DNA Live24 2015

मराठी तरुणाने रोवला केनियात झेंडा..!


पारनेर तालुक्याच्या (जि. अहमदनगर) पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. गावात पातारे नावाच्या अल्पभुधारक शेतकरी कुटूंबाचे वास्तव्य होते. शेतीवर उदरनिर्वाह होत नसल्याने, पातारेंनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. मुंबई व पुण्यात भटकंती केल्यानंतरही जगण्याची लढाई थांबत नव्हती. शेवटी जगण्याच्या लढाईचा अंत नैरोबीत झाला. इयत्ता दहावी शिक्षण झालेले वसंतराव पातारे नैरोबीत उच्च पदावर कार्यरत आहेत. नैरोबीत नव्याने जाणार्‍या मराठी नोकरदारांना पातारे हक्काचा आधार ठरत आहेत. नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाणार्‍या युवकांना पातारेंची जिवनकथा नक्कीच मार्गदर्शक ठरेल..

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. पारनेर तालुक्याच्या  पश्चिमेला गोरेगाव नावाचे सर्वसाधारण खेडे आहे. पारंपारिक शेतीला पुरक व्यवसायाची जोड देण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार असतो. कृषी उद्योजकांच्या गोरेगावात गोरेश्वराच्या नावाने यात्रा भरवली जाते. गावातच मगन महादेव पातारे व कासुबाई मगन पातारे नावाच्या शेतकरी दांम्पत्याचे वास्तव्य होते. वडीलोपार्जित एक एकर शेती असलेल्या पातोरे दांम्पत्याला सहा आपत्ये आहेत. पातारे कुटूंबातील मुले मोठी होत होती, कुटूंबाच्या गरजा वाढत होत्या. विस्तारलेल्या पातारे कुटूंबाचा शेतीवर उदरनिर्वाह होत नव्हता. जगण्याची लढाई जिंकण्यासाठी मगन पातारेंनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. जगण्याच्या लढाईत पातारेंना मोठा मुलगा वसंत यांची साथ मिळत होती.

नोकरी मिळाली भटकंती थांबली..
मुंबई , पुणे भटकंती केल्यानंतर पातारे परिवार पुण्यातील भोसरी परिसरात स्थायिक झाला. भटकंतीमुळे कुटूंबातील मुलांचे समाधानकारक शिक्षण झाले नव्हते. मोठा मुलगा वसंत यांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतले होते. शिक्षणामुळे भोसरीतील केमिकल कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. कंपनीतील अनुभवामुळे पातारेंना के.के नाग कंपनीची ऑफर मिळाली. कंपनीत स्थिरावल्याने वडीलांनी त्यांचा विवाह करण्याचे निश्चित केले.  सन 1986 साली वसंत यांचा विवाह शेजारच्या गावातील मंदाकिनी यांच्याशी झाला. दरम्यानच्या काळात इतर भावंडं देखिल विवाह बद्ध झाली. सध्या संपुर्ण पातेरे कुटूंबिय याच परिसरात स्थायिक झाले आहेत.

चोरट्यांचा हल्ल्यात डोळा गमवला..
सन 1996 साली वसंत पातेरे रात्री उशिरा घरी चालले होते. चोरट्यांनी अचानक पातारेंवर हल्ला चढवला. हल्ल्यामध्ये त्यांना डोळा गमवावा लागला. कंपनीच्या वतीने त्यांना कृत्रीम डोळा बसवण्यात आला. एक डोळा नसल्यामुळे वसंतरावांच्या कामाचा वेग मंदावला होता. कामात चिड-चिड वाढली होती. शेवटी वैतागुन त्यांनी राजीनामा दिला. याच दरम्यान त्यांच्या आई वडीलांचा मृत्यु झाला. भटकंतीतून स्थिरावल्यानंतर वसंतरावांना संकटा मागून संकटांचा सामना करावा लागला होता.

मित्राच्या माध्यमातून नैरोबीची संधी..
राजीनामा दिल्यानंतर पातारे सलग सात वर्षे कोणतीच नोकरी करत नव्हते. राजीनामा देताना त्यांचे सहकारी रामदास मानसिंग माने यांनी देखिल राजिनामा दिला होता.  राजीनामा देण्यापुर्वी मानेंचा व्यवसाय निश्चित झाला होता. त्यामुळे लागलीच रामदास यांनी, माने इलेक्ट्रिकल वर्क्स नावाची कंपनी सुरु केली. कंपनीच्या माध्यमातून मानेंची केनियातील पटेल नावाच्या उद्योजकाची ओळख झाली. त्यांना अनुभवी असलेल्या भारतीय कामगाराची गरज होती. लागलीच त्यांनी पातारेंशी संपर्क साधला. नैरोबीतील संधी त्यांनी पातारेंना समजावून सांगितली. अखेर पुन्हा सात वर्षांनतर पातारेंच्या परदेशातल्या कामाची नवी इनिंग सुरु झाली. पासपोर्ट पासून सगळाच खर्च पटेल यांनी केला.

नैरोबीतील कामाचे एक तप पुर्ण..
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 2 ऑगस्ट 2004 रोजी वसंतराव पातारे यांनी नैरोबी विमानतळावर पाय ठेवला. पहील्या दिवसापासूनच त्यांनी कामाला सुरवात केली. नैरोबीत के. आर पटेल यांची ए.एस.एल पॅकेजिंग लिमिटेड नावाची कंपनी आहे. कंपनीच्या वतीने थर्माकॉलचे निर्माण केले जाते. कंपनीमध्ये पातारेंची उत्पादन व्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आली. गेली 12 वर्षे ते नैरोबीत कार्यरत आहेत.

पंजाबी कुटूंबात पेईंग गेस्ट..
नैरोबीतील एका पंजाबी कुटूंबात पातारे पेईंग गेस्ट म्हणून राहतात. भारतीय कुटूंबात वास्तव्य असल्याने अनेक प्रश्नांची सोडवणूक होत असल्याचा पातारेंचा अनुभव आहे.

केनियन महाराष्ट्र मंडळात कार्यरत..
सध्याच्या आकडेवारी नुसार केनियामध्ये अडीच लाख भारतीयांचे वास्तव्य आहे. त्यापैकी तीनशे कुटूंब मराठी भाषिक आहेत. केनियातील मराठी भाषिकांनी एकत्र येवून महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील सन , उत्सव  महाराष्ट्र मंडळाच्या वतीने साजरे केले जातात.

मराठी भाषिकांना केनियात आधार..
नोकरीच्या निमित्ताने नव्याने केनियात जाणार्‍या मराठी भाषिकांना अधाराची गरज असते. नवख्या नोकरदारांना आधार देण्याचे काम वसंतराव पातारे करत असतात. गेली बारा वर्षे ते कुटूंबापासून दुर आहेत. कुटूंबाला भेटण्यासाठी नित्याने येत असतात. त्यांची कन्या धनश्री नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. मुलगा गोदरेज कंपनीत नोकरीला लागला आहे. कुटूंबापासून दुर असल्याने आपल्या व्यक्तींची उणिव त्यांना सतत सतावत असते. त्यामुळे केनियात नव्याने येणार्‍या प्रत्येक भारतीयाला अधार देण्याचे काम पातारे करत असतात.

मी , केनियन भारतीय
नोकरीच्या निमित्ताने मला नैरोबीला यावे लागले. केनियात स्थिर झाल्यानंतर मला इथली संस्कृती कळाली. लुटा-लुटीचे खुप प्रकार केनियात होत असल्याचे ऐकले होते. मा या केनियात लुटा-लुटीचा एकही प्रसंग मा यावर आला नाही. केनियन भारतीय असल्याचा मला गर्व आहे.
वसंतराव पातारे
मो.क्र : + 254 723 791 478

(मराठीचा झेंडा केनियात फडकवणार्‍या वसंतराव पातारेंना कौतूकाचा एखादा व्हाटस अप मेसेज पाठवला तर, त्याला पैसे लागणार नाहीत. वसंत पातारेंचा व्हाटस अ‍ॅप क्र : + 254 723 791 478)

छायाचित्र : वसंतराव पातारे

लेखक :
विशाल केदारी
Mobile no : +91 7719860058
Email : vishalkedari1@gmail.com

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget