DNA Live24 2015

कांद्याचे भाव वधारणार; विक्रीची घाई नको


अहमदनगर : प्रतिनिधी
मागणीपेक्षा विक्रीचा मारा जोरात असल्याने सध्या उन्हाळी कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचाच फायदा घेऊन गावोगावचे व्यापारी, आडते व दुकानदार यांनी कांदा खरेदी सुरू करून उत्पादक शेतकरी बांधवांत संभ्रम निर्माण केला आहे. मात्र, पुढील दीड-दोन महिन्यांत कांद्याचे भाव १५ रुपये किलोपर्यंत वाढणार असून विक्रीची घाई कोणीही करू नये असे जाणकार व्यापा-यांचे मत आहे.

सध्या कांद्याचे भाव सरासरी ७ रुपये किलोपर्यंत आले आहेत. नाफेडकडून खरेदी सुरू करण्यात येत आहे. तसेच अवकाळी पावसामुळे देशातील काही भागांतील कांदा व इतर शेतमाल सडत आहे. याचाच फायदा उठविण्यासाठी व्यापारी संभ्रम निर्माण करून शेतकरी बांधवांची दिशाभूल करीत आहेत. त्याला न भुलण्याचे आवाहन पणन मंडळाने केले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget