DNA Live24 2015
May 2018

नवी दिल्ली :
कृषी, वन, मत्स्य पालन किंवा पशुपालनाला सेवा देण्यासाठी गुड्स अॅण्ड सर्विसेस टॅक्स (जीएसटी) मधून सवलत देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याबाबत परिपत्रक जरी केले आहे.
अर्थमंत्रालयाने आज स्पष्ट केले की कृषी, वनीकरण, मच्छिमारी किंवा पशुपालकांसाठी जमीन भाडेपट्टीने किंवा भाडेपट्टीने देण्याबाबत जीएसटी मुक्त आहे. शेतीमध्ये सहाय्य केलेल्या सेवांचा समावेश असलेल्या भागातील भाड्याच्या भाड्याने किंवा भाड्याने देणे किंवा त्याच्याशी संबंधित संरचना न देता. शेतकऱ्यांना जीएसटी नोंदणीपासून सूट दिली आहे.

भोपाळ :
यंदा बम्पर पिक आल्याने लसून पिकाचे भाव कोसळले आहेत. परिणामी मध्यप्रदेश राज्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. ही घट झाल्याने लाखो शेतकरी याचे खापर राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर फोडत आहेत. तर, काही शेतकऱ्यांनी आता लसून उत्पादित पिक थेट रस्त्यावर टाकण्यास सुरुवात केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारीत नीमच भाजी मार्केटमध्ये लसणीचे दर प्रति किलो 50-80 प्रति कि.मी. वर आले होते, परंतु तेव्हापासून त्याची किंमत खाली उतरली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीत दर 30-50 प्रति किलो तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ती 5-20 प्रति किलो होती.

दारूखेडा गावातील शेतकरी सुर्यभानसिंह बाना म्हणाले, "उत्पादक लसणीचा उत्पादन खर्च कमी करण्यात अपयशी ठरला आहे आणि म्हणून ते दररोज 1 ते 5 रुपयांच्या कमी दराने विक्री करण्यापेक्षा ते फेकणे पसंत करतात."

नवी दिल्ली :
जागतिक बाजारातील चढ उतार आणि कमकुवत रुपयामुळे विदेशातील मागणीत वाढ झाल्याने भारताच्या २०१७-१८ मधील कापसाच्या निर्यातीचा दर गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या कपाशी निर्यात वर्षामध्ये आतापर्यंत ६.३ दशलक्ष गाठींची निर्यात केली आहे. यामुळे यंदा चार वर्षांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजे सुमारे ७.५ दशलक्ष गाठींपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) संस्थेचे अध्यक्ष अतुल गणत्रा यांनी सांगितले की, "यंदा आम्ही ७.५ दशलक्ष गाठींच्या निर्यातीसह सीझन संपवू शकतो.
भारताने गेल्या मार्चमध्ये ५.८२ दशलक्ष गाठी कापसाची निर्यात केली होती. प्रत्येक गाठीमध्ये 170 किलो कापूस असते.पालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीच्या प्रचारात व त्यानंतर मतदानाच्या दिवशी झालेला एकूण गोंधळा लक्षात घेता आपला देश कोणत्या राजकीय संस्कृतीचा शिकार झालाय, यावरच थेट शिक्कामोर्तब झाले आहे. काल या दोन्ही ठिकाणी मतदान झाले असून, आता मतदारांवर कोणताही थेट प्रभाव माझ्याकडून पडणार नसल्याने मनसोक्त लिहिण्याची संधी घेतोय. कारण, निवडणूक आयोग आणि एकूणच सरकारी यंत्रणांच्या गैरकारभाराचा कळस आपण गाठलाय. लोकशाहीसह एकूणच राजकीय आणि सामाजिक संस्कृतीचा झालेला कडेलोट आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्म मानणारा आपला भारतीय समाज हे सगळे सहन करतोय कसे, असाही प्रश्न मनात येतोय. याला निमित्त ठरले आहे ‘साम, दाम, दंड, भेद’बद्दल राणा भीमदेवी थाटात ‘मार्गदर्शन’ करणारे आपले ‘लोकप्रिय’ मुख्यमंत्री.  त्यामुळेच मुख्यमंत्री महोदयांच्या या ऑडिओ क्लीपनामक प्रकरणाचा समाचार घेताना भूतकाळात डोकावण्याचीही हुक्की मला आली. कारण, इतिहासाला कवटाळून बसण्याऐवजी त्यातून बोध घेऊन झालेल्या चुका टाळण्याची गरज आहे, असे ऐकून आम्ही मोठे झालोत. आणि आता आम्ही (भक्तांच्या मनातले माझ्यासह समस्त ‘अविचारी’) ऐकतोय की, देशात पुन्हा एकदा पुराणाचे वांगे लावण्यासाठी समस्त ६०० कोटी जनता सक्रीय झाली आहे. मात्र, अशावेळी एकूण जगाचा विचार करता फ़क़्त आमचीच संस्कृती ‘उजवी’ असल्याचे भासविण्याच्या नादात जगभरातील समस्त उजव्या माथेफिरुंचा आपण अजाणतेपणी अपमान करीत आहोत, याचेच भान  भक्तांसह त्यांच्या नेत्यांनी ठेवलेले नाही.

आपले मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना ‘मार्गदर्शन’ करताना म्हटले आहे, “एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला आता लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी आव्हान देत असेल आणि मित्र विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसणार असेल तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट झालं पाहिजे? ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे. तो आता शांत राहू शकत नाही. आता एव्हढा मोठा अटॅक आपण आपण केला पाहिजे की, भाजप काय आहे हे ‘त्यांना’ लक्षात आले पाहिजे. ज्यावेळी मी हे सांगतो तेंव्हा लक्षात ठेवा. साम, दाम, दंड, भेद... ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसे उत्तर दिलं पाहिजे.... तेंव्हा तुमच्या पाठीशी ताकदीने आणि खंबीरपणे मी उभा आहे.....” पुढचं येथे काही लिहिण्याची गरज नाही कारण वाचकांनी ती सगळी क्लिप मराठी वृत्त वाहिन्या किंवा सोशल मिडीयावर ऐकली आहे. तसेच मुख्यमंत्री महोदयांची त्यावरील प्रतिक्रियाही आपण जगजाहीर पहिली आहे. एका पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. आता एक व्यक्ती म्हणून ते असे बोलले असते तर, त्याची दाखल घेण्याचे काही कारण नव्हते. कारण, एकूणच सध्या हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे जे काही बडबडत आहेत. त्याचीच पुढची आवृत्ती म्हणून ही वाक्ये आहेत. तोडफोड करून सत्ता आणि राज्यकारण करण्यात ‘उजवे’ असलेल्यांचे हे विचार सार्वत्रिक आहेत. त्यामुळेच कितीही आव आणला तरी हा पक्ष कधीही साव होऊच शकत नाही. पण महाराष्ट्र (पुरोगामी वगैरे टेंभा मिरवण्याची येथे गरज नसल्याने तो शब्द जाणीवपूर्वक टाळला आहे) राज्याचे मुख्य-मंत्री म्हणून ते बोलत असल्याने या क्लीपचे महत्व जादा आहे. आणि त्यावर माझ्यासारखे पामर काही लिहित असल्यास तेही दखलपात्र नाही. मुख्यमंत्री किंवा भाजपच्या ‘संस्कृतीरक्षक’ कार्यकर्ते व भक्तांनी याची दाखल घेतलीच तरी यावर ‘काँग्रेसवादी’ किंवा ‘धर्मविरोधी’ असा शिक्काही मारून ‘ते’ मोकळे होतील. तर, मुद्दा माझा नाही. तो आहे मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने अशा पद्धतीने बेकायदेशीर घटकांना थेट पाठीशी घालण्याचा. होय, यातून एकूण भारताची सामाजिक आणि पर्यायाने राजकीय संस्कृती कशी लोप पावली आहे, यावरच थेट शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना या मराठीरक्षक हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षाने ही ऑडिओ क्लिप प्रासिद्ध केली आहे. पक्षाचे नेते आणि भाजपचे ‘मित्र’ उद्धव ठाकरे यांचीच भाषा वापरून मुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्यांना ‘राजधर्म’ शिकवीत आहेत. हे पाहून माझ्या काही मित्रांना ४४० वोल्टचा धक्का बसला. का तर म्हणे, असे ‘पारदर्शक’ आणि ‘संस्कृतीरक्षक’ किंवा ‘धर्मरक्षक’ नेते असे बोलूच कसे शकतात..!

देवेंद्रभाऊ फडणवीस मुख्यमंत्री या नात्याने निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना असा जालीम कानमंत्र देत असल्याचे सगळे ऐकत असताना आपला निवडणूक आयोग नेहमीसारखाच शांत होता. साठ वर्षांत या आयोगासह बहुसंख्य सरकारी यंत्रणांनी सत्ताधार्यांच्या बाजूने कौल देताना वेळोवेळी कोडगी भूमिका घेतली आहे. त्याच पायावर आता सुवर्णकळस चढविण्याची वेळ आली आहे. होय, वेळ आणि काळही. कारण, एकूण समाज म्हणून देशासह अवघ्या जगातही ‘उजव्या’ विचारांना भरते आले आहे. मग ती अमेरिका असो की युरोप. नाहीतर पाकिस्तान असो की सिरीया. सगळीकडे डावे सुपाडासाफ झाले आहेत. धर्माला अफूची गोळी ठरविण्याच्या नादात डाव्यांना जोरदार झिंग चढली आणि त्याच वावटळीत ते समाजबाह्य झाले. मग अशावेळी जागा भरून काढण्यासाठी मध्यममार्गी विचार पुढे येणे अपेक्षित होते. पण ते कमी पडले आणि पुन्हा एकदा उजव्यांना बहर आला. आपल्याकडेही रामायण-महाभारत या दोन महाकाव्यांना टीव्हीवर दाखवून उजवे रुजले. याच उजव्यांनी आता पुराणातले वांगे पुन्हा रुजविण्याचा चंग बांधून साम, दाम, दंड, भेद यांचा मनसोक्त वापर करून हिंदुत्ववादी धर्म रुजविण्यासाठी लढाईचे रणशिंग फुंकले आहे. मुख्यमंत्री साहेबांना अपेक्षित असणारे हे युद्ध वेगळे आहे. गुजरातमध्ये मोदी साहेब मुख्यमंत्री असताना असेच घमासान रंगले. गुजरात राज्य त्यामुळे जगप्रसिद्ध झाले. तशाच अर्थाने गुजरातची परंपरा चालविण्याची धुरा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आपल्या खांद्यावर घेतलेली दिसते.

या लढाईत यापूर्वी ‘भगवे रक्त’ असायचे. मात्र, त्याच रक्ताला आता साहेबांनी ‘भाजप रक्त’ बनवून टाकले आहे. रक्ताचा रंग बदलविण्याची ही खेळी आपल्या देशाचा काय खेळखंडोबा करणार, असा प्रश्न आम्हा ‘अविचारी’ ‘अभारतीयां’ना यानिमित्ताने पडला आहे. सिरीया असो की अफगाणिस्तान किंवा आपल्या शेजारचा पाकिस्तान. तिथे हिरव्या रक्ताची मंडळी धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाचा विडा उचलून लाल रक्ताची माती करीत आहेत. आपल्याकडेही मालेगाव असो की ठाणे, गोवा व हैदराबाद. इथे त्याच हिरव्या रक्ताला काटशह देण्यासाठी भगवे रक्त सळसळून उठले. ‘आर्यावर्त’ नावाचे नवीन राष्ट्र उभारण्याचे काहींनी ‘पौरोहित्य’ घेऊन तिथे लाल रक्ताच्या पामरांना ‘स्वर्गलोकी’ पाठविण्याचे ‘पुण्यकर्म’ केले. त्याचीच पुढची आवृत्ती आता आपल्याकडे सर्वत्र पाहायला मिळतेय. त्याचे हिरवे आणि भगवे शिलेदार एमआयएम आणि भाजप यांच्या नावाने राजकारणात पावन झाले आहेत. शिवसेनाही त्याच विचारांनी फुलली, फळली आहे. काहीजण जातीच्या नावाने पक्ष किंवा संघटना काढून त्या धर्मांध आगीत तेल ओतत आहेत. यालाच विरोध करणाऱ्यांना विचारी ठरविण्याऐवजी धर्मबाह्य किंवा पाकिस्तानी ठरविण्याची एक वेगळी फॅशन फोफावत आहे.
जिहाद शब्द वापरून मुस्लीम कट्टरपंथीय विचार जगभर रुजला, वाढला आणि फोफावला. आपल्या भारतातही त्याला दहशतवादी कृत्यांची फळे लगडली. देशानेही ही अप्रिय फळे चाखली. त्याचवेळी हिंदुत्ववादी विचारही एक’संघ’ होत होता. कॉंग्रेसच्या बेरजेच्या राजकारणात तोही फुलला आणि त्याचीच फळे २००० (नोट नव्हे वर्षे) नंतर आपल्याला ठोसपणे जाणवत आहेत. हिंदू समाजालाही भगव्या रक्ताची आण देऊन धर्मांध बनविले जात आहे. मुस्लिमबहुल राष्ट्रांत ज्या पद्धतीने धर्मांध रक्ताचे माथेफिरू निर्माण करून समाज व देशाचे वाटोळे करण्यात आले. तीच ट्रीक भारत नावाच्या विचारी आणि सुज्ञ परिसरात मोहम्मद अली जिना यांनी वापरली. एकाच देशाचे तीन शकले पाडली. त्याच विचारांचा ‘जिना’ वापरून भगव्या रक्ताचे काहीजण आता भारताचे आणखी शकले करण्यासाठी अधीर झाले आहेत. आपला तो बाब्या, ही राजकीय संस्कृती आकार घेत आहे. अशावेळी कार्यकर्त्यांना सामाजिक हिताचे रक्षण करण्याची प्रेरणा देण्याचे काम मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने करण्याची गरज आहे. नव्हे तेच त्यांचे कर्तव्य आहे. अशी शिवराळ भाषा वापरणाऱ्या माथेफिरूंना गजाआड करण्यासाठी पोलिसांना ताकद देण्याचे काम मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने करायला हवे. तर, याउलट त्यांनी आमची गाय मारली, म्हणून आम्ही त्यांचे वासरू मारू, या विचारांने प्रेरित होऊन फडणवीस साहेब ‘मार्गदर्शन’ करीत आहेत.
फडणवीस साहेबांच्या राजकीय पक्षाचे ‘विचार’ त्यांनी खासगीत बोलून दाखविले की काय अशीच शंका येते. एका कार्यकर्त्याने साहेबांचे हेच ‘विचार’ रेकॉर्डिंग करून घेतले आणि शिवसेनेला प्रचारासाठी मुद्दा दिला. त्यावर निवडणूक आयोगाने कार्यवाही करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली. क्लीनचीट देण्यात विक्रमादित्य असणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी शब्दच्छल करून आपली आपणच क्लीनचीट जाहीर करून घेतली. याच गदारोळात भंडारा-गोंदिया येथील आचारसंहिता भंग केल्याचे मुद्दे बाद ठरले. मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात झालेले घोळ निवडणुक आयोगावरचा विश्वास आणखी कमी करणारे आहेत. एकूण इतिहास लक्षात घेता आतापर्यंत धर्म आणि संस्कृती यांच्या संरक्षणाची भाषा करणाऱ्यांनी विजयी पताका उभारल्या आहेत. साम, दाम, दंड, भेद हीच संस्कृती ‘उजवी’ ठरलेली आहे. मग ते राज्य औरंगजेब बादशहाचे असो की इतरही कुणाचे. धर्म नावाची अफूची गोळी एकदा खाल्ली किंवा खाऊ घातली की माणुसकी नावाचा खरा धर्म आपण विसरतो. माणूसपण विसरलो की, मग उरतो फ़क़्त अविचारी मांसाचा गोळा. असेच अविचार फोफावणारे एक झाले की मग माजते मोगलाई. मग ती फ़क़्त जिहादी विचारांचीच असते असे नाही तर, ती कोणत्याही रंगाची किंवा धर्माची असू शकते. आणि त्यात कोणताही माणूस वाहवत जाऊ शकतो. अगदी मी सुद्धा...

@ सचिन मोहन चोभे
       संपादक, कृषीरंग


अहमदनगर
देशातील अनेक शेतकरी संघटना व इतर संघटनांनी १ जून ते १० जून संप करण्याची घोषणा केली आहे. या संपातील मागण्या शेतकर्यांच्या हिताच्या नसल्यामुळे  शेतकरी संघटना या संपात सहभागी होणार नसल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे केली आहे.
       भातरतातील अनेक शेतकरी संघटना एकत्र येऊन १ जून ते १० जून संप करण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. या संपातील मागण्या शेतकर्यांच्या हिताच्या नसुन शेतकर्यांचे नुकसान करणार्या व शेतकर्याला कायमस्वरुपी सरकारवर अवलंबुन ठेवणार्या आहेत.
      सध्या शासन देत असलेल्या आधारभूत किमती, प्रत्यक्ष उत्पादन खर्चा पेक्षा ५०% कमी आहेत. तरी नोंदणी केलेला शेतीमाल सुद्धा शासनाला खरेदी करता येत नाही. त्यासाठी आवश्यक संरचना सरकारकडे नाही. गोदामे, काटे, बारदाना, सुतुळी, मणुष्यबळ व पैसे ही नाहीत. खरेदी केंद्रा समोर शेतकर्यांचे प्रण जात आहेत अशा परिस्थितीत शासनाकडुन उत्पादन खर्च अधीक ५०% हमी भावाची अपेक्षा करणे हस्यास्पद आहे.
           स्वामिनाथन आयोगातील अनेक शिफारशी शेतकरी विरोधी आहेत तसेच या संपातील अनेक मागण्या अव्यवहार्य आहेत. ‍शेतकर्याला स्वावलंबी करण्या पेक्षा शेतकर्याला सरकारच्या दारातील याचक बनविणार्या या मागण्या आहेत.
   भारतातील शेतकर्यांना संरक्षणाची नाही, स्वातंत्रयाची गरज आहे. व्यापार स्वातंत्रय, तंत्रज्ञानाचे स्वातंत्रय, आवश्यक संरचना, प्रक्रिया उद्योगांना चालना दिल्यास व घटनेत घुसडलेले परिशिष्ट ९ मधील शेतकरी विरोधी  शेती विरोधी कायदे रद्द केल्यास भारतातील शेतकरी जगाच्या  बाजारपेठेत स्पर्धा करू शकतो व  कर्जमुक्त होऊ शकतो.
       ज्या सरकारला आता नोकरांचे पगार करणे सुद्धा मुश्किल झाले आहे. लाखो कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजा खाली दबलेले आहे त्या सरकारकडुन संरक्षणाची अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे.
           शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या संपात सहभागी होणार नाहीत. कोणाला सहभागी होण्यापासुन रोकणार नाहीत. या संपात काही हिंसक प्रकार घडल्यास त्याला शेतकरी संघटना जवाबदार राहणार नाही असे निवेदन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिले आहे.


अहमदनगर
मास मार्केट ब्रॅड दरम्यान विक्री पश्‍चात उत्तम सेवा देणार्‍या व ग्राहकांची प्रथम पसंती ठरलेल्या ह्युन्दाई कंपनीच्या नवीन क्रेटा कारचे इलाक्षी ह्युन्दाई शोरुममध्ये दिमाखदार सोहळ्यात अनावरण झाले. अहमदनगर कारागृहाचे अधिक्षक एन.जी. सावंत व श्यामकांत शेडगे यांच्या हस्ते या कारचे अनावरण करण्यात आले. अनावरण पश्‍चात सहा ग्राहकांना या कारचे वितरण करण्यात आले.  यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारच्या बाजारपेठेत नव्याने दाखल झालेली व ग्राहकांना भुरळ घालणारी क्रेटा अत्यंत वाजवी दरात तर विविध सोयी-सुविधांच्या संपन्नतेने उपलब्ध झाली असता या कारकडे ग्राहकांचा कळ वाढत आहे. या कारमध्ये वाजवी दरात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सोयी-सुविधा इतर प्रतिस्पर्धी कारमध्ये नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. क्रेटाच्या इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलीटी मॅनेजमेंट, हिव्ह बॉडी शेप, हिल असिस्ट कंट्रोल, रिअर पार्किग असिस्ट सिस्टीमव इलेक्ट्रोक्रोमिक मीरर आदि वैशिष्ट्यामुळे प्रवाश्यांना सुरक्षितता प्रदान करण्यात आली आहे. ह्युन्दाई ऑटोलिंक ही सुविधा भारतात प्रथमच या कंपनीद्वारा एसयुव्ही सेगमेंट मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ज्याद्वारे ग्राहक, डिलर व कंपनी एकमेकाशी निगडीत राहता येणार आहे. 
एफऐटीसी क्लस्टर आर्गोनायझरसह ज्याद्वारे गाडीमध्ये प्रदुषणमुक्त हवा खेळती राहते व प्रवासी अल्हाददायक प्रवासाचा आनंद घेवू शकतात. एसयुव्ही सेगमेंट मध्ये स्मार्ट सन रुफ, वायरलेस फोन चार्जर व 6 वे पॅावर ड्रायव्हर सीट या सुविधा ग्राहकांना सदर गाडीमध्ये प्रथमच उपलब्ध होणार आहेत. क्रुझ कंट्रोल, अ‍ॅडव्हान्स सुपरव्हीजन क्लस्टर व स्पोर्टी ईन्टेरीअर मुळे गाडीला देखणे रुप मिळाले आहे. 1.6 ली. पेट्रोल, 1.4 ली. डिझेल इंजिन तसेच 6 स्पीड अ‍ॅटोमॅटीक ट्रान्समिशनमुळे सदर गाडीने पॅावरच्या बाबतीत इतर कंपनीच्या वाहनांना मागे टाकले असल्याचा कंपनीचा दावा आहे. सदर गाडीस 3 वर्ष अमर्याादित कि.मी. वॅारंटी व 3 वर्ष रोड साईड असीस्टंट आर.एस.ए. प्रदान करण्यात आली आहे. सदर गाडी पहाण्यासाठी इलाशी ह्युन्दाई शोरुममध्ये उपलब्ध असून, जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन शोरुमचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी केले आहे. तर पहिल्याच दिवशी सहा क्रेटा मॉडेलचे गाड्या घेणार्‍या ग्राहकांना शोरुमचे संचालक विजयकुमार गडाख यांनी अभिनंदन केले.

अहमदनगर
आई मायेचा सागर असून, मनुष्य सृष्टीची ती जननी आहे. निस्वार्थपणे मायेची ऊब देणारी ही एक माताच असू शकते. महिला फक्त घराची सदस्या नसून ती त्या कुटुंबाचा कणा असते. प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे हे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याची भावना नॅशनल ब्लाइंड असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक बंग यांनी केले.
सारसनगर येथे माहेश्‍वरी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मातृवंदन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बंग बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहेश्‍वरी प्रतिष्ठानचे मोहनलाल मानधना तर यावेळी सारसनगर माहेश्‍वरी समाजाचे अध्यक्ष धीरज लढ्ढा, पुरुषोत्तम मानधना, सिमा बंग, पन्नालालजी झंवर, नंदलालजी मानधना, श्यामसुंदर सारडा, प्रकल्प प्रमुख मनोज जाजू, सुयोग झंवर, सी.ए. संजय कालानी आदि उपस्थित होते. 
प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वल करुन, महेश भगवानच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कु.मिताली नागोरी हीने गणेश वंदना तर निकीता मालु व वैष्णवी जाखोटीया या विद्यार्थिनींनी बहारदार नृत्याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात मातृदिनाचे औचित्य साधून समाजातील 35 ज्येष्ठ महिलांचा गौरव करण्यात आला. मुलींच्या सर्वांगीन विकासासाठी उडान हा उपक्रम घेतल्याबद्दल डॉ.श्यामा मंत्री यांचा सत्कार करण्यात आला. अ‍ॅड.सुनिल मुंदडा यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. विशाल बाहेती यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून मातृवंदन केले. 
धिरज लढ्ढा यांनी प्रास्ताविकात सारसनगर माहेश्‍वरी समाजाच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणार्‍या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. मोहनलाल मानधना यांनी महिलांच्या गौरवासाठी घेतलेला उपक्रम प्रशंसनीय असून, या उपक्रमाचे अनुकरण इतर संस्थांना करण्याचे आवाहन केले.  
 विनायक धुत या अंध युवकाने श्यामची आई व आधुनिक आई या दोघांचा समन्वय साधून उपस्थितांना आपल्या भाषणातून मंत्रमुग्ध केले तर युवकांना दररोज मातृवंदन करण्याचे आवाहन केले. गौरव समारंभा नंतर महिलांच्या हस्ते केक कापण्यात आला. याप्रसंगी ओमप्रकाश चांडक, डॉ.भरतलाल धुत, दिपक काबरा, विनोद बजाज, किसनलाल बंग, युवक मंडळाचे अध्यक्ष अमित काबरा, विठ्ठलदास मुंदडा, इंदिरा बिहाणी, दिपा मंत्री आदिंसह माहेश्‍वरी समाजातील सर्व संघटनांचे प्रतिनिधी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अ‍ॅड.सुनिल मुंदडा व दिपा मालू यांने केले. दिपक जाजू यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकेत मानधना, श्रीराम मुंदडा, अजय नागोरी, दिपक नागोरी, संजय भक्कडसर, हर्षल सोमाणी, कृष्णा भुतडा, कुणाल कचोलिया, कैलास बंग, राजेंद्रकुमार सोनी, पवन धुत आदिंसह सारसनगर महिला मंडळ, दांडिया ग्रुप, किशोरी मंडळ आदिंनी परिश्रम घेतले.

अहमदनगर 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यव्यापी अधिवेशन रविवार दि.27 मे रोजी पुणे येथील एस.एस.पी.एम.एस. मैदानात होत असून, अहमदनगर जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते या अधिवेशनासाठी रवाना होणार आहे. कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे.
रविवारी सकाळी मार्केटयार्ड चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यकर्त्यांचा जथ्था अधिवेशनासाठी पुण्याला रवाना होणार आहे. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अधिवेशन होत असून, याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायचे राज्य मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर, राष्ट्रीय कोषाअध्यक्ष एम.डी. शेवाळे आदि उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रसिध्दीप्रमुख तथा युवकचे भिंगार शहराध्यक्ष अमित काळे यांनी दिली. 
या अधिवेशनासाठी जिल्ह्यातून आरपीआयचे राज्य सचिव विजय वाघचौरे, अशोक गायकवाड, राज्य उपाध्यक्ष श्रावण वाघमारे, पवनकुमार साळवे, जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, संजय कांबळे, बाळासाहेब गायकवाड, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, रामचंद्र कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, युवक शहर जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे, युवकचे भिंगार शहराध्यक्ष अमित काळे, उत्तर जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, पापाभाई बिवाल, नाना पाटोळे, भिमाभाऊ बागुल, विजय भांबळ, रमेश गायकवाड, आशिश शेळके, बाबा राजगुरु, विजय बोरुडे, बाळासाहेब शिंदे, रविंद्र आरोळे, भास्कर भैलुमे, संजय भैलुमे, पोपट सरोदे, राजू उबाळे, विशाल कांबळे, आरती बडेकर जाणार असून, कार्यकर्त्यांना अधिवेशनासाठी येण्याचे आवाहन आरपीआयच्या वतीने करण्यात आले आहे.


अहमदनगर
पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. तसेच पावसाळापूर्व काळात करावयाच्या सर्व उपाययोजना तात्काळ कराव्यात, जेणेकरुन नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. मात्र, आपत्ती व्यवस्थापनात हयगय करणाऱ्या यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. जिल्हास्तरीय आणि प्रत्येक तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
          येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सन 2018 नैसर्गिक आपत्ती, पूर प्रतिबंधात्मक आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, उपमहावनसंरक्षक आदर्श रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडधे आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
          यावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, प्रत्येक यंत्रणांनी त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडली पाहिजे. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे जनजीवन विस्कळीत होणार नाही, जीवित वा वित्तीय मालमत्तेची हानी होणार नाही, यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना संबंधित यंत्रणांनी पावसाळ्यापूर्वीच करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने बहुतांशी विभागांनी काम सुरु केल्याचे दिसून येत आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात कोणत्याही प्रकारे नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात हयगय होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.  दिलेल्या जबाबदाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आढळून आल्यास सक्त कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले.
          प्रत्येक यंत्रणांनी त्यांचा आपत्कालीन कक्ष 24x7 सुरु ठेवावा. त्याठिकाणी अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी. वेगवेगळ्या यंत्रणांनी गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर व्यवस्थित समन्वय आणि संपर्क ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिल्या.
          पावसाळ्यात जलजन्य आजारांचे प्रमाण लक्षात घेता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, जलसंधारण विभाग, पाटबंधारे विभाग आदींनी आपापल्या क्षेत्रातील जलसाठ्यांची काळजी घ्यावी. तलावांची डागडुजी व्यवस्थित करावी. पशुसंवर्धन विभागाने पावसाळ्यातल पशुंना होणारे आजार लक्षात घेऊन त्याच्या लसीकरणाचे नियोजन करावे. त्यासाठीच्या औषधांचा पुरेसा साठा आताच प्राप्त करुन घ्यावा. विशेषता ज्या भागात पर्जन्याचे प्रमाण अधिक आहे, तेथे ही काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
          जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पावसाळ्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या लोकांना योग्य ठिकाणी नेणे, त्यांची व्यवस्था आदींबाबत कार्यवाही करावी. नदी-नाले-ओढे यांचे नैसर्गिक प्रवाह खुले करावेत, त्याअनुषंगाने अतिक्रमणे किंवा इतर अडथळे असतील तर ते दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अति पावसाने नद्यांवरील पूल पाण्याखाली गेले तर वाहतूकीच्या अनुषंगाने नियोजन, त्यासंदर्भातील माहिती फलक लावणे आदींची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी, असे त्यांनी सांगितले.
          अकोले व संगमनेर तालुक्यातील काही भागात पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना घडतात. अशावेळी तात्काळ उपचार आणि औषधी साठा नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातक उपलब्ध असेल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
          यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वाघ यांनी, जिल्ह्यात एकूण 223 गावे ही पूरप्रवण क्षेत्रात येत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात अतिवृष्टी, धरणांतून मोठ्या प्रमाणात सोडलेला विसर्ग, धरणांचा फुगवटा, नदीपात्रातील अतिक्रमणे, पूररेषेतील वसलेल्या लोकांचा स्थलांतरास विरोध ही मुख्य कारणे असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील 97 महसूली मंडळांतही पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असल्याचे सांगितले.
          जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षात  1077 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनाआपत्कालिन  नैसर्गिक आपत्ती संदर्भातील माहिती देता येईल. याशिवाय, 0241- 2323844 आणि 0241- 2356940 या नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधून माहिती देता येईल, असे त्यांनी सांगितले.        
          या बैठकीला सर्व विभागांचे उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, पाटबंधारे, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन,  महापालिका, नगरपालिका,  दूरसंचार,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसंधारण, अग्निशामक दल, होमगार्ड, पोलीस आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर 
सीना नदी पात्रातील अतिक्रमण काढून घेण्यासाठी प्रशासनाने दिलेली मुदत गुरुवारी संपली असल्याने मनपासह संबंधित खात्यांनी अतिक्रण हटवण्याची तयारी केली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी अतिक्रमण काढण्याबाबत बैठक बोलावली आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसात कारवाई होण्याची शक्यता आहे. सीना नदी पात्रातील अतिक्रम काढण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम प्रशासनाने दिला होता. त्यानुसार द्विवेदी यांनी पाटबंधारे विभागाकडील दोन पोकलेन मशिन कारवाईसाठी अधीग्रहीत करून मनपाला देण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात शुक्रवारी मनपा अतिक्रमण विभाग, पाटबंधारे, महसूल, मोजणी अधिकारी यांची साडेचार वाजता बैठक बोलावली आहे.


अहमदनगर
ग्रामीण भागात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आता तालुक्‍याऐवजी ग्रामपंचायत प्रभाग व जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतीत राबविले जाणार आहे. याशिवाय राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ पंचायत समिती व स्वच्छ जिल्हा परिषद स्पर्धा मोहीमही राबविली जाणार आहे. जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर ग्रामपंचायतींचा गौरव
होईल. बक्षिसाच्या रकमेतही मोठी वाढ केली आहे.
अभियानाला एक मे रोजी सुरवात झाली आहे. दोन ऑक्‍टोबरला राज्यपातळीवर बक्षीस वितरण होईल. जिल्हा परिषद पंचायत समितीला बक्षिसासाठी 30 गुण, प्रभागासाठी शंभर गुण आणि ग्रामपंचायतींसाठी दोनशे गुण, असे निकष असतील. त्यात सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन व शौचालय व्यवस्थापनाला अधिक प्राधान्य असेल. 16 ते 31 मे या कालावधीत ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायती सहभाग निश्‍चित करतील.

अशी आहेत बक्षिसे
- उत्कृष्ट प्रभाग ः 10 हजार रुपये
- जिल्हा परिषद गटातील उत्कृष्ट ग्रामपंचायत ः 50 हजार रुपये
- उत्कृष्ट पंचायत समिती ः प्रथम ः 50 लाख, द्वितीय ः 30 लाख, तृतीय ः 20 लाख
- उत्कृष्ट जिल्हा परिषद ः प्रथम ः 1 कोटी, द्वितीय ः 75 लाख, तृतीय ः 50 लाख
- ग्रामपंचायतींना दिली जाणारी बक्षिसे
- जिल्हा ः प्रथम 5 लाख, द्वितीय 3 लाख व तृतीय दोन लाख
- विभाग ः प्रथम 10 लाख, द्वितीय 8 लाख, तृतीय ः 6 लाख
- राज्य ः प्रथम 25 लाख, द्वितीय ः 20 लाख, तृतीय ः 15 लाख


अहमदनगर
जमीन विविध कारणांमुळे खराब होत आहे, त्यामुळे त्याबाबत जागृती करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज) हैदराबाद, जीआयझेड नवी दिल्ली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी विज्ञान केंद्र दहिगावने, कृषी विज्ञान केंद्र धुळे व वॉटर संस्था यांच्या मार्फत "प्रो-सॉइल' हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प अहमदनगर व धुळे या जिल्ह्यांमध्ये राबवला जात आहे.

दहिगावने (ता. शेवगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था मॅनेज, हैदराबाद व जीआयझेड नवी
दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने "प्रो-सॉइल' प्रकल्पांतर्गत कार्यशाळा झाली. कार्यशाळेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी विज्ञान केंद्र दहिगावने कृषी विज्ञान केंद्र धुळे व वॉटर संस्थेच्या शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. माजी आमदार नरेंद्र घुले
पाटील, मॅनेजचे भास्कर गुज्जी, अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, जीआयझेडचे हिमांशू वर्मा, काकासाहेब शिंदे, डॉ. श्‍याम सुंदर कौशिक या वेळी उपस्थित होते. कार्यशाळेत डॉ. लाखन सिंग, गुज्जी, वर्मा यांनी मार्गदर्शन केले. केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. श्‍यामसुंदर कौशिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. रणजित जाधव यांनी केले. डॉ. अश्विनी दरेकर, शास्त्रज्ञ माणिक लाखे, राहुल कावळे, नारायण निबे, सचिन बडधे, नंदकिशोर दहातोंडे, डॉ. सोमनाथ भास्कर, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट, अनिल देशमुख, प्रवीण देशमुख या वेळी उपस्थित होते.


अहमदनगर
वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये मोफत प्रवेशाबाबत पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी 31 मेपर्यत ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. शासनाने नव्या नियमानुसार खुला प्रवर्ग वगळता अन्य प्रवर्गासाठी एक लाखाच्या उत्पन्नाच्या दाखल्याची अटही शिथील केली आहे.

शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायदा 2010 पासून अमलात आल्यानंतर 20111 पासून वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी 25 टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित, केंद्रीय, आयसीएससी व आयबी (अल्पसंख्याक शाळा वगळून) या शाळा प्रवेश देण्याला पात्र आहेत. त्यासाठी एक लाखाच्या उत्पन्नाची अट आहे. याआधी अनुसूचीत जाती व जमाती या प्रवर्गाला मात्र उत्पन्नाच्या अट शिथील होती. नव्याने राबवण्यात येत असलेल्या अर्ज दाखल करण्याच्या प्रवेश प्रक्रियेत सर्व जण अर्ज दाखल करु शकतात. अधिक माहितीसाठी नागरिकांनी शाळेचे मुख्याध्यापक किंवा पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी केले आहे.

* शेतीला पुरक व्यवसायाची जोड म्हणून चालू केलेल्या गावरान कोंबडी पालन व्यवसायात मिळाली वृध्दी.
* ५० कोंबडी पासून चालू केलेला कोंबड्यांच्या संख्येत झाली ३००० पक्षा पर्यंत वाढ.
* साध्या गवती छप्पराच्या झोपडीत सुरू केलेल्या पक्षीपालन गृहासाठी आता केली शेडची उभारणी.
* पोल्ट्री फार्म व्यवसायाचे सुरूवातीला कोणतेही प्रशिक्षण नसताना केवळ आनुभवाच्या जोरावरच यशस्वीपणे होत आहे पक्षांचे संगोपन.
* गावरान असल्यामुळे कोंबड्याना मोठ्या प्रमाणावर मिळते मागणी.
* या गावरान कोंबडी पालन कृषीपुरक उद्योगातून कमी खर्चात मिळत आहे अधिक उत्पन्न.

-------------------------------------------------
लेखक : आनंद ढोणे पाटील (कृषी पत्रकार)
----------------------------------------------
हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर तालूक्यात रेऊलगाव नावाचे एक अडिच ते तिन हजार लोकसंख्येचं गांव आहे.वसमत-झिरोफाटा मेनरोडवरील हयातनगर फाट्यापासून पूढे रांजोना पाटी पासून उत्तरेस ४ किमी  दूर अंतरावर ते वसलेले आहे.गावाजवळूनच येलदरी धरणाचा मोठा कालवा या शिवरातून गेलेला आसून येथील शिवारास ह्या कालव्याचे पाणी धरण भरेल त्या वर्षाच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामाच्या बागायती पिकांना मिळते.पण,गत चार वर्ष झाले पावसाअभावी धरण भरतच नसल्याने कालवा कोरठाक आहे.रेऊलगाव शिवारातील जमीन ही काळीची पिकावू आहे.गावाजवळच दक्षिण दिशेला एक पुर्व-पश्चिम दिशेला नदी आहे.रांजोना-रेऊलगाव शिव सिमेलगत शेत शिवारात एक प्रसिद्ध महादेव मंदिर आहे.गावातील सर्व शेतकरी पाच वर्षाखाली विहीर,बोअर आणि कालव्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर केळी व ऊसाची पिके घेत होते.परंतु,अलिकडच्या काळात सरासरी पेक्षा पाऊस अतिशय कमी पडत असल्यामुळे अपोपच केळीचे क्षेत्र पूर्णता:कमी झाले तर ऊस पिक केवळ पंचवीस टक्क्यावर येवून केळी ऊसाच्या क्षेत्राची जागा आता सोयाबीन,कापूस,हळद,तुर,मुग,उडिद,ज्वारी,हरबरा या पिकांनी व्यापले आहे.गावातील काही जिगरबाज शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून परसात व शेतात कोंबडीपालन व शेळीपालन व्यवसाय करीत आहेत.याच गावात प्रकाश संभाजी फेगडे हे प्रयोगशील युवा शेतकरी राहतात.त्यांना केवळ ४ एकरच जमीन ही गावापासून दक्षिण दिशेकडे असणा-या कँनाल किना-यावर वसलेल्या रूखीवाडा वस्तीकडे जाणा-या मधल्या रस्त्यावर अर्धा किमी अंतरावर आहे.याच शेतात फेगडेंनी "कृष्णा पोल्ट्रीज अँड सर्विस" या नावाने २००४ पासून गावरान कोंबडी पालन व्यवसाय चालू करून शेतीला पूरक धंद्याची जोड देवून त्या उत्पादनातून आर्थिक उन्नती साधली आहे.

प्रकाश फेगडे हे १२ वी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून साधारणता: २००२ ला आपल्या शेतीत वडिलांना मदत करू लागले.त्यांच्या कुटूंबाक आई वडिल,पत्नी व दोन मुले एक मुलगी असी कुटूंब संख्या असून तिनही शालेय शिक्षण घेत आहेत.त्या काळी ते आपल्या शेतात केळी,ऊस,कापूस ही बागायती पिके घेत होते.पिकांना पाणी  देण्यासाठी शेतात एक सामाईक विहीर दोन बोअरवेल आहेत.काही दिवसानंतर कालांतराने पर्जन्यमान कमी झाल्याने धरणाचे पाणी कालव्याला बारमाही पिकासाठी येत नसल्यामुळे केळी हे जास्त पैसा देणारे पिक कमी करून त्यांनी हळद कापसाचा पेरा वाढवला.ही पिके घेत घेतच त्यांनी आसपासच्या परिसरात परसबाग आणि शेतात  गाय बैल पशूंच्या गोठ्या जवळ ५०-१०० देशी गावरान कोंबडी पालन व्यवसाय पाहून ते प्रेरीत होवून आपण ही या पेक्षाही अधिक जनावरांच्या गोठ्याच्या कोप-यात कोंबड्या पाळू शकतोत, हा विचार त्यांच्या डोक्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या जनावरे बांधण्याच्या झोपडीच्या गोठ्याच्या कोप-याला १० बाय १० अकाराचे शेड तयार करून त्यामध्ये सोयाबीनचे थोडे गुळी टाकून सन २००४ ला औरंगाबाद जिल्ह्यातून गावरान हँचरीजवरून देशी गावरान कोंबड्यांचे १०० एकदिवसीय पिल्ले प्रति ९ रू या प्रमाणे एकूण ९०० रूपये व वाहतूक खर्च प्रति १ रु म्हणजे एकूण १ हजार रु खर्चून कोंबडी पालन व्यवसाय चालू केला.सुरूवातीला त्या पिलांना तांदूळ व ज्वारीची चुरी आणि काही प्रमाणात कंपनीचे तयार खाद्य खावू घालून तहाने च्या योग्यवेळी पाणी ठेवण्यात आले.कोणतेही लसिकरण मात्र केले नाही.या नंतर तेथून पुढे तिन महिन्याला नर सवा किलो तर मादी कोंबडी ८०० ग्राम वजनाची झाल्यानंतर ते पक्षी त्यांनी स्थानीक वसमत बाजार व मांसाहार करणा-या व्यक्तींना खाण्यासाठी नर कोंबडा ५०० रु तर मादी कोंबडी ३०० रु प्रति नग प्रमाणे विक्री केले.१०० पक्ष्यापैकी २० मरण पावले उर्वरित ८० पैकी ४० नर तर ४० मादी कोंबड्या निघाल्या.४० नर कोंबडे विक्रीतून २० हजार रु आणि ४० मादी कोंबड्या विक्रीतून १२ हजार असे एकूण ३२ हजार रु उत्पादनातून मिळाले.पहिल्या १०० पक्षी संगोपन प्रयोगात २० कोंबड्या सखोल माहीती अभावी मरण पावल्या तर बाकीच्या ८० पक्षापासून सर्वमिळून ५ हजार रु संगोपन खर्च वजा जाता २७ हजार रु निव्वळ नफा मिळाल्याने या व्यवसाया विषयी आत्मविश्वास निर्माण झाला.
कोंबडी पक्षी पालन संख्येत केली वाढ 
--------------------------------------
पहिल्या १०० लाटच्या कोंबड्यांचे संगोपन करताना आलेला अनूभव आणि आर्थिक उत्पन्न उरण्याच्या आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी आणखी ५०० गावरान एकदिवसीय कोंबड्यांची पिल्ले आणून त्यांचे संगोपन केले.या साठी गोठ्यातच २० बाय ३० फूट अकाराचे शेड वाढवले.त्याकरीता बाजूला लोखंडी मुर्गा जाळी आणुन बसवली.जाळीवर तरटांचे पडदे केले.आणि या साध्या पध्दतीच्या शेडमध्ये ५०० पक्षांचे यशस्वीपणे संगोपन केले.खाद्य व पाणीलदेण्यासाठी औरंगाबाद येथीलच गावरान कोंबडी हँचरीज वाल्याकडून सुप्रीम कंपनीचे ड्रींकर व फिडर हे १०० पक्षात १ या प्रमाणे ड्रींकर ५ तर खाद्यासाठी ५ फिडर १०० रू एक प्रमाणे एकूण १० हे १ हजार रूपयास खरेदी केले.५०० पिल्ले १० रु प्रति प्रमाणे ५ हजार रुपये लागले.आणि पहिल्या दिवसी पिल्लांना गुळाचे पाणी त्यानंतर निअोड्राक्स टानीक,१ ते १० दिवस ट्रेसिल टानीक दिले.हे चालू असतानाच ७ व्या दिवशी डोळ्यातून लासोटा लस देण्यात आली.तसेच कंपनीचे स्टाटर,प्रि स्टाटर ही खाद्य २४ तास फिडरमध्ये भरुन राहील या पध्दतीने ठेवण्यात आले.पाणीही ड्रींकरमध्ये भरलेलेच ठेवण्यात आले.यानंतर १० व्या दिवसी बि किलर यंत्राने पक्षांच्या चोंच कट करण्यात आल्या.ही चोंच कटींग मशीन त्यांनी २६०० रुपयाला खरेदी करून आणली आहे.अशा पध्दतीने संगोपन करताना योग्य त्या वेळी शेडच्या बाजुची पडदे खालीवर सोडण्यात आली.पक्षी तिन महिन्यानंतर १ किलो वजनाच्यावर झाल्यानंतर त्यांची विक्री ही नांदेड,हिंगोली,परभणी,वसमत येथील स्थानीक बाजार व बुलडाणा जिल्ह्यातील देवुळगाव राजा येथील व्यापा-यांना एकठोक १२० रु किलोवजनावर करण्यात आले.या मध्ये १ पक्षाचे संगोपन करण्यासाठी एकूण ७० रु खर्च या प्रमाणे ५०० पक्षाच्या पालनास एकुण ३५ हजार रु खर्च आला तर पक्षी विक्रीतून २ टक्के पक्षी मृतक घट धरता ५५ हजार रु मिळाले,यातून खर्च वजा जाता २० हजार रु निव्वळ आर्थिक उत्पन्न मिळाले.या प्रमाणे लागोपाठ दिड महिन्यात एक बँच तर तिन महिन्यात दोन बँच काढत गेले.म्हणजे १ लाट ५०० पिल्लांची आणल्यानंतर ती दिड महिन्याची झाली की ती थोडी मोठी झाली की ते पक्षी त्या जागेवरून दुस-या ठिकाणी सोडल्या जावून त्या जागेत दुसरी ५०० छोटी पिल्ले दिड महिन्यालाच आणून सोडायची म्हणजे कोंबडी पालनात गँप न ठेवता सातत्याने पक्षी संगोपन वाढवत गेले.शिवाय या नंतर पून्हा २००५ ला २० बाय २० आकार फुटाचे सिमेट बेळ्या रोवून वरती लाकडे बांधून त्यावर ऊसाची वाळलेली पाचट अच्छादून चोहू बाजूने लोखंडी मुर्गा जाळी बसवून मध्ये उब देण्यासाठी विजेचे बल्ब व १० ड्रींकर,१० फिडर बसवून साध्या पध्दतीने शेड तयार करून घेवून त्यात पून्हा ५०० गावरान कोंबड्यांची पिल्ले आणून वरील पध्दतीने संगोपन करण्यात आले.या लाटसाठी त्यांना एकूण ४५ हजार रु खर्च आला तर २२ हजाराच्या आसपास नफा मिळाला.या प्रमाणे ते गत २००४ पासून यशस्वीरीत्या पोल्ट्री फार्म व्यवसाय सातत्याने चालवत आहेत.त्यातून खर्च जाता नफाही ३० टक्क्या पर्यंत मिळवीत आहेत.
२०१६-१७ या वर्षापासून ३ तिन हजार पक्षांचे होत आहे संगोपन 

> २०१६ ते २०१८ या चालू आर्थिक वर्षापासून त्यांनी आता ५०० पक्षावरून ३ हजार पक्षी संगोपनावर वाढ केली आहे.त्याकरीता २० बाय १०० फूट आकाराचे पूर्व पश्चिम दिशेवर २ हजार पक्षी क्षमतेचे सिमेंट्या बेळ्या रोवून त्यावर लाकडी आडवण बांधून ताटवे टाकून 
त्याच्यावर ऊसाची पाचट टाकून बाजूने लोखंडी मुर्गा जाळी बसवून मोठे शेड तयार करून घेतले आहे.या करीता त्यांना ९० हजार रु खर्च लागला आहे.हा पोल्ट्री व्यवसाय उभारणीसाठी सर्व शेड बांधकाम,पिल्ले,ड्रिंकर व फिडर भांडी,खाद्य,विद्यूत बल्ब या सह आदी साहित्य खरेदीकरीता खर्चाची तरतूद ही त्यांनी कोंबड्या मागील विक्रीच्या उत्पन्नातून व स्वता:काही रक्कम टाकून केली असून कोणतेही कर्ज वगैरेही घेतले नाही की पोल्ट्री व्यवसायाचे प्रशिक्षण ही न घेता हा उद्योग चालवत आहेत.सध्या चालू वर्षि त्यांच्याकडे ३ हजार देशी गावरान कोंबडी पक्षांचे पालन होत आहे.या पासून त्यांना खर्च जाता १ लाख रुपये आर्थिक उत्पन्न मिळाले असून पुढे ते चालूच आहे.आजतागायत ह्या पोल्ट्री व्यवसायातून त्यांनी उत्पादन खर्च वगळता दोन ते अडिच लाख रु निव्वळ नफा मिळविला असून पुढे यात वाढ होत जाणार असल्याचे ते सांगतात.या व्यवसाय वृद्धि साठी त्यांना परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील डॉ धुमाळ,पशूसंवर्धन अधिकारी डॉ आठवले,डॉ सुर्यवंशी,डॉ झडते यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
संपर्क,
प्रकाश संभाजी फेगडे
कृष्ण पोल्ट्रीज अँड सर्विस,रेऊलगाव,ता वसमत,जि हिंगोली,मो ९८८१३०२२४३,
९९२१४०४५४४ 
प्रतिक्रिया
-------------------
मी हा गावरान पोल्ट्री व्यवसाय जिद्दीने,कष्टाने व या विषयीच्या व्यवसायाचे कोणतेही सखोल असे प्रशिक्षण आणि कोणतीही शासकीय योजना न व कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता मागील शेतीचे उत्पन्न व कोंबड्यांच्या विक्रीच्या निव्वळ पैशातून सातत्याने गत २००४ सालापासून चालवत आहे.हा शेती पुरक उद्योग करताना खुप अडचणीही आल्या सुरूवातीला माहीती अभावी खर्च करून मोठे केलेले पक्षी मृत्यु पावल्याने मोठे आर्थिक नुकसानही सोसावे लागले.जोखीम पत्करून चालू केलेल्या ह्या व्यवसायात आर्थिक खोट येवूनही हरून जाता ध्येय आणि जिद्द पणाला लावीत पोल्ट्री पालन उद्योग बंद पडू दिला नाही.याचा माझा मलाच अभिमान वाटतो.शेतक-यासाठी हा कोंबडीपालन व्यवसाय अतिशय कमि खर्चात अधिक उत्पन्न देणारा असल्यामुळे प्रत्येकाने तो केलाच पाहीजे.
प्रकाश संभाजी फेगडे,रेऊलगाव जि हिंगोली.अहमदनगर 
जलयुक्त शिवार अभियानातील सन 2016-17 मधील कामांचे जिओ टॅगिंग करण्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित यंत्रणांना दिले. त्याचबरोबर, सन 2017-18 मधील उर्वरित कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करा, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे.
       येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज ( मंगळवार ) जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  सुधाकर भोर,  उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे,  सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी कीर्ति जमदाडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
          यावेळी जिल्हाधिकारी श्री.  द्विवेदी यांनी तालुकानिहाय जलयुक्त शिवार अभियानातील विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला.  काही ठिकाणी कामे पूर्ण होऊनही जिओ टॅगिंग झाले नसल्याने राज्य पातळीवर त्याची दखल घेतली जात नाही.  ज्या यंत्रणांनी संबंधित कामे केली असतील, त्या यंत्रणांचीच जिओ टॅगिंगची जबाबदारी आहे. ते झाल्यानंतरच काम केल्यासंदर्भातील देयके अदा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिओ टॅंगिगची कामे गांभीर्याने घ्या अन्यथा ती कामांसंदर्भातील अनियमितता मानण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
          सध्या जलयुक्त शिवार अभियानातील सन 2017-18 मधील कामे पूर्ण करण्यासाठी केवळ दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर ही कामे पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे सर्व यंत्रणांनी याबाबत कामे या वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनेच कार्यवाही करावी,.  याशिवाय, सन 2018-19 मध्ये निवडण्यात आलेल्या गावांचे आराखडे तयार करुनही त्याठिकाणी आवश्यक मंजुरी घेऊन कामे सुरु कऱण्यात यावीत, असे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
          जिओ टॅंगिगसंदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ दुरुस्त करुन घ्या. त्यासाठी पाठपुरावा करा. मात्र, यापुढे अन्य कोणतेही कारण चालणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दखल घ्यावी, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले.
          याशिवाय, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत ऑनलाईन आलेले अर्ज तसेच ऑफलाईन सादर झालेले अर्ज तात्काळ कार्यवाही करुन निकाली काढण्याची सूचना त्यांनी दिल्या. या योजनेतील मंजूर कामे तात्काळ सुरु झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


अहमदनगर 
मुंबई येथे आझाद मैदानावर एकच मिशन जुनी पेन्शन या राज्यस्तरीय धरणे आंदोलनात नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे माध्यमिक शिक्षक संघ व टी.डी.एफ. चे शिक्षकप्रिय उमेदवार आप्पासाहेब शिंदे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व घणाघाती शैलीत राज्याच्या शिक्षण व वित्त विभागावर हल्लाबोल केला.
सन 2005 च्या शासन निर्णयानुसार कर्मचार्‍यांना जूनी पेंशन योजना शासनाने बंद केली आहे. त्यामुळे लाखो कर्मचार्‍यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हक्काची जुनी पेन्शन मिळाली नाही, तर महाराष्ट्राभरातून विविध संघटनांसोबत शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा आप्पासाहेब शिंदे यांनी दिला. उपस्थित हजारो शिक्षकांनी यावेळी घोषणा व टाळ्यांच्या कडकटात त्यांना उत्स्फुर्तपणे दाद दिली.
आप्पासाहेब शिंदे यांचे वडील शिक्षक आमदार कै.रा. ह. शिंदे यांनी सन 1982 ते 87 या कालखंडात शिक्षक आमदारांच्या मदतीने आंदोलन करून शिक्षकांचे पगार बँकेतून व्हावे म्हणून प्रयत्न केले व सेवेला शाश्‍वती मिळवून दिली होती. शिक्षक प्रश्‍नाशी बांधिलकी ठेवत शिक्षक प्रश्‍नाची सोडवणूक करण्याची कै.रा.ह. शिंदेची हातोटी व त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर मार्गक्रमण करत गेल्या 22 वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून शिक्षक प्रश्‍नासाठी मी अविरत झटत असून शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी करत आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी विधान परिषदेची संधी मला मिळाल्यास कर्मचार्‍यांच्या जून्या पेंन्शनसाठी व शिक्षक प्रश्‍नासाठी सभागृहात लढणार असून कर्मचार्‍यांना जो पर्यंत जूनी पेंशन मिळणार नाही तोपर्यंत मीही पेंशन स्वीकारणार नसल्याची घोषणा करून आंदोलनास पाठींबा दिला. आप्पासाहेबांनी यावेळी स्टेजवर न बसता आंदोलन करणार्‍या शिक्षकांमध्येच बसुन सर्वसामान्य शिक्षकाचे प्रतिनिधित्व  केले. 
यावेळी अ.नगर जिल्हा माध्य.शिक्षक संघाचे मा.अध्यक्ष एम.एस. लगड यांनीही मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे अमरावतीच्या संगिताताई शिंदे व श्रीगोंद्याचे तुषार शिंदे यांनी राज्यस्तरीय शिक्षक संघर्ष समितीचे सचिव म्हणुन या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी जिल्हयातील सुदाम दळवी, सुनिल दानवे, प्रशांत होन, रामलाल कर्डिले, सोपानराव काळे, राजेंद्र लोहकरे, सावता गायकवाड, दिपक झाडे, सुनिल भोर, राजेंद्र कळसकर, राजेंद्र खेडकर, कानवडे सर, कोकरे सर, पैठण पगार व जिल्ह्यातील सुमारे चारशे शिक्षकांसह राज्यातील हजारो शिक्षक उपस्थित होते.


अहमदनगर 
कामे न करता वारंवार निवडून येणारे लोकप्रतिनिधींना खुर्चीवरुन पायउतार करण्यासाठी पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने महाराष्ट्राचा महामंत्र भाकरी फिरवा 2019 ची घोषणा करण्यात आली असून, या घोषणेचे पुजन पंढरपुरला महाराष्ट्राचे कुलदैवत पांडूरंगाच्या चरणी केले जाणार आहे. तर पांडूरंगाला साकडे घालून महाराष्ट्रातील जनतेला कामे करणारे चारित्र्यवान लोकप्रतिनिधी निवडून देण्याची सद्बुध्दी देण्यासाठी प्रार्थना केली जाणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.
अनेक लोकसभा व विधानसभा मतदार संघात तेच ते लोकप्रतिनिधी वारंवार निवडून येत आहे. खुर्ची मिळाल्यानंतर यांना अहंम व गर्व निर्माण झाला असून, जनतेचे सेवक असून ते सर्व सामान्य जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक वर्ष लोकप्रतिनिधी राहून सुध्दा त्यांना मुलभुत सुविधा निर्माण करता आल्या नाहीत. जनेतेशी बांधिलकी सोडून गरिब दुबळ्यांचे शोषण त्यांच्याकडून होत असून, त्यांच्यामुळे सरांजमशाही उदयास आली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधींनी निर्माण केलेले साखर कारखाने ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनी सारखे जाचक ठरत आहे. लोकांना आपल्या दावणीला बांधण्याचा हा प्रकार आहे. आपल्यावर स्तुतीसुमने उधळणार्‍या लाभार्थी व कार्यकर्ते बनविण्याचे काम याच्या माध्यमातून केले जात आहे. नागरिकांनी मोठ्या अपेक्षांनी या लोकप्रतिनिंधींना निवडून दिले. त्यांनी मात्र आश्‍वासनांचे राजकारण करुन जनतेचा भ्रमनिराश केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप सरकारला अर्धांगवायू झाला आहे. लोककल्याणाची कामे करण्यात ते असमर्थ ठरले असून, एकमेकांच्या आरोप प्रत्यारोपात ते गुंतले आहे. स्वत:चेच भले करण्यात गुंतलेल्या मंत्रींना जनतेच्या प्रश्‍नांशी काहीही देणेघेणे राहिले नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  
तव्यावरील भाकरी फिरवली नाहीतर ती करपते व त्याचा उपयोग होत नाही. अशा पध्दतीने नेहमीच निवडून येणारे लोकप्रतिनिधी खुर्चीवरच चिटकून राहिल्याने काम न करता सत्तासुर झाले असल्याची प्रचिती सर्वांना येत आहे. तर मते विकणारे नागरिक स्वत: नरकयातना मागत आहे. भाकरी फिरवा या मंत्राने वारंवार निवडून देवून काम न करणार्‍या लोकप्रतिनिधींना पाय उतार करण्यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून परिवर्तनाची हाक देण्यात आलेली आहे. यासाठी अ‍ॅड.गवळी, कॉ.बाबा आरगडे, श्यामराव साबळे, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, दिगंबर साबळे, ज्ञानदेव काळे, प्रकाश थोरात, यमनाजी म्हस्के प्रयत्नशील आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget