगरेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील सायाळ येथील हरिनाम सप्ताहाच्या सांगता व रामनवमी निमित्त रामजन्मोत्सव कार्यक्रमच्या वेळी दि २५ मार्च २०१८ रविवार रोजी सकाळी ११ वाजता केले.किर्तनातून पुढे ते म्हणाले की,संसारा मध्ये व्यवस्था आणि परामार्था मध्ये अवस्था असायला पाहिजे परंतू हल्ली काळात या उलट परमार्थात व्यवस्था आणि संसारात अवस्था निर्माण होत आहे.महाराजाला बसायला गाडी पाहिजे गाडीतून खाली उतरले की,माणसं जवळ नाही आले की महाराज गाडी बसून पून्हा वापस.. आलेच तर किर्तन झाल्यावर बसायला खुर्चिच पाहीजे खाली बसतच नाहीत.बसल्यावर धोतर मळते.असी परामार्थात अवस्थे ऐवजी व्यवस्था निर्माण झाली आहे.ब्रम्हांडाचा नायक श्रीकृष्ण यांच्या काला खाऊ दही भात... श्रीकृष्णं यांच्या  काल्याच्या किर्तनासाठी श्री संत जगदगूरू तुकाराम महाराज यांचा ।।हळ हळू चाला कोन्ही कोणाशी न बोला।। अरे आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तोवरी।। तूका म्हणे सांडा घाटी।।तेने नका भरू पोटे।। आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तोवरी।। हा अभंग घेण्यात आला असता भागवताचार्य हरि भक्त पारायण दिपक जोशी महाराज यांच्या अभ्यासपूर्ण अन् मधूर वाणीतील किर्तनात सायाळ व परिसरातून आलेली भावीक भक्त मंडळी अगदी तल्लीन झाली होती.तूका म्हणे सांडा घाटी..म्हणजे दुस-याच्या बद्दलचे मनातील वाईट विचार टाकून द्यावेत.लोकाबद्दल वाईट विचार केल्याने पोट भरत नसते.अरे मी तुम्हाला आज देतो सत्संगाची पोटभर भाकरी त्याच्याने तुमचे पोट भरेल आणि तूम्ही मागाल तोवर ही पुढे पोटभर देतो... जिवन जगत असताना हळू हळू चालावे कोण्ही कोणाचे वाईट सोचू नये कोणाशीच वाईट बोलू नये डोळ्याने वाईट पाहू नये,कानाने वाईट ऐकू नये वाणीने वाईट बोलू नये.तरच माणसाच्या जिवनाचा अर्थ आहे.ब्रम्हांडाचा नायक श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेत झाला.ख-या अर्थाने वैकूंठातला देव डायरेक गोकूळात आला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.वसूदेव देवकी यांचा आठवा पुत्र कंस मामाला ठार मारेल असी त्याकाळी आकाशवाणी झाली होती म्हणे त्यामुळेच कंस मामा आपली सख्खी बहीण देवकी आणि मेहूणा वसूदेव ह्यांना साखळदंडाने बांधून बंदीवासात ठेवले होते.वसूदेव देवकीच्या पोटी जन्मा येताच प्रत्येक बाळ कंस मामा गर्र...गर्र..फिरवून जमीनीवर आपटून ठार मारीत असे.याताच आता वसूदेव देवकीच्या पोटी ब्रम्हांडाचे नायक श्रीकृष्ण देव यांनी आठवा पुत्र म्हणून जन्म घेतला होता त्याकाळी रात्री मंद मंद असा पाऊस पडत होता यमूना नदीला काठोकाठ मोठा पूरही आला होता..रात्रीचा किर्र..अंधारही देखील तसाच काळाकूट्ट..असातच वसूदेवाने चिमूकल्या श्रीकृष्णास मायेच्या बदल्यात नंदाघरी देण्यासाठी टोपलीत ठेवून वरी शेषाचे सरंक्षण असता  पूराने भरलेल्या यमूनेतून गोकूळात यशोदा माता अन् गोकूळाचा राजा नंदराजा यांच्या पोटी त्याच वेळी जन्मलेली माया रत्न कन्या हीस आणण्याकरीत रातोरात कंसाला थांगपत्ताही न लागू देता आदलाबदली केली.गोकूळात जाताच तेथे नंदराजाच्या वाड्याचे दारे बंद असताना वसूदेवाने वाड्याला वेढा घालतां गाई गोठ्याच्या उघड्यादारातून प्रवेश करून आपला कृष्ण यशोदा माता नि नंदराजाला दिला आणि त्याच्या बदल्यात त्यांची माया माता हि कन्या मथुरेत बंदीवासात आणली. आजूनही माया म्हणजे कन्या ही माता म्हणून आपण स्त्रियांना मानाचे पुजनीय स्थान देतो आहोत ते यावरूनच.आज देखील भूतलावर तिन माता आहेत एक भारतमाता दोन जन्मदाती माता आणि तिन गोमाता (गाय).या तिनही मातेचे आपण दररोज वंदन करावे तेवढे कमीच आहे.परंतू अलीकडच्या काळापासून आपल्या मायबापाची सेवा करीत नाहीत.हे दुःखनीय आहे.असो..ईतक्यात देवकीला आठवे मुल जन्मल्याचे कळताच नेहमी प्रमाणे त्या मुलाला पकडून आणण्याचे कंसाने फर्मान करताच आतून देवकीने दादा हा मुलगा नाही मायारत्न कन्या आहे मारू नका माझ्या मुलीला असे म्हणताच संतापलेल्या कंसाने काहीही न ऐकता त्या मायारत्न कन्येच्या दोन्ही तंगड्यांना हातात धरुन गर्र..गर्र..फिरवून जमीनीवर आपटावेकीच ती माया कडकडकडं आवाज करीत हातातून निसटून आकाशात विज होवून कडाडली मला काय मारतोस ..तुझा वैरी गोकूळात नंदा घरी सुखात वाढतोय..असी आकाशवाणी होताच कंसमामा दचकलाच..पुढे श्रीकृष्णाने खुप लीला केल्या.सर्व गोपालक संवगड्यांना सोबत घेवून श्रीकृष्णाने सगळ्यांच्या भाकरी एकत्रीत कुस्करून काला करून खाल्ल्या.म्हणूनच म्हणतातना काला खाऊ दही भात ते उगीच नाही.संतांचे या समाजावर अनंत उपकार आहेत.अधोगतीकडे जाणा-या समाजाला प्रगतीकडे नेण्याचे कार्य संत करीत असतात.त्याबरोबर अन्य एका आबा नावाच्या  व्यक्तीने डांस बार बंद करून समाजाप्रती मरावे परी किर्तीरूपी उरावे या प्रमाणे परोपकारी कार्य केलं आहे.असे संबोधून पुढे श्रीराम जन्माची कथा सांगून अक्षरशा भक्त गण श्रोते मंत्रमुग्धीत केले.
जय जय रामकृष्ण हरी 🚩🚩🚩🚩

आदरणीय खासदार राजु शेट्टी यांचा नविन तंत्रज्ञानाला विरोध आहे.अशी हाकाई काही जैववैज्ञानिक पीटत होते.की त्याने लोकसभेत.महीको.मोन्सॅन्टो या कंपिनीवर बंदी घालण्याची मागणी केली.परंतु त्याच्या साठी हे वृत्त सविस्तर वाचा.
मागीलवर्षी महाराष्ट्र सरकारने आज केंद्र सरकारला   महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, कर्नाटक आणी   मध्य प्रदेश आदी राज्यांत तननाशक निरोधक बी टी बियाणाची ३५ लाख पाकिटे अवैधरीत्या विकल्या गेल्याचे प्रकरणात सीबीआयमार्फत चौकशी करण्याची विनंती प्रलंबित असतांना   पुन्हा एकदा  तणनाशक निरोधक कापसाच्या बियाण्याचा समांतर अवैद्य विक्रीचा मुद्दा सध्या ऐरणीवर  येत आहे कारण सध्या येत्या खरीप हंगामासाठी गुजराथ व   तेलंगण, आंध्र प्रदेश मधुन मोन्सँटो कंपनीचे तननाशक निरोधक(राऊंडउपबीटी ) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले बियाणांची  बुकिंग व विक्री होत असल्याचे  स्वाभिमानी शेतकरीसंघटनेच्या लक्षात आले आहे.व त्याची तक्रार  कृषी विभागाकडे  करनार असुन एक तर रीतसर परवानगी द्या .कींवा नवीन संसोधन करा हा सर्व प्रकार सामन्तर सरकार स्थापनेचा असुन असला गोरखधंदा रोखण्याची जबाबदारी कृषीमंत्री कृषिविभाग ,भारत सरकारच्या कृषी संशोधन परिषद व कापूस संशोधन संस्थेची तसेच  कृषी विद्यापीठाची असतांना असे बोगस एच टी बी बियाण्यांना परवानगी देण्यासाठी कायदे, नियम असतांना तसेच  केंद्रीय कापूस अनुसंधान परिषद, कृषी परिषदे सह विविध संस्थांचे अशा बियाण्यांवर नियंत्रण असतांना .हे बियाणे बाजारात   मान्यतेविना असे बियाणे देशात येतात कसे असा मूळ प्रश्न उपस्थित होतो.  अख्ख्या देशात हा गोरखधंदा कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांच्या हात मिळवणीमुळेच होत असल्याचे तक्रार करनार असल्यामुळे सरकारने  मोन्सँटो कंपनीचे तननाशक निरोधक(राऊंडउपबीटी ) बी जी ३  तंत्रज्ञानाचा नावावर होत असलेली विक्रीला एक तर रीतसर परवानगी द्यावी .

मागील वर्षी  मोन्सँटो कंपनीचे तननाशक निरोधक(राऊंडउपबीटी ) बी जी ३(डुप्लीकेट ज्यावर सुद्धा शेंद्र्या आळीचा प्रादुर्भाव होता)  तंत्रज्ञानाचा अवैद्य  वापर करून सुमारे 35 ते 40 लाख  पाकीटे ज्याची किंमत सुमारे 500 कोटी रुपये आहे व या बियाणांचा वापर करून सुमारे साडे आठ लाख हेक्टर च्या वर  क्षेत्रात पेरणी झाल्याचे  सत्य समोर आल्यावर तननाशक निरोधक बी टी  बियाणे आलेच कसे, असा सवाल उपस्थित होतो. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची अशी मागणी राज्यसरकारने भारत सरकारला केली होती याच दरम्यान महाराष्ट्रातील सुमारे १२ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी मोन्सँटो कंपनीचे गुलाबी बोंडअळी निरोधक  बी जी २  तंत्रज्ञान पूर्णपणे निकामी झाल्याने नुकसान भरपाईचा दावा केला असुन मोन्सँटो कंपनीच्या कापसाच्या बियाणांचा नंगा नाच सुरु असुन अशा प्रकारे विना परवानगीने यापूर्वी  मोन्सँटो कंपनीचे  बी जी १ व २  तंत्रज्ञानाची विक्री झाल्याची  आम्हाला कळलं होतं.

गेल्या २-३ वर्षांपासून तणनाशक निरोधक राऊंड उप बी टी  बियाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे कारण याला शेतकऱ्यांची गावस्तरावर मागणी आहे. व शेतकरी वर्गात याची जनजागृती नाही. तसेच तणनाश करण्यासाठी लागणारी भरमसाट मजुरी कारणीभुत आहे. मात्र  त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे आरोग्य आणि जमिनीवर होत आहे. पेरणी झालेल्या परिसरात कॅन्सर, किडनीचे आजार होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद आहे. यापूर्वी पांढऱ्या थैलीत आणून त्याची सर्रास विक्री होत होती आणि गावोगावी पेरणी केली जात होती मात्र आता ब्रँड नावासह खुले आम होत असलेली विक्री चिंतेचा विषय आहे  कारण सरकारच्या विविध संस्थांचे बियाणे, खत व कीटकनाशक उत्पादक कंपन्यां व   कृषी विभागाला याची माहिती होत नाही, हे आश्चर्य आहे. मागीलवर्षी कापूस संशोधन संस्थेने परीक्षण केलेल्या नऊ पैकी सहा बियाणे एचटी म्हणजे तणनाशक निरोधक असल्याचे निष्पन्न होते मात्र त्यानंतरही केंद्रीय कापुस संशोधन संस्थेने राज्य सरकारला कळवण्याचे साधे सौजन्य दाखविले नव्हते  ही गंभीर बाब आहे. कापूस संशोधन संस्थे सह केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विभागाचा मोन्सँटो कंपनीचे तननाशक निरोधक(राऊंडउपबीटी ) बी जी ३  तंत्रज्ञानाचा अवैद्य वापर करून  तयार केलेल्या कापसाच्या बियाणांचा होत असलेल्या राजरोस विक्रीमध्ये संपुर्ण  सहभाग  लक्षात घेता सरकारने यावर कडक उपाययोजना  वा आन्यथा सरसगट  सदरील वानाला परवानगी देणे गरजेचे आहे.
तसेच गेल्या आनेक वर्षपासून राजरोस पणे राॅयल्टीच्या नावाने घेण्यात आलेले.हाजोर
कोटी रूपयाची लुट वापसी करण्यात यावी.
व सदरील तंत्रज्ञानाची व्याप्ती संपल्या मुळे. पाकिस्तान सरकारने घेतलेल्या निर्नयाप्रमाणे भारतीय शेतकरयाला सुद्धा 100 ते 50 रूपयाला मीळायला हवे.
कारण तिनं वर्ष जरी पिक आले .आणि एका वर्षी जरी पिक आले तरी मागच्या तिन वर्षांपासून आलेले पिक मातीत जाते.
हा आतापर्यंत चा ईतिहास आहे.नविन तंत्रज्ञानाच्या नावाने शेतकर्याची लुट करनार्या कंपिनीला हादप्पार करणे गरजेचे आहे.
तसेच औषधी कंपनीचे चांग भले करन्याचा हा एक भाग आहे.व जगाच्या पाठीवर बर्याच देशाने सदरील तंत्रज्ञानाला विरोध केला आहे.

               आपला
   माणिक कदम ( आध्याक्ष मराठवाडा स्वाभिमानी शेतकरी संघटना ) सुचना -------- नविन तंत्रज्ञानाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध नाही.
ब्रेकिंग न्यूज..!
🔥 स्वाभिमानी शेतकरी संघटना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे टमाटे फेकले..!
🔥ना. रविकांत तुपकर, गजानन पा. बंगाळे, राणा चंदन, भगवान मोरे, कैलास फाटे, सतिष मोरे, नितीन राजपूत, मधुकर शिंगणे, गणेश शिंगणे यांच्यासह १५० शेतकऱ्यांना अटक..!
🔥सरकारचा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न..!
🔥शेतकरी विरोधी सरकारचा आणि भाजीपाल्याच्या पडलेल्या भावाचा निषेध नोंदविण्यासाठी..!
🔥टमाटे, गोबी व इतर भाजीपाला उत्पादक शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी..!
🔥उत्पादन खर्चाइतका नुसकानीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी ..!
🔥भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांना पिकविम्याचे संरक्षण मिळाविण्यासाठी..!
🔥भिक नकोच, आमच्या हक्काच्या दामासाठी..!

अहमदनगर : प्रतिनिधी
कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रचार-प्रसारासह शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने कृषी विभाग व आत्मा यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने  कृषी महोत्सव आयोजित केला आहे. दि. ३० मार्च ते ३ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत होत असलेल्या या महोत्सवाचा लाभ शेतकरी बांधवांनी घेण्याचे आवाहन आत्मा यंत्रणेचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले आहे.

भूतकरवाडी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरातील आत्मा कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, २१५ स्टॉल असलेल्या या महोत्सवाचे आयोजन सावेडी भागातील पारिजात चौक येथील तांबटकर मळा येथे केले आहे. शेतकरी गट आणि कंपन्या यांचासह विविध कंपन्या या महोत्सवात सहभागी होत आहेत. 


परभणी : प्रतिनिधी
कृषी तंत्रविस्ताराच्या हेतूने आयोजित केल्या जाणा-या जिल्हास्तरीय महोत्सवाच्या निविदा प्रक्रियेत घोळ झालेले आहेत. संपूर्ण राज्यातील महोत्सव घेण्याचा ठेका एकाच कंपनीला देऊन कृषी विभाग व आत्मा यंत्रणांनी ठेकेदारालाच 'अच्छे दिन'चा प्रत्यय दिल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

सोलापूरसह परभणी येथुनही असे आरोप करणारे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया पार पाडतानाच त्यावर एकाचीच छाप कशी राहील, याबद्दलची विशेष काळजी कृषी विभागाने घेतली आहे. शेतकरी संपात फूट पाडणा-यांना बक्षिस म्हणून हे महोत्सव एकाच कंपनीच्या घशात घालण्याचा सपाटा कृषी विभागाने लावला आहे. सत्ताधारी पक्षातील धुरिण व मंत्री यांच्याच कृपाशिर्वादाने एका कंपनीला 'शुअर' ठेका देऊन मोठा 'शॉट' हाणला जात असल्याचा आरोप संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकासमवेत कदम यांनी निविदा प्रक्रियेची सविस्तर माहितीही दिली आहे. तसेच सोलापूर येथील दैनिक पुढारीने प्रसिद्ध केलेली बातमीही समवेत जोडलेली आहे. ती वाचकांनी पाहून घ्यावी. दरम्यान, कोणाच्या कंपनीने हा शॉट हाणून चांगभलं केलं आहे, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अहमदनगर : प्रतिनिधी
जिल्हा व पाथर्डी-शेवगाव तालुका भाजपाच्या इच्छेला बाजुला सारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (दि. २५) पाथर्डीत येत आहेत. त्यांचा दौरा प्रसिद्ध झाल्याने सर्व अटकळी बाजूला सारून मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमात आणण्याचे यश मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रताप काका ढाकणे यांनी बाजी मारल्याचीच चर्चा सुरू आहे.

माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या अभिष्ठचिंतन कार्यक्रमातून जोरदार रिलाँचिंग करण्याचा बेत प्रताप काकांनी आखला आहे. फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ लोकनेते शरद पवार, मंत्री पंकजाताई मुंडे व इतर दिग्गजांना त्यांनी एकाच व्यासपीठावर आणले आहे. आमदार मोनिकाताई राजळे व स्थानिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमास न येण्यासाठी मोठे कष्ट घेतले. परंतु, काकांनी यात बाजी मारल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. हेच नाराज कार्यकर्ते रविवारी कोणते पाऊल टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अहमदनगर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री व नेते पाथर्डीमधील कार्यक्रमात आल्यास आत्महत्या करण्याचा इशारा येळी येथील सरपंच संजय बडे यांनी दिला आहे.

रविवारी (दि. २५ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी पाथर्डीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यास मुख्यमंत्री व भाजपाचे नेते येत आहेत. त्यानिमित्ताने येथील स्थानिक वाद चर्चेत आला आहे.

वंजारी व ओबीसी समाजाच्या राजकीय इतिहासाचा दाखला देऊन बडे यांनी भाजपा कार्यकर्त्यांवरील अन्यायाकडेही निवेदनात लक्ष वेधले आहे. सविस्तर निवेदन वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करून वाचा...

अहमदनगर : प्रतिनिधी
माजी मंत्री व ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. २५) ज्येष्ठ नेते शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मात्र, स्थानिक राजकीय गणित लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाव्दारे होणारी 'पवारभेट' टाळण्याचाच विचार केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री यांच्या पाथर्डी दौ-याबाबत सायंकाळी उशीरापर्यंत कन्फर्मेशन झालेले नसल्याने नगर जिल्ह्यासह राज्यभरात यावर चर्चा रंगली आहे. ढाकणे यांचे चिरंजीव सध्या राष्ट्रवादीत आहेत. तर, पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. मुख्यमंत्र्यांचे माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिकाताई राजळे या सध्या येथील आमदार आहेत. येथील स्थानिक कार्यकर्ते व जिल्हा कार्यकारिणीच्या दृष्टीने हा कार्यक्रम राष्ट्रवादीच्या नेत्यांचा म्हणजेच अडचणीचा आहे. त्यातच ढाकणे यांचे चिरंजीव नगर लोकसभा मतदार संघातून खासदारकीसाठी इच्छुक आहेत. मुख्यमंत्री व पवार साहेबांच्या एकत्रित कार्यक्रमातून जोरदार लाँचिंगचाच त्यांचा छुपा हेतू दडून राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर सायंकाळी उशीरापर्यंत मुख्यमंत्री दौरा न आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मात्र, रात्री उशीरात उशीरा हा दौरा नक्की पक्का होईल अशीच आशा ढाकणे समर्थक व्यक्त करीत आहेत.


परभणी : प्रतिनिधी
 जिल्ह्यातील स्वच्छ व सुंदर गांव,आदर्श गांव झरी येथील शेतशिवारात जलयुक्त शिवार योजनेतून नाम नदीचे सुमारे ९ किमी तर अन्य एका नदीचे ७ किमी लांब रूंदीकरण खोलीकरणाचे काम हे लोकसहभाग आणि जलयुक्त शिवार योजना तसेच नाम फाउंडेशन मार्फत करण्यात येवून त्या नदीवर आवश्यक त्या ठिकाणी बंधारे कृषीभूषण आणि किमयागार व्यक्तीमत्व असलेले लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते कांतराव काका देशमुख यांच्या पुढाकारातून आणि अपार कष्ट घेवून बांधण्यात आले आसल्याने झरीगाव पाणीदार गांव म्हणून अख्ख्या मराठवाडा विभागात नावारुपाला आले आहे.याचीच दूरदर्शन च्या सह्याद्री वाहीने आणि आकाशवाणी परभणी केंद्राने दख्खल घेतलीय.आज दि २२ मार्च २०१८ रोजी दुपारी ३ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर  "जलजागृती सप्ताह २०१८" या विषयावर जलसंधारणात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे कृषीभुषण कांतराव काका देशमुख झरीकर यांची मुलाखत थेट प्रक्षेपीत करण्यात येणार आहे तसेच आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरही आजच २२ मार्च रोजी दुपारी २ वाजता झालेल्या जलसंधारण कामाची यशकथा प्रसारीत करण्यात येणार आहे. याचे पुर्नप्रक्षेपण रात्री ११ वाजता होईल.
यामध्ये कृषीभूषण कांतराव काका झरीकर,आनंद पोहनेरकर,प्रयोगशिल प्रगतिशील महिला शेतकरी मेघाताई सावंत,रंजनाताई गायकवाड,मोहसीन काजी,भास्कर सोनवणे यांचा सहभाग असणार आहे.सदरील कार्यक्रम पाहून ऐकूण ईतरही गावातील नागरीकांनी झरीगावच्या कायापालट जलसंधारण विकासात्मक कार्याची प्रेरणा घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.


अहमदनगर : प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक व भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांच्या तक्रारीची दखल घेऊन नगर तालुका भूमी अभिलेख कार्यालयाची चौकशी सुरू झाली आहे. या कार्यालयाच्या भ्रष्ट व अनागोंदी कारभाराबाबत भद्रे यांनी जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार चौकशी सुरू झाली आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून ही चौकशी सुरू झाली आहे.

पूर्णा : प्रतिनिधी
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील पांगरा-तरंगल शिवारातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच मा. तहसीलदार श्याम मदनुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंडळअधिकारी राजुरकर, तलाठी दिपाली मुटकुळे, माजी सरपंच उत्तमराव ढोणे, उपसरपंच नामदेवराव ढोणे, शेतकरी तुकाराम ढोणे, धोंडीराम ढोणे, निवृत्ती ढोणे, सुदाम ढोणे, संभाजी ढोणे, आतमराव ढोणे, भानुदास ढोणे, बापूराव ढोणे, गणेशराव ढोणे, संभाजी ढोणे, न्यानदेव ढोणे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या कामाचे भुमीपुजन होताच लगेचच पोकलेन यंत्राव्दारे १ किमी लांबी तर २४ फूट रूंद शिवशेत रस्त्याचे खोदकाम करून सध्या कच्चे मातीकाम करण्यात आले असून जवळपास खोदाईचे काम पूर्ण झालेही आहे. शिवरस्त्यावरून शेतातील शेतीमालासह ऊस वाहतूक करणे कठीण जात असल्याने शिवरस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सबंधीत शेतक-यांच्या सहकार्याने पूढील सर्वांच्या शेतमाल वाहतूकीच्या सोयीसाठी ह्या शिवशेत रस्त्याचे काम करण्यात आले आहे.

नगर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपा स्टाईलने केलेली एक जुमलेबाजी व्टिटरवर जोरात ट्रेंडिंगमध्ये आहे. यावर प्रश्न विचारून नेटकरी जनतेने मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे.

किसान लाँग मार्च्या पार्श्वभूमीवर काल सकाळी दहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या व्टिटरवर डॉ. स्वामीनाथन् अहवालाबद्दल पोस्ट करण्यात आली. नेहमीप्रमाणेच त्यांनी यावेळीही उत्तरं न देता काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदींनी दिडपट हमीभाव दिल्याचेही सांगून टाकले. यावर जनतेनेही त्याचा समाचार घेऊन प्रश्नांचा भडिमार करीत लोकशाहीचे पाईक असल्याचे दाखवून दिले.

अधिक माहितीसाठी ही लिंक पहा...
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/973240299853045760?s=19


--------------------------------
परभणी/आनंद ढोणे पाटील :- जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील गोदावरी नदीच्या तिरावर वसलेल्या देऊळगाव,गोळेगाव,देवठाणा गाव शिवारात गेल्या आठ दिवसापासून आचानक एक बिबट्या वाघ आवतरला आहे.या बिबट्यास गोदाकाठच्या शिवारात हिरवीगार ऊस व अन्य बागायती पिके अन् दाट झाडे झुडपे असल्यामुळे मुक्तपणे संचार करण्यास वाव मिळतो आहे.हा बिबट्या नुसता मुक्त संचारच करत नाहीतर आपल्या अंगी असलेले नैसर्गिक गुण दाखवतो आहेच.शेतशिवारात आणि आखाडा गोठ्यावर बांधून ठेवलेल्या पशू प्राण्याची शिकार करण्यासाठी धुमाकूळ घालत आहे.यामुळे शेतकरी नागरीक,महिला,छोटी मुलं अतिशय भयभीत झाली आहे.
बिबट्याने पाडला शेळी,वासरांचा फडशा
-----------------------------
हा बिबटा गत सात आठ दिवसा पासून या गावशिवारात वावरून शेतात दिसेल गाय वासरू,शेळ्या बक-या या पशूवर झडप मारून त्याचा फडशा पाडून मासाहार करतो आहे.काहींना चावा घेवून शिकारीच्या हेतूने पकडताना कशाची चाहूल लागताच जखमी करून छलांग मारून अन्यत्र ठिकाणी लपून बसत आहे.माणसांचा थारा वारा नसताना पून्हा आपला वावर चालू ठेवूण शिकारीचे सावज टिपतोय.आता पर्यंत या बिबट्याने हाहाकार घालीत देऊळगाव,देवठाणा,गोळेगाव शिवार पालथी घातलीत.काही शेळ्या बक-यांचा आणि गाय वासरांचा फडशा पाडून ठार मारले आहे तर काही वासरांच्या गळाफोडून पंजाची तिक्षणं नखे मारून जखमीही केले आहे.यामुळे शेतक-यात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण होवून शेतात कोण्हीच जायला तयार नसल्याने शेतं निर्माणूष्य झाली आहेत.

वनाधिका-यांनी शर्तिचे प्रयत्न करूनही पकडण्यास अद्याप अपयश
-----------------------
दरम्यान या बिबट्याला पकडण्यासाठी सबंधीत वनविभाग खात्याने दख्खल घेत शेतात लोखंडी पिंजरा सापळा लावूनही त्यात तो जातच नसल्याने वनाधिकारी शर्तीचे प्रयत्न करून हतबल होत आहेत.वनविभाग्याच्या हिंस्त्रप्राणी पकडण्याच्या क्लूप्त्या वापरूनही हा बिबट्या पकडण्यात अपयशच येत आहे.शेवटी चिखलद-याचे पथक बोलावून बिबट्या जेरबंद करणार असल्याची माहीती हाती आली आहे.चिखलदरा पथक व्याघ्र प्रकल्पावर काम करत असल्याचे सांगण्यात येत असून ह्या पथकासोबत ड्रोन कँमेरा,शार्पशूटर,गाडी व वाघाला पकडण्यासबंधीचे ईतर साहित्य असणार आहेत.ड्रोनच्या साह्याने बिबट्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाची पाहणी व शोध करण्यात येईल व बिबट्या दिसताक्षणीच शार्पशूटर त्यावर बंदूकितून गोळ्या झाडून बेशूध्द करतील किंवा जाळीत पकडतील.असे वनविभागाच्या सुत्राद्वारे कळवले आहे.आता पुढे काय काय होते या कडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
शरद पवार म्हणजेच राजकीय गुंता आणखी किचकट करून संभ्रम वाढविणारे नेते. आतापर्यंत भल्याभल्यांना या संभ्रमाचा फटका सहन करावा लागला आहे. तसेच समाजकारणाला झटका देण्याचेही कार्य करून पवारांनी या गुंतागुंतीला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. आताही तसेच घडले आहे. मागच्याच आठवड्यात व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या मुलाखतीव्दारे आर्थिक निकषावर आरक्षणाचा विचार पवारांनी देशाला दिला होता. त्यामुळे उठलेला सोशिओ-पॉलिटकिल धुराळा खाली बसण्यापूर्वीच आता शेतकरी आरक्षणाची नवीन गुगली पवारांनी टाकली आहे. एकुणच यामुळे पवार साहेबांच्या मनात आरक्षण या विषयाबद्दल नेमकं काय आहे, याबद्दलचा संभ्रम वाढला आहे. अशावेळी या शेतकरी आरक्षणाच्या मुद्यामुळे होणारे राजकीय, सामाजिक व आर्थिक फायदे-तोटे समजून घेणंही गरजेचं आहे.

जे मनात आहे ते बोलून न दाखविता, जे करणार नाही त्यावर जाहीर बोलणारे किंवा कोणाच्याही मनात येणार नाही असे अचाट कार्य करणारे नेते म्हणूनच मोठ्या पवार साहेबांची ख्याती आहे. याच राजकीय कार्यपद्धतीतून आतापर्यंतच्या पन्नास-पंचावन्न वर्षांच्या राजकारणात त्यांनी अनेकांना कात्रजचा घाट दाखविला आहे. त्यांच्या याच घाटात दिवस मावळविण्याच्या डावामुळे खंजीरालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, आता जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात दिल्लीवर डोळा ठेऊन ते राजकारण व समाजकारणात मोजून-मापून पावले टाकतील असा अनेकांचा होरा आहे. मात्र, कोणाच्याही होर्यात न अडकणारे तेल लावलेले पैलवान म्हणजेच शरद पवार. याचाच प्रत्यय त्यांनी पुण्यातल्या मुलाखतीनंतर मुंबईतल्या पत्रकार परिषदेतही दिला. पुण्यात आर्थिक निकषावर आरक्षणाची बाजू मांडून जातीय आरक्षणाच्या फेररचनेची गरज त्यांनी बोलून दाखविली. मात्र, त्यावर सविस्तर न बोलल्याने पवार दलित व ओबीसीविरोधी असल्याची टिका सुरू झाली होती. मुळात बोलल्यानंतर विचार करण्याऐवजी विचार करूनच बोलणार्या मोजक्या सन्माननीय राजकारण्यांपैकी एक नाव म्हणजे मोठे पवार. पुण्यात बोलतानाही त्यांचा काहीतरी आडाखा असणार, हे नक्की. तोच आडाखा शोधणार्यांना मुंबईतल्या पत्रकार परिषदेतून नवा मुद्दा त्यांनी दिला. तो म्हणजे, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असणार्या शेतकरी वर्गाला आरक्षण द्यावे, ही मागणी. मागच्याच आठवड्यात पुण्यात एक बोलले अन् आता मुंबईत एक बोलून पवारांनी आरक्षण या विषयाचा राजकीय व सामाजिक गुंता वाढविल्याची प्रतिक्रिया यावर अनेकांनी दिली. काही शेतकरी नेत्यांनी या आरक्षणाची गरज बोलून दाखवितानाच काहींनी हे कसे शक्य नाही, हाही पवारांचा नवा चुनावी जुमला आहे, असाच सूर लावला आहे. एकुणच पवारांनी आरक्षणाच्या विषयावर नवीन गुगली टाकून पुन्हा एकदा सगळ्यांना विचार करायला भाग पाडले आहे.

जातीयवाद व धर्मप्रेमी विचारांनी सध्या एकुणच देशाच्या राजकारणात उचल खाल्ली आहे. यामुळे समाजकारणात व राजकारणातही एकारलेपण आले आहे. तसेच आरक्षणातूनच सर्व प्रश्न सुटणार असल्याच्या थाटात जातीय व धार्मिक आरक्षणासाठीचे लढे जोमात आहेत. अशा या टप्प्यावर आरक्षणातून गरिबी निर्मुलन शक्य नसल्याचे देशाला ओरडून सांगणे गरजेचे आहे. तसेच सामाजिकदृष्ट्या आरक्षणाची गरजही जनतेला समजाविणे आवश्यक आहे. मात्र, ते राहिले बाजूला. अन् आता जातीयवादी व धर्मवादी संघटनांसह राजकीय पक्षांनीही बेरजेच्या राजकारणापोटी याबद्दलची हवा तापविली आहे. त्यातच पवारांसारख्या जुन्या-जाणत्या नेत्यानेही वेगवेगळी विधाने केल्याने, आरक्षणाच्या लढ्याला एक वेगळीचपॉवरमिळत आहे. आतापर्यंत आरक्षण मिळालेल्या कोणत्या समाजातील किती टक्के घटकांची आर्थिक व सामाजिक उन्नती झाली, ज्यांची उन्नती झाली त्यांच्याबद्दल व ज्यांची उन्नती न होण्यासाठी आरक्षणातील कंपुशाही जबाबदार ठरली, या सर्व बाबींचा आता यानिमित्ताने बिगर राजकीय दृष्टिकोनातून अभ्यास व विचार होणे गरजेचे आहे. कारण आरक्षणाचा लाभ घेतल्याने आर्थिक उन्नत झालेले दलित व अजुनही लाभ न घेतलेल्या व प्रतिक्षेतील दलितांमध्येही आता सामाजिक दरी वाढल्याचे बहुसंख्य दाखले सापडतात. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण मागणार्या मराठा-कुणबी समाजातही आर्थिक व 9692 चा सामाजिक भेदभाव आहे. एकुणच आरक्षणातून होणारी आर्थिक व सामाजिक उन्नती वादग्रस्त असतानाच शेतकर्यांचे मूळ प्रश्न बाजूला ठेऊन त्यांनाही आरक्षणाच्या राजकारणात ओढण्याची पवारांना का गरज वाटली असेल, असाही प्रश्न पडतो.

सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या गरिब शेतकरी कुटुंब पिछाडीवर असल्याचे जगजाहीर आहे. त्याच वास्तवामुळे मराठा समाजातील शेतकरी कुटुंबियांची आरक्षणाची मागणी आहे. त्यांचीच भावना लक्षात घेऊन दोन एकरांपेक्षा कमी जमिन असणार्यांना आरक्षण देण्याची मागणी पवारांनी मुंबईच्या पत्रकार परिषदेत केली आहे. मुळात मागील दीड वर्षांपासून अशी मागणी जोर धरीत आहे. मराठा व सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी घटकांना विकासाच्या मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठीची ही मागणी आहे. कारण, आपल्याकडे जातीयवादी मानसिकतेमुळे सामाजिकदृष्ट्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी अजुनही मोठ्या घटकास मिळालेली नाही. तसेच एकाच प्रवर्गातील एकाच जातीने कंपुशाहीच्या मार्गाने अशी संधी न मिळून देण्यासाठीही शक्ती खर्ची केली आहे. अशावेळी जातीअंत झाला आहे व संबंधित मागास जातींना आरक्षणाची गरज उरलेली नाही, असे म्हणणे म्हणजेच वास्तवाकडे डोळेझाक करणे आहे. मात्र, पवारांनी आता यावर जाहीर भाष्य करून भूमिका मांडण्याचा तडाखा लावल्याने, आता आरक्षणाच्या जातीयवादी लढाईचे पुढचे भविष्य काय, असाच प्रश्न पडत आहे.

दीड वर्षांपूर्वी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात शेतकरी आरक्षणाच्या मागणीसाठीची पहिली पत्रकार परिषद झाली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या याच सेवावृत्तीला प्रेरणादायी ठरणार्या गावातील संस्थेमध्ये शेतकरी आरक्षणाची मागणी करून एकुणच शेतकरी आंदोलन व आरक्षणाच्या राजकारणाची फेरमांडणी करण्यासाठीचा नारा त्यावेळी देण्यात आला होता. ‘एकच मिशन, शेतकरी आरक्षण,’ असा नारा देत शेतकरी आत्महत्यांनी बदनाम झालेल्या विदर्भातील सर्वपक्षीय शेतकरी नेत्यांनी ही मागणी मांडली होती. तसेच रास्त हमीभावाबद्दलही लढण्याचे या नेत्यांनी जाहीर केले होते. मात्र, एकाच पत्रकार परिषदेनंतर ही मागणी विरली. कारण विविध शेतकरी संघटना व त्यांच्या नेत्यांनी आरक्षणाऐवजी रास्तभाव, शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे व डॉ. स्वामीनाथन् समितीच्या शिफारशी लागू करण्याची गरज यांचीच मागणी लावून धरली. अखेर शेतकरी आरक्षणाचा मुद्दा एकदाचा संपला, असेच वाटत होते. मात्र, एखादा विषय संपू देतील ते राजकारणी कसले. कसलेल्या राजकारण्यांपैकी एक असणार्या पवार यांनीच या मागणीचा पुनरुच्चार केल्याने आता हा मुद्दा मुख्य पटलावर आला आहे. त्याचे पुढे काय होणार, की उलट-सुलट चर्चेच्या भानगडीत हा विषय पुन्हा अडगळीत पडणार, याकडे अभ्यासक बांधव डोळे लावून बसले आहेत.

पवारांच्या मागणीनंतर याची गरज, मागणी व संविधानाच्या अंगाने पूर्तता करण्याबद्दलचा विचारही सुरू झाला आहे. मात्र, तरीही शेतकर्यांमध्ये सर्वाधिक संख्येने असणार्या मराठा समाजाच्या नेते मंडळींनी यावर ठोस भूमिका घेण्याचे टाळले आहे. शेतकरी म्हणून आरक्षण देताना पवारांनी सांगितलेली 2 एकरांची अट मराठा समाजातील नेत्यांना जाचक वाटत असल्यानेच या मागणीवर अव्यक्त राहण्याची भूमिका समाजाने घेतल्याचे दिसते. कारण, या मागणीस पाठींबा दिल्यास गरिब मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मागणीलाच पाठींबा दिल्यासारखे आहे. कारण, अल्पभूधारक शेतकर्यांना आरक्षण देताना भूमिहीनांचाही विचार पुढे येऊ शकतो. अशावेळी मराठा समाजात नेते म्हणून जागा पक्की केलेल्या आर्थिकदृष्ट्या सबळ मंडळींना आरक्षणाच्या मागणीचाच फेरविचार करावा लागणार आहे. अशी द्विधा स्थिती मराठा नेत्यांसह या समाजातील श्रीमंतांची झाली आहे. आरक्षणाच्या आंदोलनात मराठा समाजातील श्रीमंतांनीच पुढाकार घेतला होता. आता आपल्यातीलच गरिबांना आरक्षण देण्याच्या मागणीला पाठींबा दिल्यास आरक्षणाचाहक्कसोडण्याची त्यांची तयारी नसल्यानेच पवार यांच्या या मागणीवर सर्वांनी सोईस्कर मौन बाळगले आहे.

शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने उत्पादीत केलेल्या शेतमालाला 1970 पर्यंत चांगला भाव मिळत होता. त्यामुळेच त्यावेळी उत्तम शेतीचा ट्रेंड होता. मात्र, जागतिकीकरणाच्या झंझावातात सेवा उद्योग व चंगळवादाच्या वस्तुंची मागणीही वाढली. परिणामी खाणे या जगण्यासाठी महत्त्वाच्या कामाला हातभार लावणारा शेती व्यवसाया अडचणीत येऊ लागला. त्यातही कष्टाचे महत्त्व कमी होत गेले. कमी श्रमामध्ये जास्त पैसा मिळवून देणारे उद्योग-व्यवसाय आल्याने अशा क्षेत्रांतील नोकर्यांचे महत्त्व वाढत गेले. 1990 नंतर हे वेगाने घडले. त्याचीच लय व तालबद्धता न समजून घेता शेतीचे महत्त्व वाढविण्याचे सामाजिक व राजकीय भान दरम्यानच्या व्यवस्थेसह पुढार्यांनीही दाखविले नाही. शेतमाल विपणनाच्या मॉडेल अॅक्टसारखे काही सन्माननीय अपवादात्मक निर्णय या काळात घेण्याचेही प्रयत्न झाले. मात्र, मनुष्यात वाढलेल्या स्वार्थी प्रवृत्तीने ते सोईस्कररित्या हाणून पाडले गेले. कोणत्याही गोष्टीमध्ये स्पर्धाक्षमता आणल्याशिवाय बाजाराचा समतोल राखला जाऊ शकत नाही, असा जागतिकीकरणाने दिलेला विचारच शेतीच्या बाबतीत बाजूला ठेवण्यात आला. परिणामी शेतीची व शेतीशी निगडीत सामाजिक घटकांची अपरिमित हानी झाली. स्व. शरद जोशी यांनी हेच ओळखून शेतकर्यांच्या उन्नतीसाठीचा नवा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आंदोलनामधील राजकीय ताकद लक्षात घेऊन असा नवा विचार बाजूला ठेवण्याची राजकीय गरज तत्कालीन पुढार्यांच्या लक्षात आली. मग त्यांनीच स्व. जोशींना राजकारणात आणून आंदोलनाची तीव्रता सोईस्कर कमी केली. तत्कालीन इतर शेतकरी नेतेही मग याच सत्ताकारणातून बदल करण्याच्या अपेक्षेने राजकारणात ओढले गेले. यातून शेतकरी आंदोलनाची शकले उडून जोशी यांचा शेतकरी उन्नतीचा विचारही मागे पडला. मुळात राजकारणात फेरमांडणी करून शेतकरी चळवळीने स्वतंत्रपणे राजकारणाचा भाग होणे अपेक्षित होते. मात्र, आहे त्यांच्याच विचारांमध्ये बदल करण्याचा अविचारी व सोपा खेळ मांडण्याच्या विचारातून शेतकरी चळवळ राजकारणात ओढली गेली. यातून दुसर्यांमध्ये बदल होण्याऐवजी शेतकरी नेत्यांचेच राजकारणी तयार झाले अन् अशा पद्धतीने ही चळवळ संपली आणि परिणामी शेतकरी देशोधडीला लागला.

आताही मार्क्सवाद्यांच्या पोथिनिष्ठ धोरणाप्रमाणेच शेतकरी नेते शेतीच्या प्रश्नांसह शेतकर्यांच्या विचारांची मांडणी करीत आहेत. तसेच शेतकरी म्हणून एक जात बांधण्यात शेतकरी चळवळीला अपयश आले आहे. उलट, शेतकर्यांमधील आठरापगड जातींच्या स्वतंत्र संघटना व राजकीय पुढारी मिरवत आहेत. अशावेळी पवार साहेबांनी शेतकरी हीच एक जात म्हणून विचार करून आरक्षण देण्याची मागणी करून वेगळी मांडणी केली आहे. मात्र, तिलाही म्हणावा असा पाठिंबा सध्या मिळालेला नाही. शेतकरी आरक्षणाची मागणी करतानाच असे आरक्षण कसे घटनेच्या चौकटीत बसू शकते, याबद्दल पवारांनी भाष्य केले आहे. याचेही दोन अर्थ निघतात. पहिला म्हणजे सध्या सर्वसाधारण प्रवर्गात असणार्या जातीसमुहांना जातीच्या आधारावर शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक आरक्षणाचा लाभ मिळणे अशक्य आहे. तसेच जातीचा मुद्दा सोडून शेतकर्यांची मोट बांधून आरक्षणाचे लाभ मिळू शकतात. गरिब शेतकर्यांच्या मुलांना शिक्षणासाठी यातून फायदा हाईल. असे दोन संदेश पवार यांनी दिलेले आहेत. याकडेच दुर्लक्ष करून शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी शेतकर्यांमध्येही गरीब व श्रीमंत असे दोन गट पडण्याच्या भितीने पवारांच्या विचारांना विरोधी सूर आळवला आहे. ज्या विदर्भात शेतकरी आरक्षणाची सर्वप्रथम मागणी झाली, त्याच विदर्भामधील शेतकरी नेत्यांनी यास पहिला विरोध दर्शविला आहे. असाही विरोधाभास यात आहे.

आरक्षणामुळे गरिबी निर्मुलन होणार असल्याचा अविचार पसरलेला असतानाच, आपल्यालाही आरक्षण मिळविण्याचा डाव आता प्रत्येकाचा आहे. त्यातून आरक्षणाची चळवळ व जातीय अस्मितांचे अंगार फुलविले जात आहेत. अशावेळी शेतीसारख्या एका व्यवसायामधील गरीबांना आरक्षणाचा विचार पवार यांनी मांडला आहे. त्याचे राजकीय व सामाजिक अशा दोन्ही अर्थांनी महत्त्व आहे. सामाजिक भान असलेल्या पवार यांनी घटनेच्या चौकटीत बसवूनच हा विचार मांडला असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच याचे महत्त्व मोठे आहे. मात्र, सर्वसाधारण घटकांतील जातींना जातीय आधारावर आरक्षणास नकार मिळाल्यानंतरच शेतकरी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचल खाईल. तोपर्यंत पवार यांच्या शेतकरी आरक्षणाच्या मागणीवर जनमत तयार होणे अवघड आहे.

@
सचिन मोहन चोभे
Mo. 9422462003 
*copy right @krushirang

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget