DNA Live24 2015

श्रावण मासामुळे कांदा-लसणावर संक्रांत..!


पुणे :
श्रावण महिन्यात मांसाहार कमी झाल्याचा दुष्परिणाम कांदा, लसूण आणि मसाल्यांवरही झाला आहे. मागणी मोठ्या प्रमाणात घटल्याने कांदा व लसणाचा भावही ३० ते ५० टक्के कमी झाला आहे.

श्रावणात अनेकजण मांसाहार व कांदा-लसूण व्यर्ज करून चातुर्मास ठेवतात. त्यामुळे या दोन्ही शेतमालाची मागणी भरल्याने दरातही घसरण झाली आहे. कांदा १४ रुपये किलोवरून १० रुपये किलो तर, लसूण २० वरून १० रुपये किलो झाला आहे. पुण्यासह मुंबईतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे खरेदीदारच नसल्याने माल मागवून काय करणार, असा प्रश्न व्यापारी विचारत आहेत. गणेशोत्सव सुरू होईपर्यंत तरी कांदा-लसणाचे दर कमी राहण्याची शक्यता आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget