DNA Live24 2015

सदाभाऊ तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिंग का नाही केले शेतक-याला आता काय देता सल्ले


परभणी : प्रतिनिधी
मुंबई येथे एका कार्यक्रमात म्हणे कृषिमंत्र्याने अकलेचे तारे तोडले .काय तर म्हणे शेतक-याने हमी भाव न मागता शेतीमालाचे मार्केटींग करावे .आहो मंञी महोदय ते आम्हाला शुध्दा कळते परंतु मार्केटिंग करायला बैलं,पशु धन जनावरे,संसार,हे तुम्ही येऊन संभाळा आमच्या शेतक-याचे आता  तेव्हडेच बाकी राहिले आहे.एवढे सल्ले देण्याची हौस आसेल तर मग तुम्ही देवकीनंदनचे मार्केटिग का केले नाही.कै गोपीनाथरा मुंडे नसते तर तुम्हाला आत्महत्या करावी लागली आसती .तुमच्या मागे आमच्या सारखे फाटके कार्यकर्ते होते म्हणून खेळ जमलाय. नाहीतर तुम्हीवनरीमन पाॅईटला फुटाने विकत बसला आसता.ते जाउद्या राज्यामध्ये एक हजार कोटिच्या वर पिकविमा घोटाळा झालेला आहे.त्याचेच मार्केटिंग आपनच केले होतं.जनाची नाहीत मनाची लाज बाळगा .पैसे कमवले म्हणजे माणूस मोठा होत नाही अक्कल लागते .तुम्ही तर शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून पद भूषविणारे राज्य मंत्री सदाशिव खोत यांनी राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव कसला मागताय , मार्केटिंग करा असा सल्ला देत आपला असली चेहरा दाखवून दिला. भाकर खायला नाही मग केक खा असेच सांगण्याचा हा प्रकार आहे. नकला करत नौटंकीबाज भाषण ठोकणारे आता आपल्या धन्याला खूष करण्यासाठी असे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य करत आहे. अरे तुम्हाला मंत्री पद मिळाले तर उपभोग घेत रहा मात्र उगाच शेतकऱ्यांना असे कमी लेखू नका  अजीर्ण होई पर्यंत खाल्ल्याने असा माजेलपणा येतो व ज्या गोरगरीब बळीराजाने तुम्हाला भरविले त्यांच्याच ताटात मुतायचा हा प्रकार आहे. जणाची नाही तर मनाची तर थोडीफार लाज ठेवा , इतके देखील माजू नका. तुमचा पुरा माज गावगाड्यातील शेतकरी उतरवतीलच मात्र किमान थोडीशी तर शिल्लक राहू द्या , इतके सुद्धा लाचार होऊ नका.हा एक मीञ म्हणून तुम्हाला माझा सल्ला आहे.तसे तुम्ही मैञीच्या लायकीचे नाहीत .ज्या ताटात खायचे तिथे घाण करायची ही आपली नेहमीचीच सवय आहे.राज्यात चालू वर्षांत 3000 हजार शेतक-यांनी आपली जिवन याञा संपवली आहे. तुरीचे वांधे हरबरा खरेदीचे वांधे तुम्ही माञ कंपन्या कडून ब-यापैकी माया पुंजी गोळा केलीय म्हणे.याद राखा असे सल्ले पुन्हा द्याल तर शेतकरी पायदळी तुडवल्याशिवाय राहानार नाही मीञ म्हणून सल्ला देतोय.
अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिकराव कदम यांनी राज्यमंत्री सदाभाऊ यांना फटकारले आहे.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget