DNA Live24 2015

विखे पाटील, आजोबा-पणजोबांच्या पुण्याईवर भरोसा नाय का..; अहमदनगर येथील सजग नागरिक मंचाचा डॉ. सुजय विखे यांना प्रश्नअहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर विखे पाटील घराण्याची राजकीय एक वेगळी छाप आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीतील तरुण डॉ. सुजय (दादा) विखे पाटील नगर लोकसभा मतदार संघातून निवडून येण्यासाठी तयारी करीत आहेत. त्यांच्याच पॉलिकल लाँचिंगसाठी नगर सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमाची व एकुणच विखे पाटील यांच्या राजकीय दिशेवर टिका करणारा ब्लॉग वाचा 'जसा आहे तसाच शब्दांत' फक्त 'कृषीरंग' या पोर्टलवर...

*डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा स्वतःच्या आई ,वडील ,आजोबा, पणजोबा यांच्या कार्यावर भरवसा नसल्यामुळे स्वतःच्या पॉलिटिकल लाँचिंगसाठी घ्यावी लागली अजय अतुल यांची मदत.*

गेली पन्नास वर्षे अहमदनगरच्या राजकारणावर प्रभुत्व असणाऱ्या विखे कुटुंबातील युवराजांना पॉलिटिकल लाँचिंग करावी लागणे हीच बाब विखे कुटुंबीयांसाठी लज्जास्पद आहे. सहकार सम्राट व संस्थानिक विखे कुटुंब मोठी गर्दी खेचू शकत नाही हे माहिती असल्यामुळेच   डॉक्टर सुजय विखे यांच्या लाँचिंगसाठी अजय अतुल व मंडळींची मदत घेण्यात आली . कार्यक्रमातील नियोजनशून्यतेचा फटका शहरातील अनेक प्रतिष्ठित व पत्रकार मित्रांना बसला .मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी व्हीव्हीआयपी पासेस देण्यात आले होते परंतु सदरील *प्रतिष्ठित पासधारकांना बाहेरच उभे राहावे लागले* त्यामुळे हि सर्व मंडळी डॉक्टर सुजय विखे यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले . सदरील कार्यक्रमासाठी शहरातील स्थानिक कार्यकर्ते व स्थानिक लोकांना सहभागी करण्यात आले नाही त्यामुळे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात नाराज झाली . *सदरील सांस्कृतिक महोत्सवात नगरमधील सांस्कृतिक चळवळीला कोणताही फायदा झाला नाही* नगरमधील सांस्कृतिक क्षेत्रातील कुणीही या कार्यक्रमात सहभागी नव्हते .सदरील वाडिया पार्क हे क्रीडा संकुल खेळासाठी आरक्षित असताना डॉक्टर सुजय विखे यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कसे दिले असा सवाल नगरकर जनता उपस्थित करत आहे . *सदर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय करण्यात आला* .उन्हाळ्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत असताना अशा प्रकारे  पाण्याचा अपव्यय केल्याने नगरकर जनता संतप्त सवाल उपस्थित करत आहे . *सदरील कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात सरकारी,पोलिस यंत्रणा कामात लावण्यात आली होती* .डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे कोणतेही सरकारी पद नसताना अशा प्रकारे सरकारी यंत्रणा राबवणे कितपत योग्य आहे ? महानगरपालिका निवडणुकीत निवडणूक काळात ज्याप्रमाणे इच्छुक उमेदवार स्वतःचे लॉंचिग करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेतात त्याच प्रमाणे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतःचा पॉलिटिकल लाँचिंगसाठी हा कार्यक्रम घेतला असून स्वतःची राजकीय दिवाळखोरी पदार्पणाआधीच त्यांनी लोकांसमोर आणली आहे.
आणि शेवटी नाचकाम करुन पितापुत्रांनी त्यावर कडीच केली
 .याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन व आरोग्य शिबिर घेऊन आपण नेमका कोणता विकास करणार असा प्रश्न नगरकर जनतेसमोर पडला आहे .

*जागरुक नागरीक मंच*👆🏿 अशा प्रकारा विषयी निषेधच व्यक्त करणे ऊचित समजते.

गेल्या कित्येक दिवसांपासून या शहराची व जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था याबाबत बोंबाबोंब झाली असताना.सातपुते सारखे भुरटे आरोपी 3 -3 महिने पोलिसाना सापडत नसताना.व मुख्य म्हणजे इतरही अतिक्रमणासारखे शहर बकालीकरणाच्या मोहिमांसाठी पोलिस फोर्स उपलब्ध होत नाही.सतत अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण हे प्रशासन पुढे करत असतं.़तर मग वारुळातून मुंग्या बाहेर याव्यात तसे काल शहर भर ,चौकाचौकात,प्रत्येक  पार्कीग जवळ एवढे प्रचंड पोलिस कोठुन प्रकट झाले?

मुख्य म्हणजे एका खाजगी कार्यक्रमाला...?
मग ते इतर शहर विकासा बाबत अावश्यक वेळेला इतक्या तातडीने कसे उपलब्ध होत नाहीत?
सगळच अनाकलनिय आहे.
पैसा आणि सत्ता याच्याच दावणीला ही नोकरशाही कशी घट्ट बांधली गेली आहे याच हे उत्तम उदाहरण आहे..
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget