DNA Live24 2015

पाणीप्रश्नासाठी शेवगावकरांनी घेतली मंत्री शिवतारे यांची भेट


अहमदनगर :
शेवगाव तालुक्यातील गावांचा पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी मौजे गोळेगाव येथील पाझर तलावाच्या मातीच्या भिंती ऐवजी सिमेंट काँक्रिटच्या भिंती उभारण्याच्या मागणीसाठी जि.प. महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांची भेट घेऊन निवेदन दिले. पाझर तलावाला मातीच्या भिंती असून ते नादुरुस्त असल्याने यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने सदर परिसरात दुष्काळस्थिती निर्माण होत असल्याचे शिवतारे यांच्या निदर्शनास आनून देण्यात आले

 जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे नगरला आले असता त्यांची शेवगाव तालुक्याच्या ग्रामस्थांनी भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जि.प. सदस्य अनिल कराळे, संजय आंधळे, सोमनाथ आंधळे, प्रल्हाद उबाळे, स्वप्निल फुंदे, आप्पासाहेब साळवे, सुनिल फुंदे, विजय साळवे, सुरेश फुंदे, कालिदास फुंदे, बंडू उबाळे, लहू साळवे, सोमनाथ आंधळे आदी उपस्थित होते.
शेवगाव तालुक्यातील पूर्व भागात मौजे गोळेगाव परिसरातील पतळगंगा नदीवर सन 1971 साली दुष्काळात रोजगार हमी योजने मधून मातीचा बंधारा (पाझर तलाव) बांधण्यात आला. सद्यस्थितीमध्ये या मातीचा बंधारा नादुरुस्त झालेला असून, यामधून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. या बंधार्‍याची दोन डोंगराच्या नैसर्गिक साइटवर निर्मिती झालेली आहे. हा परिसर पूर्ण डोंगराळ असून, भगवानगडाच्या पायथ्यापासून सात दर्‍यामधून या बंधार्‍यात पाणी साठा उपलब्ध होतो. याचे पाणलोट क्षेत्र 4.75 चौ.किमी पर्यंत आहे. या पाझर तलावाची साठवण क्षमता 15.18 द.ल.घ.फू. एवढी आहे. या परिसराचे पर्जन्यमान चांगले असून, या पाझर तलावासाठी कोणत्याही प्रकारची जमीन संपादित करण्यात आलेली नाही.

गोळेगाव, नागलवाडी आदी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था नसून, पिण्याच्या पाण्यासाठी शासनाला दरवर्षी टँकरवर मोठा खर्च करावा लागत आहे. शेतीसाठी कुठलाही शाश्‍वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसून पर्जन्यमान जास्त असूनही या परिसरात कायम दुष्काळी परिस्थिती असते. या सर्व भौगोलिक परिस्थितीचे निरीक्षण केल्यास या मातीच्या भिंती ऐवजी सिमेंट काँक्रिटचे भिंती बांधल्यास गोळेगाव, राणेगाव, नागलवाडी, लाडजळगाव, बोधेगाव, आधोडी, दिवटे, शोभानगर आदी गावातील पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटू शकणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget