DNA Live24 2015

म्हशीच्या पोटातून काढले 5 तोळ्यांचे गंठण

सातारा :
खुरकात दडवून ठेवलेले सोन्याचे दागिने म्हशीने खाल्ल्याचा अजब प्रकार सातारा जिल्ह्यातील एका गावात घडला. मात्र, पशुवैद्यकीय डॉक्टरने वेळीच त्या म्हशीचे ऑपरेशन करून पोटातील 5 तोळे सोन्याचे गंठण काढून देत गावकऱ्यांची मने जिंकली.

सुनील दादासो खाडे (रा. मांडवे ता.खटाव) यांचे घरी ही घटना घडली. सध्या सोशल मीडियात ती जोरात ट्रेंडिंग होत आहे. त्यांची मुलगी रक्षाबंधन सणासाठी माहेरी आली होती. गावात चोऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या मुलीने स्वतःचे दागिणे दागिणे रात्री झोपताना जनावरांना चारावयाच्या पेंडीच्या पोत्यात ठेवले होते. परंतु, सकाळी तमुलीच्या आईने सदरची पेंड त्यांच्या म्हशीला चरावयास दिली. त्यामध्ये असणारे दागिने त्या म्हशीने खाल्ले. त्यातील नेकलेस म्हशीने चघळून खाली टाकले, परंतु ५ तोळ्यांचे गंठण तिने गिळले. त्याचे ऑपरेशन वडूज पशुवैद्यकीय दवाखाण्याचे सहाय्यक उपायुक्त डॉ. नितीन खाडे व त्याच्या टीम मधील डॉ. तानाजी खाडे, डॉ. प्रकाश बोराटे व श्री. साबळे यांनी करून ते ५ तोळ्यांचे गंठण व्यवस्थितरित्या बाहेर काढले. त्या सर्वांचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget