DNA Live24 2015
July 2018

पुणे :
सीताफळाचा हंगाम आता जोरात सुरू झाला असून पुण्यासह महाराष्ट्रभर या फळपिकाला चांगला भाव मिळत आहे. पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या या फळाला सरासरी ७० रुपये किलोचा भाव मिळत असल्याची माहिती बाजार समितीच्या प्रशासनाने दिली.

सध्या प्रतिदिन सुमारे अडीच टन सीताफळाची बाजारात आवक होत आहे. नियमित आवक होणाऱ्या बाळानगर व इतर जातींच्या सीताफळाला सध्या १० ते ८० रुपयांचा भाव मिळत आहे. तर, गोल्डन जातीच्या रुपेरी सीताफळास याच बाजारात १५ ते ३० रुपयांचा अतिरिक्त भाव मिळत आहे. गोल्डन (custard apple nmk १)  यास सध्या २५ ते ११० रुपये प्रतिकिलोचं दमदार भाव मिळत आहे. त्यामुळे सध्या सीताफळ उत्पादक गोल्डन दिवसांचा अनुभव घेत आहेत.

कष्ट व चिकाटीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कोरडवाहू भागातील शेतकरी डाळिंबाच्या बागा फुलवित आहेत. सोलापूरसह नगर व नाशिक जिल्ह्यातल्या आवर्षणप्रवण भागाला याच फळपिकाने नवी उमेद दाखविली आहे. मात्र, तेल्या व मर रोगासह बुरशीजन्य किड-रोगांमुळे या भागातील शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. हेच संकट दूर करून नफ्यातली शेती करण्याचा मुलमंत्र बीव्हीजी लाईफ सायन्स कंपनीने शेतकर्यांना दिला आहे. जांभूड-माळेवाडी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील डॉ. आनंद पोखरे या प्रयोगशील शेतकऱ्यानेही याच कंपनीच्या मदतीने आपल्या दीड एकर डाळिंबाच्या बागेत बीव्हीजी कंपनीची औषधे वापरून 13 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

डॉ. पोखरे या अनुभवाबद्दल सांगतात की, बीव्हीजी कंपनीच्या उन्नती अभियानाबद्दलची माहिती मिळाल्यानंतर आम्ही डाळिंबासाठी अॅग्रो सेफ, अॅग्रो मॅजिक व अॅग्रो न्युट्री आदींचा वापर केला. जैविक, रासायनिक व सेंद्रिय घटकांचा समतोल वापर केल्याने एक्स्पोर्ट क्वालिटी डाळिंबाचे उत्पादन घेणे आम्हाला शक्य झाले. बीव्हीजी कंपनीचे चेअरमन श्री. हणमंतराव गायकवाड साहेबांच्या विविध ठिकाणी झालेल्या मुलाखती व कार्यक्रम टीव्हीवर आम्ही पाहत होतो. त्यातूनच या कंपनीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार रुजला. कंपनीने उत्पादन-खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठीची चळवळ हाती घेतली आहे. शेतकरी हिताच्या उद्देशाने सुरू केलेली ही चळवळ नक्कीच महत्त्वाची आहे.

आतापर्यंतच्या चारही बहारांसाठी बीव्हीजीची उत्पादने वापरली असल्याचे डॉ. पोखरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, यामुळे काहीअंशी खर्च वाढतो. मात्र, उत्पादनातही भरघोस वाढ होते. तसेच चमकदार व चांगल्या दर्जाची फळे मिळत असल्याने हा खर्च भरून निघण्यासह शेतकर्यांचा मोठा आर्थिक फायदा होतो. मला मागच्या बहारामध्ये सहाशे झाडांचे सुमारे 16 टनांचे उत्पादन मिळाले. तसेच निर्यातक्षम मालाच्या उत्पादनामुळे भाव चांगला मिळाला. 90 ते 120 रुपये किलोचा भाव मिळाल्याने एकुण खर्च वजा जाता दीड एकरांतून 13 लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले. सर्व किड-रोगांवर गुणकारी असलेल्या अॅग्रो सेफ (सर्वसमावेशक हर्बल पीक संरक्षक) औषधासह अॅग्रो मॅजिक (सर्वसमावेशक हर्बल पीक संवर्धक) व अॅग्रो न्युट्री (सर्वसमावेशक सुक्ष्म पोषक घटकयुक्त) यांच्या दर पंधरा दिवसांनी 3 ते 4 फवारण्या घेऊनच आम्ही बागेला ताणावर (विश्रांतीसाठी) सोडले होते. त्यानंतरही फळे तोडणीला येईपर्यंत नियमितपणे सात दिवसांनी आम्ही या तीन हर्बल नॅनो तंत्रज्ञानयुक्त औषधांची फवारणी केली. त्याचा आम्हाला मोठा फायदा होत आहे. या तिन्ही औषधांचा काळजीपूर्वक वापर केल्यास पाच वर्षांच्या बागेतून एकरी 20 टनांपर्यंत निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन सहजशक्य आहे.नाशिक :
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्याला पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. यापूर्वीही असेच धक्के या तालुक्यात बसलेले आहेत. आजच्या भूकंपाची निंद्य दोन रिश्टर स्केल झाल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

सौम्य असले तरीही हे भूकंपाचे धक्के असल्याने गावकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. याबद्दल उलटसुलट चर्चेला उधाणाही आले आहे. मात्र, प्रशासनाने यानिमित्ताने शांत राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.पुणे :
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर केलेल्या दूध संकलन बंद आंदोलनामुळे मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांतील ग्राहकांची कोंडी झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पोलीस बळाचा वापर करण्याला प्राधान्य दिले आहे.

त्यानुसार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री सुमारे ५ लाख लिटर क्षमतेच्या टँकरना पोलीस संरक्षणात शहरात आणण्यात आले. सुमारे ५० टँकरमधून हे दूध शहरात आल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. नगर, श्रीगोंदा, बारामती, दौंड, सातारा, सोलापूर आदी ठिकाणांहून पुणे शहरात दुधाचा पुरवठा होत आहे.नागपूर :
दुधासाठी दिले जाणारे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात थेट जमा करावेत. तसेच यासाठी असंवेदनशील धोरण सोडून शेतकरी हिताचे धोरण राबवून दुग्धोत्पादकांना दिलासा देण्याचे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

विधान भवनात बोलताना ते म्हणाले की, सरकारने गेल्या वर्षी गायीच्या दुधाला 27 रुपये व म्हशीच्या दुधाला 36 रुपये प्रतिलिटर भाव देण्याचे जाहीर करूनही शेतकाऱ्याला प्रत्यक्ष प्रतिलिटर 16 ते 17 रुपयेच मिळत आहेत. तसेच राज्य सरकारने दूध भुकटीला किलोमागे जाहीर केलेले ५० रुपयांचे अनुदान पुरेसे नाही. ते अनुदान दुप्पट करून सहा महिन्यांसाठी द्यावे. राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांप्रती सरकार असंवेदनशील आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दुधाचा धंदा मोडकळीस आला आहे. त्यामुळे आता सरकारने याची भरपाई करून द्यावी.


मुंबई :
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले दूध बंद आंदोलन मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. चर्चेतून मार्ग निघण्याची शक्यता मावळल्याने आता शेजारच्या गुजरात राज्यासह रेल्वे मंत्रालयाची मदत राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे उद्या दूध कोंडी होणार की सरकार हे आंदोलन नेहमीच्या थाटात चिरडणार, याचा सोक्षमोक्ष लागणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आंदोलकांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक चर्चेस प्रतिसाद देत नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच सरकार याप्रकरणी कितपत गंभीर आहे, असा प्रश्न आंदोलक विचारात आहेत. त्यातच गुजरासह इतर राज्यातील दूध मुंबईत आणून हे आंदोलन निष्प्रभ ठरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयानेही सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे. पॅसेंजर ट्रेनमधून मुंबईत गुजराती दूध आणण्यासाठीच्या हालचालीही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मागच्या शेतकरी आंदोलनांप्रमाणे हे दूध बंद आंदोलन मोडीत काढून सरकार मुंबईला दिलासा देणार असल्याचा दावा केला जात आहे. तर, मुंबईची दूधकोंडी करण्यावर आक्रमक भूमिका घेण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर केले आहे. एकूणच दिवसभरात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


कोल्हापूर / पुणे :
शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाचा परिणाम राज्यभरात दिसला आहे. नियमित दूध संकलनाच्या फक्त ३० टक्के दुधाचे संकलन सध्या होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. एकूणच दुधाचे भाव कमी झाल्याने राज्यातील दुग्धोत्पादक शेतकरी सरकारवर नाराज असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

राज्यभर या दूध बंद आंदोलनाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळेच सरकारने हा 'स्वाभिमानी'प्रणीत संप मोडीत काढण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे आरोप संघटनेकडून केले जात आहेत. मात्र, तरीही कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यासंह मराठवाडा आणि विदर्भातही शेतकरी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण दूध संकलनावर दुष्परिणाम झाला आहे. राज्यात सरासरी १.३० कोटी लिटर्स दुधाचे संकलन होते. तेच सध्या फक्त ४० लाखांवर आल्याचा दावा संघटनेने केला आहे.


बुलडाणा :
जिल्ह्यातील कोथळी गावातील दूध उत्पादकांनी कुत्र्यांना दूध पाजून अभिनव आंदोलन करीत केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मनोहर पाटील यांनी याबद्दल सांगितले की, आंदोलनाला राज्यभरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. बुलडाणा जिल्हा पोलिस पाटिल संघटनेचाही आंदोलनाला पाठिंबा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने आमची दिशाभूल केली आहे. त्यामुळेच आम्ही आमचे मोलमाघाचे दूध कुत्र्यांच्या तोंडी घालून याचा जाहीर निषेध केला आहे. या गावाच्या आंदोलनाची क्लिप सोशल मीडियावर जोरात फिरत आहे.

उस्मानाबाद :
शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढवण्यासह निरोगी भारताच्या चळवळीचा ध्यास घेऊन बिव्हीजी लाईफ सायन्स कंपनी शेतीच्या क्षेत्रात कार्यरत आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य बदलावं हेच सध्याचे ध्येय आहे. आजवर उद्योजक म्हणून नाव झालंय. पण आता या टप्यावर शेतकऱ्यांसाठी काम करावेसे वाटतेय म्हणून पळतोय. त्यासाठी शेतकऱ्यांनीही साथ द्यावी, असे आवाहन बिव्हीजी कंपनीचे अध्यक्ष श्री. हणमंतराव गायकवाड यांनी केले.

उस्मानाबाद जिल्हा परिषद व तेरणा कृषी प्रतिष्ठान आयोजित 'शेतीची पुढील दिशा' या विषयावर आयोजित परिसंवादात श्री. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पाणी व माती कशी अनं कुठे वापरायची याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले पाहिजे. माती परीक्षण, पाणी परीक्षण केल्याशिवाय शेतीत क्रांती होणार नाही. या दोन्ही घटकांच्या कार्यक्षम वापरामध्ये शेतकऱ्यांची उन्नती दडली आहे.

माजी मंत्री व आमदार राणाजगजितसिंह पाटील (राणा दादा), कृषिभूषण शहाजी गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, एनसाई उद्योग समूहाचे संस्थापक बी. बी. ठोंबरे आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. महिला शेतकरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

डाळिंब पिकाखालील क्षेत्र राज्यभरात वाढत आहे. अवर्षणप्रवण दुष्काळी पट्ट्यातील लाखो शेतकऱ्यांना या फळपिकाने तारले आहे. मात्र, कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे मधमाश्यांची संख्या घटल्याने आता डाळिंबाच्या फळांची सेटिंग न होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. यावर मात करण्यासाठी बीव्हीजी अॅग्रो सेफ आणि अॅग्रो मॅजिक उपयोगी ठरत असल्याचा अनुभव गणोरे (ता. अकोले, जि. अहमदनगर) गावातील प्रयोगशील शेतकरी श्री. संतोष आंब्रे यांनी घेतला आहे. चांगली सेटिंग झाल्याने मागील दोन बहारांच्या तुलनेत फळांचे सुमारे ३५-४० टक्के जास्त उत्पादन आंब्रे यांना मिळाले आहे.

बीव्हीजी कंपनीचे चेअरमन श्री. हणमंतराव गायकवाड यांचे सोशल मीडियावर शेअर झालेले व्हिडीओ पाहून आंब्रे यांना या नॅनो टेक्नॉलॉजी आधारित नव्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली होती. तसेच बीव्हीजी उन्नती अभियानांतर्गत श्री. गणेश लांडगे यांनी आंब्रे यांना अॅग्रो सेफ व अॅग्रो मॅजिक याबद्दल माहिती दिली. त्यामुळे त्यांनी मोठ्या विश्वासाने हे दोन्ही औषधे वापरून तिसरा बहार धरण्याचे नियोजन केले. त्याबद्दल माहिती देताना आंग्रे म्हणाले की, यापूर्वीचे दोन्ही बहार फुलांची गळ झाल्याने व मधमाशीअभावी तितकेसे यशस्वी ठरले नव्हते. रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे मधमाशी बागेत येत नव्हती. मात्र, अॅग्रो सेफ व अॅग्रो मॅजिक यांच्या फवारणीनंतर लगेचच मधमाश्या बागेत घोंगावताना दिसल्या. तसेच फुलांची गळ कमी झाली. याचाच फायदा होऊन झाडांना १५०-२०० मादी कळ्यांची सेटिंग झाली. ५०० झाडांतून यापूर्वी २० टन फळांचे उत्पादन झाले होते. बीव्हीजी कंपनीच्या विषमुक्त औषधांमुळे यातच सुमारे ३५-४० टक्के वाढ अपेक्षित आहे. तिसऱ्या बहरामध्ये ५०० झाडांतून ३५ टन उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.

आंग्रे यांनी सांगितले की, अॅग्रो मॅजिक या औषधामुळे झाडाची चकाकी वाढून फुलगळ कमी झाली. परिणामी सेटिंग चांगली होण्यासाठी मदत झाली. मधमाश्यांनी आपले काम उत्तम केल्याने तिसरा बहार यशस्वी झाला याचा आनंद आहे. अॅग्रो सेफ हे सर्व पिकांवर आणि सर्व प्रकारच्या कीड-रोगांवर गुणकारी असे बहुगुणी औषध आहे. यामुळे बुरशीच्या नियंत्रणासह पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स आदींचेही नियंत्रण झाले. प्रत्येक सात दिवसांनी अॅग्रो सेफ व अॅग्रो मॅजिक यांच्या फवारण्या घेतल्याने डाळिंबाच्या सेटिंगसाठी मोठा फायदा होतो. विषमुक्त शेतमालाच्या निर्मितीसाठी बीव्हीजी उन्नती अभियानात शेतकऱ्यांनी सहभागी होऊन कमी उत्पादन खर्चात दर्जेदार शेतमाल निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.


कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन नफ्याची शेती करता येते. याचाच प्रत्यय दाखवून दिला आहे सोळशी (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील श्री. जालिंदर सोळस्कर यांनी. ऐन थंडीत दोडक्यासारख्या वेलवर्गीय पिकाची लागवड करून फक्त चार महिन्यांत सोळस्कर यांनी एका एकरात 8 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. बीव्हीजी कंपनीच्या अ‍ॅग्रो मॅजिक आणि अ‍ॅग्रो सेफ या औषधांच्या नियमित फवारणीमुळे दर्जेदार दोडक्याचे उत्पादन सोळस्कर यांना मिळाले आहे.


दोडका पिकाच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती देताना सोळस्कर यांनी सांगितले की, आमच्या शेतात पिकविलेल्या या गुणवत्तापूर्ण दोडक्याची पुण्या-मुंबईतील रिलायन्स आणि इतर कंपन्यांच्या मॉलमध्ये विक्री झाली. तसेच टांझानिया देशातील कृषी सल्लागार मंडळानेही आमच्या शेतावर भेट देऊन बीव्हीजी उन्नती अभियानाचे कौतुक केले. बीव्हीजी कंपनीचे चेअरमन श्री. हणमंतराव गायकवाड यांनी उत्पादन-खर्च कमी करून विषमुक्त शेतीव्दारे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी बीव्हीजी उन्नती अभियान सुरू केले आहे. याच अभियानात सहभागी होऊन नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित अ‍ॅग्रो मॅजिक आणि अ‍ॅग्रो सेफ या दोन्ही औषधांच्या फवारणीमुळे एका एकरात दोडक्यासारख्या वेलवर्गीय भाजीपाला पिकात ऐन थंडीत 8 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न आम्हाला मिळाले. बीव्हीजी लाईफ सायन्स कंपनीची उत्पादने इतर शेतकर्‍यांनीही वापरून आर्थिक उन्नती करावी.सोळस्कर म्हणाले की, दुष्काळी भागात आम्ही भाजीपाला पिकांची लागवड करतो. थंडीत वेलवर्गीय पिकांची वाढ चांगली होत नसल्याने उत्पादन कमी मिळते. मात्र, बीव्हीजी उन्नती अभियानातील विषमुक्त शेतीसाठीच्या औषधांबद्दल माहिती मिळाल्यानंतर आम्ही दोडका पिकासाठी त्यांचा वापर करण्याचे ठरविले. एका एकराची चांगली मशागत करून घेऊन 4.5 फुटांच्या बेडवर 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर टाकला. भरखत टाकलेल्या बेडवर 3 फुट अंतराने बियांची लागवड केली. गंधकाच्या धुर फवारणीसह प्रत्येक सात दिवसांनी अ‍ॅग्रो मॅजिक आणि अ‍ॅग्रो सेफ यांची फवारणी केली. या औषधांमुळे मधमाशांसह मित्रकिडींवर कोणताही दुष्परिणाम न होता हानिकारण किड-रोगांचा बंदोबस्त झाला. वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे हिरवागार चकाकीयुक्त दोडक्याचा माल मिळाला. त्यामुळे आमच्या दोडक्यास 20 ते 25 रुपये प्रतिकिलोचा भावही मिळाला. इतरांपेक्षा हा भाव चांगला होता. पिकाच्या व्यवस्थापनासाठी चार महिन्यांत सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च झाला. आम्हाला सुमारे 50 टन उत्पादन मिळाल्याने एकुण खर्च वजा करता 8 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले.सध्या चांगले आणि विश्वासू मजूर मिळणे, हीच मोठी जिकिरीची बाब झाली आहे. त्यातही अकुशल असो की कुशल म्हणवून घेणारे अकुशल मजूर असोत, असे मजूर मिळणे हाच शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारा हा प्रकार आहे. एकूण महाराष्ट्र राज्यात मजुरांचा दुष्काळ ही एक मोठी समस्या आहे. वाढत्या बेरोजगारीतही शेतीसाठी माफक मजुरीवर कुशल मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यातच मजुरांना 'भाव' वधारला आहे. त्यांना मजुरी देऊन शेती नफ्यात कशी आणायची, याचेच कोडे उत्पादकांना पडले आहे. त्यास करणे नेमकी कोणती आहेत, याचा वेध घेतला आहे कृषी पत्रकार विशाल केदारी यांनी... 

बिल्डर लॉबीने वाढवली शेतमजुरी 

पंचकृषीतल्या मोठ्या गावांमध्ये मजुर अड्डे असतात. सकाळी 7 ते 8 दरम्यान ठरलेल्या अड्डयांवर मजुर जमा होतात. परिसरातील शेतकरी अड्डयांवर येवून मजुरी ठरवतात. गेल्या वर्षी महिला मजुरांचे दर 250 ते 350 रुपये प्रती दिवस या प्रमाणे होते. पुरुष मजुरांचे दर 300 ते 400 रुपये  दरम्यान होते. यंदा मात्र मजुरीत वाढ झाली आहे. महिला मजुरांचे दर 300 ते 500 रुपये दरम्यान आहेत. पुरुषांच्या मजुरीचे दर 400 ते 600 रुपयां पर्यंत पोहचले आहेत. मजुरीच्या वाढत्या दराचा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. मजुरीचे दर शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने खरीपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. भात पट्टयातल्या पेरण्या अद्याप पुर्ण झालेल्या नाहीत. 

मजुरीचे दर का वाढले

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांनी शहराला खेटून असलेल्या गावांवर लक्ष केंद्रीत केले आहे. परिणामी याच गावांमध्ये गृह निर्माण प्रकल्प उभारले जात आहेत. गृह निर्माण प्रकल्पांमुळे पंचकृषीतील मजुरांना बारमाही रोजगार उपलबद्ध झाला. 
मजुरांमध्ये "बिल्डर" नावाचा शब्द प्रचलीत आहे. कुठे काम करतो ? असा प्रश्न मजुरांना विचारल्यावर, लागलीच उत्तर येते "बिल्डर" कडे !   थोडक्यात बिल्डर कडे काम करणे ही बाब मजुरांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. बिल्डरकडे दर शनिवारी पगार होतो. पुरुषाला सरासरी 500 ते 600 रुपये रोज असतो. महिलांना 400 ते 500 रुपये  दरम्यान रोज मिळतो. मजुराच्या एका जोडप्याला आठवड्याला सरासरी 5400 ते 6600 रुपये मिळतात. बिल्डरांच्या तुलनेत शेतकर्‍यांकडून मजुरांना अल्प मजुरी दिली जाते. शेतकर्‍याकडे मजुरांसाठी बारमाही काम सुद्धा नसते. शेतीसाठी मजुर शोधण्यासाठी शेतकर्‍यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. 

असे मिळवले जातात शेतमजुर 

शेतकर्‍यांनी गुंठेवारी करुन पैसे मिळवले आहेत. मिळालेल्या पैशातून शेतकर्‍यांनी भाडेतत्वावर देण्यासाठीच्या खोल्या बांधल्या आहेत. शहरात तुटपुंज्या पगारावर नोकरी करणारे उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय ग्रामिण भागात राहणे पसंत करतात. ग्रामिण भागात अत्यल्प भाडे असते. एका खोलीमध्ये दहा बारा लोकं राहतात. शेतकर्‍यांच्या खोल्यांमध्ये उत्तर किंवा दक्षिण भारतीय युवकांचा भरणा ठिक ठिकाणी पहायला मिळतो. भाडेकरी युवकांकडून सुट्टीच्या दिवशी मजुरी देवून काम करुन घेतले जाते. 

शेतीक्षेत्र धोक्यात 

पुणे व पिंपरी चिंचवड शहराला खेटून असलेल्या गावांमध्ये गृहप्रकल्प उभारले जात आहेत. गृहप्रकल्पांमुळे गावची लोकसंख्या वाढत आहे. लोकांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी स्थानिक युवक विविध प्रकारचे व्यवसाय करण्याला प्राधान्य देतात. शेतीच्या तुलनेत व्यवसायातून अधिकचा नफा मिळतो. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांच्या एजंटाना खुले आम शेतजमिनी विकल्या जात आहेत. एकंदरीतच वाढत्या नागरिकरणामुळे शेतीक्षेत्र धोक्यात आले आहे. 

लेखक आणि छायाचित्र : विशाल केदारी 
मो. क्र : ७७१९८६००५८ 

अहमदनगर :
इंडो-मोरोक्को करारांतर्गत अभ्यास सहल महणून मोरोक्को देशाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी नुकतीच हिवरे बाजार गावाला भेट दिली. लोकसहभागातून ग्रामीण विकासाला चालना देण्याबाबतची गावाची कल्पना या अधिकाऱ्यांना खूप भावल्याची माहिती राज्याच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी दिली.

ते म्हणाले की, शेती व पाणी याबाबतचा करार नुकताच भारत व मोरोक्को या दोन देशांमध्ये झाला आहे. लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन याबाबतच्या विषयाची माहिती घेण्यासाठी सदर दौ-याचे आयोजन केले होते. हिवरे बाजार गावाने स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून केलेले पाणी व पिकाचे नियोजन अवर्णीय आहे, असे कौतुक या परदेशी तज्ज्ञांनी केले. या अभ्यास दौऱ्यात डॉ. मुल्ले ड्रीस हसनुल (जलसंधारण विभाग प्रमुख, मोरोक्को), अब्दुल कादर मेहदोई (सल्लागार, मोरोक्को), अब्दे लाझीझ झेरोली (कृषि विभाग प्रमुख, मोरोक्को), सिद्धार्थ मिश्रा (संचालक, राष्ट्रीय जल अकादमी), डी. सी. भट्ट (उपसंचालक, राष्ट्रीय जल अकादमी), राघवेंद्र बाबू (सहा. उपसंचालक) व अनुप कुमार सिंग उपस्थित होते.राष्ट्रीय जल अकादमी यांनी या भेटीचे आयोजन केले होते.


नागपूर :
कल्याणकारी राज्याचे निर्माण करण्यासाठी राज्याचा सामाजिक आणि भोगोलिकदृष्ट्या समतोल विकास होणे गरजेचे असते. दीन, दुर्बल, वंचित समाजाला त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प महत्वपूर्ण साधन आहे, असे प्रतिपादन वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज अर्थसंकल्पाची प्रक्रिया : कल्याणकारी राज्य निर्मितीचे महत्वपूर्ण साधनया विषयावर मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, अवर सचिव सुनिल झोरे यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठातील अधिव्याख्याते, विद्यार्थी उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील शेवटच्या व्यक्तिला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या मुलभूत सुविधा मिळाव्यात हे अर्थसंकल्पाचे पहिले उद्दिष्ट असते. विशेषत: राज्याचा सामाजिक आणि भौगोलिकदृष्ट्या समतोल विकास करण्यावर भर असतो. पायाभूत सुविधांच्या निर्मितीबरोबरच राज्याचा सांस्कृतिक विकास करणे, मानव विकास निर्देशांक उंचावणे, शैक्षणिक - आरोग्यविषयक सुविधांचा विकास करणे, राज्यातील सर्व समूह, सर्व प्रदेशांना समतोल वाटा देणे यावर अर्थसंकल्पाचा भर असतो.

नागपूर :
आमदार जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करतात. स्थानिक समस्या मार्गी लावतात. सेवा हमी कायद्याच्या वापराने जनतेला तात्काळ सेवा मिळत आहेत. याचा वापर सर्वांनी करावा, असे आवाहन परिषद विशेष अधिकार समितीच्या प्रमुख आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
राष्ट्रकूल संसदीय मंडळातर्फे आयोजित अभ्यासवर्गात विधिमंडळाचे विशेषाधिकार : सुप्रशासनासाठी महत्वपूर्ण आयुधे या विषयावर डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी आमदार विनायक मेटे, ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात, उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सुप्रशासनासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार, न्यायव्यवस्था महत्वाचे अंग आहेत. ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सला जे विशेषाधिकार प्राप्त झाले आहेत तेच भारतीय संसद व राज्य विधिमंडळ आणि त्यांच्या विविध समित्या व सदस्यांनाही प्राप्त झाले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लोकप्रतिनिधींशी योग्य व्यवहार असावा, यासाठीही नियमावली केली आहे. तशीच नियमावली आमदारांसाठी असते, त्यानुसार ते हक्कभंग व आक्षेप घेऊ शकतात. विधिमंडळाचा अवमान किंवा काही गैरवर्तन झाले तर विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो.


कृषी संशोधन क्षेत्रात अमेरिकेचा टक्का वाढतो आहे. अमेरिकेच्या क्वीन्सलँड विद्यापीठाने ,  (Queensland university of management ) केळाची नवीन जात विकसित केली आहे. सदर वाणाचे  "सोनेरी केळ " असे नामकरण करण्यात आले आहे. केळाचे वैशिष्ट्य  म्हणजे केळाच्या गराचा रंग सुद्धा सोनेरी आहे. भविष्यात भारतीय केळांच्या बनात आत्ता सोनेरी केळी दिसु शकतील.

लेखक : विशाल केदारी (कृषी पत्रकार)

प्राध्यापक डेल यांची एका तपाची मेहनत 

विद्यापीठात बारा वर्षांपासून केळीवर संशोधन सुरु होते. एकूण २१ लोकांचा समूह संशोधनावर काम करत होता. युगांडा देशाची ' ' जिवनस्तवाची गरज पुर्ण करण्यासाठी  केळीवर संशोधन सुरु होते. 

बिल ॲंड मेलिंडा गेटस फौंडेशनची मदत.. 

सोनेरी केळी नावाचे वाण विकसीत करण्यासाठी १० मिलियन डॉलर खर्च आला होता. बिल ॲंड मेलिंडा गेटस फौंडेशनच्या वतीने सदर संशोधन यशस्वी करण्यास मदत करण्यात आली होती.

केळींमध्ये केलेले बदल..

केळींवर जनुकीय फेरबदल प्रक्रिया करण्यात आली होती. जनुकीय फेरबदलांमुळे केळीच्या मुळ जींन्स मध्ये बदल करण्यात आले आहेत. जींन्स बदलामुळे केळीतील ' ' जिवनसत्वाची मात्रा वाढली असल्याचे डेल यांनी स्पष्ट केले आहे.

युगांडाला फायदा 

सोनेरी केळींचा सर्वाधिक फायदा युगांडा देशाला होणार आहे. युगांडा देशातील लहान मुले '' जिवनसत्वाच्या अभावी दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. लहान मुलांमध्ये अ जिवनसत्वाचे प्रमाण कमी असेल तर , अंधत्व येण्याचे प्रमाण खुप आहे. जगभरात दरवर्षी सरासरी ६ ते ७ लाख बालके ', जिवनसत्वाच्या अभावी दगावली जातात.

युगांडात लागवड व प्रात्यक्षिकाला सुरवात..

सोनेरी केळीची लागवड व डेंमो प्लॉट तयार करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरु आहे. अफ्रिकेतील गरीब समुदायातील लहान मुलांना वाचविण्यात अगामी काळात यश मिळणार आहे.

भारतीय अदिवासी भागाला सोनेरी केळीची गरज 

भारतात अदिवासी पट्ट्यात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. रायगड , ठाणे , पालघर व गडचिरोली भागात अदिवासींचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी सोनेरी केळीची नितांत गरज आहे. 

भारतात सोनेरी केळीचे वाण कसे येवू शकते

सोनेरी केळीची भारतात लागवड करण्यासाठी  कृषी वाण आयात परवाना अवश्यक आहे. ज्या परदेशी व्यक्तीने सदर वाण संशोधीत केले आहे , त्या व्यक्तीकडून सदर वाणाची पुर्ण सचित्र माहिती आयातकर्त्याने घेणे अवश्यक आहे. वरील माहिती सोबत , भारतीय हवामानातील उपयुक्तता या संदर्भाने २० प्रतींमध्ये केंद्रीय कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. आयात कर्त्यांचा परवाना व भारतीय हवामानातील उपयुक्तता या संदर्भाने अंतिम निर्णय ICAR घेते. त्यानंतर वाणाची आयात करण्याची परवानगी दिली जाते. अर्जाची पडताळणी एकूण २० अधिकारी करतात.

विशाल केदारी 
मो. क्र : ७७१९८६००५८


पुणे :
शेतमालाच्या हमीभावात स्वामिनाथन समितीच्या शिफारशीनुसार दीडपट वाढ केल्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा दावा खोटा आणि फसवणूक करणारा आहे. कृषी निविष्ठा आणि इतर घटकांची एकूण भाववाढ लक्षात घेता यंदा मागील वर्षीच्या तुलनेत हमीभावात फक्त २२ टक्के वाढ झालेली असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मांडले आहे.

ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी दीडपट हमी भाव देण्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना धोका दिला आहे. घोषित केलेला हमीभाव हा फक्त २२ टक्के जास्त आहे. मागील वर्षभरात खत, बियाणे, इंधन, कृषी निविष्ठा आणि एकूण जीवनावश्यक वस्तूंची वाढ २५ टक्के झाली आहे. परिणामी दीडपट हमीभाव केवळ कागदावर उरला आहे. पुन्हा एकदा मोदींनी भारतीय कष्टकरी शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत.
नागपूर :
शेतमालास दीडपट हमीभाव दिल्याचे भासवून मोदी सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेतल्याचे दावे करीत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असाच दावा केला आहे. मात्र, केंद्र सरकारने जाहीर केलेले हमीभाव फसवे असून मोदींचे असे धोरण शेतकऱ्यांसाठी धोकादायक असल्याची टीका शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा आघाडीचे अध्यक्ष संजय कोले यांनी केली आहे.

ते म्हणाले की, स्वामिनाथन समितीच्या शिफारशीला अनुसरून केंद्राने मागील वर्षीच्या हमीभावात दीडपट वाढ केली. मात्र, त्याने शेतीचे प्रश्न सुटणार नाहीत. केंद्राचा हा निर्णय शेतकऱ्यांना धोकादायक व संकटात टाकणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप सरकार आणि काँग्रेसचा शेतकऱ्याकडे पाहणारा चेहरा एकच असल्याचे आता यानिमित्ताने उघड झाले आहे. हमीभावापेक्षा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळण्यातील अडचणी दूर कराव्या लागतील. अशा निर्णयामुळे आपला शेतकरी अधिक उत्पादन घेऊन त्याच्या निर्यातीद्वारे देशाला परकीय चलन मिळवून देण्याइतपत सक्षम होईल. त्यामुळे मोदींनी याकडे लक्ष देऊन शेतीचे धोरण ठरविण्याची गरज आहे.


पुणे :
केंद्र सरकारने दीडपट हमीभावाच्या नावाखाली शेतकऱ्याची शुद्ध फसवणूक केली आहे. उत्पादन खर्चाचीही रक्कम हमीभाव म्हणून जाहीर केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीडपट भाव दिल्याचा केलेला दावा म्हणजे फसवणूक असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

ते म्हणाले की, राज्य सरकारने केलेल्या हमी भावाच्या शिफारशीला केंद्र सरकारने मान्य केलेले नाही.त्यामुळेच उत्पादन खर्चाइतकीही रक्कम केंद्र सरकारने दिलेली नाही. हमीभावाचे नाटक करण्यापेक्षा शेतमाल निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घ्यावा. शेतकरी हिताचा दावा करण्यासह जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घ्यावी.

नागपूर :
उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यासाठी केंद्र सरकारने शेतमालांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) भरघोस वाढ जाहीर केली आहे. हा निर्णय ऐतिहासिक आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकरी हिताचे सर्वाधिक निर्णय घेणारे हे सरकार आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

असा शेतकरी हिताचा निर्णया घेतल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्राचे आभार मानले. नागपूर विधान भवनात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, केंद्राने अर्थसंकल्पात घोषणा केली होती. त्याच आश्वासनाची पूर्तता झाली आहे. या निर्णयामुळे सरकारवर आर्थिक बोजा पडणार आहे. सूक्ष्म सिंचन, फूड पार्क योजना, युरिया निर्णय, किसान संपदा योजना यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यादृष्टीने हे शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत.


मांन्सुनच्या सक्रीयतेमुळे सापांचे सहज दर्शन होते. शेती , पडीक जमिन , पोल्ट्री फार्म , डोंगर पायथा व  झाडांचा बुंधा आदी भागांमध्ये सापांचे वास्तव्य असते. सापांचे वास्तव्य असलेल्या परिसरात शेतकऱ्यांचा व हौशी पर्यटकांचा  वावर असतो. सर्पांच्या राज्यात वावरताना शेतकऱ्यांना व पर्यटकांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पृथ्वीला दोघंचीही गरज आहे.

महाराष्ट्रातील विषारी व बिनविषारी साप कोणते ? 

विषारी : नाग,  मण्यार , घोणस , फुरसे , चापडा व राजसर्प आदी विषारी सापांच्या प्रमुख जाती महाराष्ट्रात अढळतात.

बिनविषारी : तस्कर , कवड्या , धामण , दिवड , गवत्या , नायकूळ व कुकरी आदी बिनविषारी साप महाराष्ट्रात अढळतात.

सर्प दंशाची लक्षणे 

मन्यार 
मन्यार जातीचा साप अंथरुणात प्रवेश करुन दंश करु शकतो. मन्यार चावल्यास कोणत्याही प्रकारची खुण अथवा व्रण  शरीरावर दिसत नाही. डास किंवा ढेकूण चावल्या प्रमाणे मन्यार सापाचा दंश असतो. त्यातून  रक्तस्त्राव होत नाही. मध्यरात्री पोटात दुखू लागणे , सांधे दुखणे आदी मन्यार दंशाची लक्षणे आहेत. 
घोणस व फुरसे यांच्या दंशाचा परिणाम उशिरा होतो. यांच्या दंशामुळे मुत्रपिंड रिकामे होते. किडनीचे कार्य बिघडते.

शेती व ग्रामिण जिवनात वावरताना घ्यावयाची काळजी

पक्क्या स्वरुपाची घरे - ग्रामिण भागातील घराच्या भिंती माती व दगडाच्या असतात. भितींना पडणाऱ्या छीद्रातून साप भितींमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे सापांचे घरातील अस्तित्व निश्चित समजले जाते. त्यामुळे ग्रामिण भागात पक्क्या घरांची बांधणी सुरक्षिततेच्या कारणास्त करणे गरजेचे आहे.

सफरांची उंचावर निर्मिती
शेतमाल साठविण्यासाठी शेतकरी सफरांचे निर्माण करत असतात. सफरांमध्ये उंदीर हमखास प्रवेश मिळवतात. उंदीर सापांना अकर्षीत करतात. त्यामुळे सफराची निर्मिती उंचावर करावी.

कडबा ओढण्यासाठी गजाचा वापर 
पावसाळ्यात गुरांना कोरडा चारा कडब्याच्या स्वरुपात दिला जातो. गोठ्या जवळच कडबा साठवलेला असतो. साठवलेला कडबा सापांचे हक्काचे घर असते. त्यामुळे कडबा ओढताना वाकड्या केलेल्या गजाचाच वापर करावा.

डालग्यां ऐवजी पक्की खुराडी 
कोंबड्या पाळण्यासाठी डालग्यांचा वापर केला जातो. कालांतराने डालग्याला बीळे पडतात. पडलेल्या बिळांद्वारे साप सहज प्रवेश करतात. त्यामुळे डालग्यां ऐवजी पक्क्या खुराड्यांचे निर्माण करणे महत्वाचे ठरते.

जुन्या घर साहित्याची लागलीच विल्हेवाट 
ग्रामीण भागात नविन घरे बांधताना पक्क्या स्वरुपाच्या घरांचे निर्माण केले जाते. त्यामुळे जुन्या घराची कौले , वासे , झावळ्या समोरच साठवल्या जातात. या ठिकाणी देखील सापांचे अस्तित्व असते.

गम बुटांचा वापर 
सरीतून पाणी धरताना , गुरे चरण्यासाठी घेवून जाताना , शिवार फेरी करताना सक्तीने गमबुटांचा वापर करावा. दुसऱ्या दिवशी गमबुट घालण्यापुर्वी बुट पुन्हा एकदा उलटे करुन घालावे. गमबुटात देखिल साप शिरण्याची शक्यता असते.

पाण्याचे बंदीस्त मिटर बॉक्स 

मोटार पंप , पंप हाऊस , पाण्याचा मिटर बॉक्स इत्यादी गोष्टींचा वापर शेतकऱ्यांना सातत्याने करावा लागतो. सदर जागा बंदीस्त नसतील तर सापांना हक्काचे घर मिळते. त्यामुळे वरील साधनांना बंदीस्त बॉक्स बसवावेत.

सर्पदंश झाल्यानंतरचे प्राथमिक उपचार 

प्राथमिक उपचार हा अंतिम उपचार नाही. दंश झालेल्या व्यक्तीला मानसिक अधार देणे , त्याला शांत करणे हा महत्वाचा प्राथमिक उपचार आहे. 
सर्प दंश बिनविषारी सापाचा असू शकतो. विषारी साप प्रत्येक वेळी विष टोचतोच असे नाही. 
दंशाची जागा तत्काळ शक्य असेल तर पाण्याने स्वच्छ करावी. जखम कापू नये अथवा शोषू नये. जखमेच्या वर व खालच्या बाजूला केप बॅंडेज गुंडळावे. शक्य असल्यास हे बॅंडेज सर्वच अवयवां भोवती गुंडळावे. गुंडळेले बॅंडेज एका बोटा इतके सैल राहील याची काळजी घ्यावी. बॅंडेज नसल्यास कापडाचा लांब तुकडा देखील वापरता येईल.
दंश झालेल्या व्यक्तीची पादत्राणे , घड्याळ व आंगठ्या काढून ठेवाव्यात. या गोष्टी काढल्या नाहीतर त्या जागी सुज येण्याची शक्यता असते. रुग्नाला दवाखान्यात घेवून जाण्यासाठी चारचाकी वाहनाचा वापर करावा. वाहन उपलब्ध नसेल तर रुग्नाला उचलून घ्यावे. रुग्नाला चालायला लावू नये.

सार्वजनिक दवाखाना अथवा सरकारी दवाखान्यात रुग्नाला घेवून जावे. सरकारी दवाखान्यात प्रतीसर्प विष हमखास असते. खाजगी दवाखान्यात सुद्धा प्रतीसर्प विष असू शकेल. परंतु अशा ठिकाणी सर्प दंशाचे रुग्न फारसे जात नाही. त्यामुळे अनुभवी डॉक्टर असतीलच याची शक्यता देखील कमी असते. 
रुग्नालयात पोहचल्यानंतर क्रेप बॅंडेज लागलीच काढू नये. बॅंडेज लागलीच काढल्यास रुग्न दगावू शकतो. बॅंडेज सोडण्याचे काम डॉक्टरांना करु द्यावे. 

छायाचित्र सौजन्य : भारतीय सर्प विज्ञान संस्था 

लेखक : विशाल केदारी 

मो. क्र : ७७१९८६००५८

रायगड जिल्ह्यातील देवकुंड नावाचा धबधबा तरुणाईला खुणावत असतो. पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेला  धबधबा तरुणाईच्या अकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. धबधब्यावर जाण्यासाठी फिटनेस टिकून असणे अत्यंत गरजेचे आहे. डायनोसॉरच्या काळातील महाकाय अजगाराने टाकलेल्या काते सारखा वाटणारा धबधबा निसर्गाचा अदभुद चमत्कार आहे.

लेखक : विशाल केदारी (कृषी पत्रकार)

देवकुंड नावाचा धबधबा  कुठे आहे ?
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात देवकुंड नावाचा धबधबा आहे. तालुक्याच्या दक्षिणेला पाटणूस नावाची ग्रामपंचायत आहे. पाटणूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत भिरा नावाचे गाव आहे. उन्हाळ्यातील सर्वाधिक ४६.५ अंश सेल्सियस तपमान भिरा परिसरात नोंदवले गेले होते. तपमान बदलामुळे भिरा परिसरातील साजे व रेवाळजे गावातील काजूची झाडे करपली होती.  याच भिरा गावात पोहचल्यानंतर अंदाजे दीड ते दोन तासांचा ट्रेक केल्यानंतर देवकुंड धबधब्यावर पोहचता येते.

काय करु नये ?

देवकुंड धबधबा पाहण्यासाठी लहान मुलांना घेवून जावू नये. येवून जावून चार तास चालण्याची तयारी असेल तरच जाण्याचा निर्णय घ्यावा.

पुणे शहरातून देवकुंड धबधाब्यावर कसे जायचे ?

चांदणी चौकातून अंदाजे ७० कि. मी अंतरावर भिरा परिसर आहे. चांदणी चौक - पिरंगुट - पौड - माले- मुळशी- चाचवली - वारक - निवे सारोळे - ताम्हिणी घाट परिसर उतरल्यानंतर विळे भागाड नावाचा एम.आय.डी
सी. परिसर येतो. विळे भागाड येथून पाली रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन अंदाजे ९ कि.मी गेल्यानंतर भिरा गावात पोहचता येते.

भिरा गावात पोहचल्यानंतर काय करायचे ?

ग्रामस्थांच्या वतीने गाड्यांच्या पार्कींगची व्यवस्था केली आहे.  दुचाकी वाहनासाठी पार्कींगचा दर ३० रुपये आहे. धबधब्याला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून १० रुपये प्रवेश कर घेतला जातो. लागलीच गाड्या पार्क करुन प्रवेश कराची पावती घ्यावी. थोडा वॉर्म अप करुन गाईड शोधण्यास सुरवात करावी.

गाईड पाहीजेच !

पर्यटकांच्या गर्दी मुळे स्थानिक युवा गाईडचे काम करतात. एका गृपकडून कमीत कमी ५०० रुपये फी गाईड घेतो. जंगलातून वाट असल्याने गाईड घेणे नितांत गरजेचे आहे. एखाद्या गृपच्या मागे मागे जावू असा विचार करणार असाल तर तो करु नका .  गाईड एखाद्या गृपला घेवून कधी दुसऱ्या वाटेने निघून जाईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही. जंगलातील वाट असल्याने चालताना जखम झाली, एखादा किडा चावला तर त्यावर गाईडकडे लागलीच नैसर्गिक उपाय असतात. काय करावे व काय करु नये याच्या सुचना गाईड वारंवार देत असतो.धबधब्यावर पोहचल्यानंतर पाण्यात किती फुट जायचे , कसे जायचे याचीही  माहिती गाईडकडे असते. धबधब्यातील पाण्यात उतरण्यापुर्वी गाईडच्या सुचना लक्षपुर्वक ऐकाव्यात. विना अपघात देवकुंड धबधब्याला भेट द्यायची असेल तर गाईडची नितांत गरज आहे.

देवकुंडला निघण्यापुर्वीची तयारी

१) दु-चाकी वर जाणार असाल तर गाडीची स्थिती प्रामुख्याने चाक व ट्युबची स्थिती तपासून घ्यावी.
२) पावासाळी पर्यटनासाठी बॅगेचे वजन हलकेच ठेवावे. बॅगेत टॉवेल , अतिरीक्त अंतर्वस्त्र ,  अतिरिक्त टी शर्ट,  शॉर्ट,  पाण्याची बाटली, चप्पल ( सॅंडेल)  व  रेंनकोट असणे गरजेचे आहे.
४) भिरागाव ते देवकुंड धबधबा अंतर दीड ते दोन तासांचे आहे. दोन तास चालून धबधब्यावर पोहचल्यावर भुक लागते. त्यामुळे बॅगेत घरगुती व्हेज बिर्याणीचा डबा ठेवल्यास उर्जा टिकून राहण्यास मदत होते.
३) मुलायम टी शर्ट व लवकर वाळेल अशी शॉर्ट असेल तर शरीरातील गरमपणा टीकून राहतो.
४) स्पोर्ट शुज अथवा पावसाळी शुज असला तरी चालेल. परंतू त्याला ग्रीप असणे गरजेचे आहे.
५) मोबाईल क्रांतीच्या युगात धबधब्यावरुन जगाशी कनेक्ट रहायचे असेल तर मोबाईलला रेंज आहे. वॉटरप्रूफ मोबाईल असेल तर घेवून जाण्यास हरकत नाही.
६ ) पुण्यातून सकाळी ७ वा निघणे गरजेचे आहे. सकाळी ७ वा निघाल्यानंतर सायंकाळी ७ च्या आत घरी येणे शक्य आहे.
७) दुचाकी शेयर करुन जाणार असाल तर अंदाजे ६०० रुपये प्रतीव्यक्ती खर्च अपेक्षीत आहे.अपेक्षीत  खर्चात  तीन वेळेचा चहा , दोन वडापाव , एक भजीप्लेट,  दुपारचे जेवन , पेट्रोल , गावातील पार्कींग व प्रवेश कर आदी बाबींचा समावेश आहे.

परतीच्या प्रवासात घ्यावयाची काळजी..

दुपारी २ वा भिरा येथून परतीच्या प्रवासाला सुरवात झालीच पाहीजे. परतीच्या प्रवासात थकवा आलेला असतो. अंग गरम होण्याची क्रिया संथ  पध्दतीने होते. परिणामी अंग अखडण्याची शक्यत असते. त्यामुळे परतीच्या प्रवासात सोबत घेतलेले अतिरीक्त कोरडे कपडे घालावेत व त्यावर रेनकोट घालावा.

सुचना

शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असल्याने पर्यटकांची गर्दी असते. कुटूंबासोबत जाणार असाल तर इतर दिवशी देवकुंडला भेट देणे योग्य ठरते. धबधब्याचा मनमुराद आनंद घेता येतो.
जुलै महिन्याच्या शेवटी अथवा ऑगस्ट  महिंन्याच्या सुरवातीच्या शनिवार रविवार देवकुंडला जाण्याचे नियोजन करतो आहे. माझ्या सोबत येण्यासाठी कोणी इच्छुक असेल तर माझ्या पुढील क्रमांकावर whts app मेसेज  करावा.  मो. क्र : ७७१९८६००५८

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget